Posts

*मल्लविद्या उन्हाळी शिबिर उत्साहात संपन्न........*

Image
*मल्लविद्या उन्हाळी शिबिर उत्साहात संपन्न........*  *सांगता सोहळा समारंभास मान्यवरांची उपस्थिती...* महाराष्ट्र राज्य कुस्ती मल्लविद्या महासंघ संचलित मल्लविद्या कुस्ती केंद्र शेडगेवाडी आयोजित गेली पाच वर्षे उन्हाळी कुस्ती प्रशिक्षण शिबिराचे आयोजन मोठ्या थाटामाटात आयोजिले जाते. हे शिबिर २५ दिवसीय असते. स्थापनेच्या प्रारंभीपासुन या शिबिरास सांगली , सातारा , कोल्हापुर , पुणे , बीड , जळगाव , मुंबई येथुन नवोदित मल्लांनी हजेरी लावली आहे . कुस्ती मल्लविद्या महासंघ अध्यक्ष पै.गणेश मानुगडे यांच्या प्रेरणेतुन आणि आॅलम्पिकवीर पै.बंडा पाटील रेठरेकर यांच्या मार्गदर्शनाखाली दरवर्षी या शिबिराचे आयोजन करण्यात येते.      सदर शिबिरात कुस्ती , व्यक्तिमत्व विकास , आहार , व्यायाम , संस्कार , आचार - विचार , लेखन , गायन , नृत्य , वक्तृत्व असे मल्लांच्या सर्वांगीण विकासावर काम‌ केले जाते यामुळे या मल्लविद्या शिबिरास महाराष्ट्रभरातुन‌ अनेक नवोदित मल्ल मोठ्या प्रमाणात उपस्थित रहातात.शिबिर यशस्वी पुर्ण करणा-या मल्लांना प्रमाणपञ , शिल्ड आणि टी शर्ट चे वाटप करण्यात येते. दरवर्षी उत्कृ...

*पेरीडच्या मैदानात सुरज पाटील याला आदर्श कुस्ती भूषण पुरस्काराने सन्मानित केले*....

Image
*पेरीडच्या मैदानात सुरज पाटील याला आदर्श कुस्ती भूषण पुरस्काराने सन्मानित केले*.... मनोजकुमार मस्के - खन- खन शड्डूचा आवाज करत मैदानातील प्रेक्षकांची मने जिंकणारा आणि काही मिनिटात चितपट कुस्ती करून विजय प्राप्त करणारा त्याचबरोबर अनेक पथकांचा मानकरी ठरलेला चित्तूर गावचा ढान्या वाघ पैलवान सुरज पाटील याला पिरेड येथील भव्य कुस्ती मैदानात आदर्श कुस्तीपटू म्हणून पुरस्काराने सन्मानित केले. चांगल्या पैलवानांचा आदर करणारे आणि पैलवानांना येथोचित्त मान देणारे पेरीडगाव हे पहिल्यापासूनच प्रसिद्ध आहे. या गावातील अनेक मल्ल मोठ्या हुद्द्यावर आहेत. त्याचबरोबर कुस्तीवर अतोनात प्रेम करणारे या गावातील सर्व गावकरी तसेच परिसरातील लोक पेरीडचे मैदान पाहण्यासाठी आवर्जून हजेरी लावत असतात.     अतिशय गरीब घरातील सुरज पाटील हा पैलवान शाहुवाडी तालुक्यातील शित्तूर गावचा असून  सुरवातीला मुंबई येथील लक्ष्मी नारायण व्यायाम शाळेत तो सराव करत होता. सध्या सुरज कोल्हापूर येथील हिंदकेसरी दादू चौगुले मामा यांच्या तालमीत कुस्तीचा सराव करत आहे. अलीकडील काळात अनेक महान पैलवानांवर विजय मिळवत सुरज ने...

आजच रात्री १२ वाजता प्रज्वलीत झालेले ‘महाराष्ट्र राज्य’ नेमके कुठे आहे?

Image
आजच रात्री १२ वाजता प्रज्वलीत  झालेले ‘महाराष्ट्र राज्य’ नेमके कुठे आहे? - मधुकर भावे आज रात्री १२ वाजता महाराष्ट्र राज्याला ६४ वर्षे पूर्ण होतील. ६५ व्या वर्षात महाराष्ट्र पाऊल ठेवेल. बरोबर ६४ वर्षांपूर्वी आजच्याच रात्री १२ वाजता देशाचे पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांनी महाराष्ट्र राज्याचा नकाशा विद्युत डदीपांनी  राजभवनवर  प्रज्वलीत केला. महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण हे पंडितजींच्या शेजारी होते. महाराष्ट्रचे महनीय राज्यपाल श्री. श्रीप्रकाश हे ही यावेळी होते. यापूर्वी त्याच दिवशी सायंकाळी शिवाजी पार्क येथे प्रचंड सभेत संयुक्त महाराष्ट्राच्या िनर्मितीची घोषणा झालीच होती. पाच वर्षांच्या अथक लढाईनंतर मराठी भाषिकांना ‘मुंबईसह संयुक्त महाराष्ट्र’ या घोषणेप्रमाणे मराठी भाषिकांचे राज्य मिळाले. ते सुखासुखी मिळाले नाही. इतर राज्यांना जसे भाषिक तत्त्वाने सहजपणे मिळाले तसे महाराष्ट्राला मिळाले नाही. खूप मोठा लढा झाला. स्वातंत्र्य मिळाल्यानंतरचा या देशातील लोकशाहीच्या मार्गाने लढवलेला, तो सगळ्यात मोठा लढा म्हणून नोंदवला गेला. जात-धर्म-पंथ-पक्ष.... व...

‘मागे वळून पाहताना’- मधुकर भावे

Image
‘मागे वळून पाहताना’ - मधुकर भावे आज २७ एप्रिल. बरोबर दोन महिन्यांपूर्वी म्हणजे २७ फेब्रुवारीला याच जागेवर लेख होता... ‘तात्या तुम्हाला वंदन करून’... २८ फेब्रुवारीला ‘मराठी भाषा दिन’ होता. त्या संदर्भात त्या लेखात विश्लेषण होते. गेले दोन महिने या जागेवरून काही लिहिले नाही. अनेक वाचक मित्रांनी गेल्या महिन्याभरात चौकशी केली.... ‘लेख का येत नाहीत...’, ‘तब्बेत ठीक आहे ना?’... एका मित्राचा तर फोन आला... त्याने चक्क विचारले, ‘काही दबाव आहे का?’... या सर्व वाचकांचा मनापासून आभारी आहे. आपली कोणीतरी वाट पहात आहे, याचा तरुण वयात एक आनंद असतो, असे म्हणतात. 'आपल्या लेखाची  वाचक वाट पहात आहे,' याचा आनंद त्याहीपेक्षा अधिक मोठा आहे. त्या सर्व वाचकांचा मी आभारी आहे.  गेले दोन महिने एका वेगळ्या कामात स्वत:ला गाडूनच घेतले होते. १ मार्चला पहाटे अवचित जाग आली... आणि पहाटे डोळ्यांसमोर विषय आला की, ‘येणाऱ्या १ मे २०२४ रोजी महाराष्ट्र राज्य निर्मितीला ६४ वर्षे पूर्ण होतील. आणि महाराष्ट्र राज्य ६५ व्या वर्षात पाऊल ठेवील. त्याचवेळी हेही जाणवले की, माझ्या छोट्याशा पत्रकारितेलासुद्धा याचवर्ष...

*मौजे मांगरुळ (ता. शिराळा) येथे सोमवार दि २१ एप्रिल रोजी होणार जंगी मल्लयुध* *दोन महाराष्ट्र केसरी एकमेकाला भिडणार*...

Image
*मौजे मांगरुळ (ता. शिराळा) येथे सोमवार दि 10 एप्रिल रोजी होणार जंगी मल्लयुध* *दोन अंतरराष्ट्रीय एकमेकाला भिडणार*... ------------------------- *मनोजकुमार मस्के -मांगरूळ*    शिराळा तालुक्यातील मांगरूळ या गावात *चिंचेश्वर देवाच्या यात्रेनिमित्त* चिंचेश्वर यात्रा कमिटी, व ग्रामपंचायत मांगरुळ यांच्या विद्यमाने भव्य दिव्य कुस्तीचे मैदान होणार आहे.    मांगरूळ हे गाव तसे पहिल्यापासूनच लढवय्यांचे गाव म्हणून ओळखले जाते. अनेक मात्तबर पैलवान याच गावात घडले आहेत. प्रत्येक घरात ऐक पैलवान म्हटलं तर वावघं ठरणार नाही. *मोरेवाडी येथील स्व. पैलवान राजाराम पवार* यांचे संपूर्ण पंचक्रोशीत नाव होते. त्याच बरोबर याच गावातील *शेणवी कुटुंबातील कै. तुकाराम शेणवी (ठेकेदार)* हे सुद्धा मोठमोठाले कुस्ती मैदान भरवत असत. *त्याचबरोबर अनेक नॅशनल, इंटरनॅशनल, शिवछत्रपती पुरस्कार इथपर्यंत पोहोचलेले अनेक पैलवान याच मांगरूळच्या मातीतून उदयास आले*. मांगरूळच्या मैदानात कुस्ती म्हणजे खासबागच्या मैदानात कुस्ती, असंच काहीसं गणित मांगरूळच्या मैदानाच्या बाबतीत आहे. याचं कारण ही तसंच आहे. *हिंदकेसरी गण...

*नवसाला पावणारा हाकेला धावणारा चिंचेश्वर यात्रा मांगरूळ*

Image
*नवसाला पावणारा हाकेला धावणारा चिंचेश्वर यात्रा मांगरूळ* *मनोजकुमार मस्के , मांगरूळ*  मांगरूळ , तालुका शिराळा , सांगली येथील श्री . चिंचेश्वर देवाची यात्रा दि .30 मार्च २०२६ रोजी सुरु होत आहे , त्यानिमीत्ताने देवस्थानाची माहिती देणारा हा लेख . सांगली जिल्ह्यातील शिराळा तालूक्यातील मांगरुळ गावी पर्वतरांगांच्या कुशीत दाट झाडीत अगदी उंच डोंगरावर चिंचेश्वर देवाचे मंदिर निसर्ग सानिध्यात वसले असून , गावच्या लोकांनी व सर्व भक्तांनी हातभार लावून हे मंदिर गावाच्या उंच टेकडीवर बांधले आहे . मंदिराच्या समोर दिपमाळ असून , मागे वडाचे मोठे झाड आहे . पाठीमागील बाजूस चिकू , आंबा , फणस , पपई अशी अनेक झाडे आहेत . मंदिरापासून काही अंतरावर बारमाही वाहणारी वारणा नदी आहे व मंदिराजवळ जाताच गार वारा व आजूबाजूला फुललेला हिरवागार शिवार , समोरच मांगरूळ गाव अशा निसर्ग सानिध्यात हे मंदिर वसलेले आहे . मंदिराच्या गाभाऱ्यात चिंचेश्वराची मूर्ती आहे . आजही या देवाची आख्यायिका लोक मोठ्या भक्तीभावाने सांगतात .  देवाची आख्यायिका  श्री चिंचेश्वर देव हे मूळचे कर्नाटकचे . त्यांना शिकार करण्याची खूप आ...

*वनश्री दूध डेरी चिंचोली यांच्यावतीने गुढीपाडव्या निमीत्त सभासदांना बासुंदी वाटप*

Image
 *वनश्री दूध डेरी चिंचोली यांच्यावतीने गुढीपाडव्या निमीत्त सभासदांना बासुंदी वाटप* वनश्री दूध संकलन केंद्र चिंचोली ता. शिराळा दुधाला योग्य भाव, वेळेत लाभांश देत शेतकरी, दूध उत्पादक, सभासद यांचे हित साधले असल्याची माहिती  दूध डेअरीचे अध्यक्ष शरद पाटील यांनी दिली.  शरद पाटील म्हणाले, वनश्री दूध संघाचे चेअरमन व  युवा नेते सम्राटसिंह महाडिक यांच्या मार्गदर्शनाखाली  अल्पावधित पश्चिम महाराष्ट्रात वेगळा ब्रँड तयार केला आहे. सध्या डेअरीचे चिंचोलीतून 200  लिटरपेक्षा जास्त संकलन होत असून डेरीचे वनश्री दुध संघ, श्रीखंड, आम्रखंड, बासुंदी, मसाला दूध, दही, ताक, लस्सी, तूप, खवा, चक्का, पेढे आदी पदार्थांना मोठी मागणी होत आहे.  यावेळी वनश्री दूध संस्थेच्यावतीने, शेतकरी, दूध उत्पादक, सभासद यांना मान्यवरांच्याहस्ते प्रत्येकी  बासुंदी, वाटप करण्यात आले. असे वनश्री दूध संस्थेचे अध्यक्ष शरद पाटील यांनी सांगितले.