महाराष्ट्र चाॅम्पियन पै. श्री अमर मस्के यांचा आज वाढदिवस पै. अमर मस्के हे सध्या ओडीसा येथे बि एस एफ मध्ये देशाची सेवा बजावत आहेत*.
पैलवान अमर मस्के : मातीच्या आखाड्यातून देशसेवेपर्यंतचा प्रवास… एक भाऊ, एक खेळाडू, एक योद्धा काही माणसं आयुष्यात फक्त स्वतःसाठी जगत नाहीत, तर आपल्या कर्तृत्वाने संपूर्ण कुटुंब, गाव आणि समाजाचे नाव उंचावतात. अशाच व्यक्तिमत्त्वांपैकी एक म्हणजे महाराष्ट्र चॅम्पियन पैलवान श्री. अमर मस्के. आज त्यांच्या वाढदिवसानिमित्त मनातील भावना शब्दांत मांडण्याचा हा एक छोटासा प्रयत्न... १ जून १९८५ रोजी जन्मलेला हा साधा मुलगा पुढे एवढा मोठा प्रवास करेल, याची कल्पना कदाचित कुणालाच नसेल. शिराळा तालुक्यातील मांगरूळ या मातीत वाढलेले अमर यांना लहानपणापासूनच कुस्तीचे बाळकडू घरातून मिळाले. वडिलांच्या घामाच्या आणि कष्टाच्या सुगंधात त्यांचे बालपण घडले. मातीचा गंध, तालमीतील घाम आणि जिद्दीचा वारसा त्यांना रक्तातच मिळाला होता. शाळेत असतानाच तालुका, जिल्हा आणि विभागीय स्तरावर त्यांनी आपल्या ताकदीची छाप पाडली. नंतर महाराष्ट्रासाठी पदके जिंकली, किर्ती कॉलेजमधून "किर्ती केसरी मुंबई" हा मानाचा किताब पटकावला. परंतु त्यांच्या आयुष्याचा प्रवास फक्त आखाड्यापर्यंत मर्यादित राहिला नाही. त्यांनी देशसेवेचा मार्ग ...