*मल्लविद्या उन्हाळी शिबिर उत्साहात संपन्न........*
*मल्लविद्या उन्हाळी शिबिर उत्साहात संपन्न........*
*सांगता सोहळा समारंभास मान्यवरांची उपस्थिती...*
महाराष्ट्र राज्य कुस्ती मल्लविद्या महासंघ संचलित मल्लविद्या कुस्ती केंद्र शेडगेवाडी आयोजित गेली पाच वर्षे उन्हाळी कुस्ती प्रशिक्षण शिबिराचे आयोजन मोठ्या थाटामाटात आयोजिले जाते. हे शिबिर २५ दिवसीय असते. स्थापनेच्या प्रारंभीपासुन या शिबिरास सांगली , सातारा , कोल्हापुर , पुणे , बीड , जळगाव , मुंबई येथुन नवोदित मल्लांनी हजेरी लावली आहे . कुस्ती मल्लविद्या महासंघ अध्यक्ष पै.गणेश मानुगडे यांच्या प्रेरणेतुन आणि आॅलम्पिकवीर पै.बंडा पाटील रेठरेकर यांच्या मार्गदर्शनाखाली दरवर्षी या शिबिराचे आयोजन करण्यात येते.
सदर शिबिरात कुस्ती , व्यक्तिमत्व विकास , आहार , व्यायाम , संस्कार , आचार - विचार , लेखन , गायन , नृत्य , वक्तृत्व असे मल्लांच्या सर्वांगीण विकासावर काम केले जाते यामुळे या मल्लविद्या शिबिरास महाराष्ट्रभरातुन अनेक नवोदित मल्ल मोठ्या प्रमाणात उपस्थित रहातात.शिबिर यशस्वी पुर्ण करणा-या मल्लांना प्रमाणपञ , शिल्ड आणि टी शर्ट चे वाटप करण्यात येते. दरवर्षी उत्कृष्ट मल्लास आदर्श कुस्तीगीर पुरस्कार प्रदान करण्यात येतो.
*सांगता समारंभ सोहळा मोठ्या थाटामाटात संपन्न...*
१ मे ते २५ मे दरम्यान यशस्वी पार पडल्यानंतर अखेरच्या दिवशी शिबिरार्थी मल्लांचा निरोप समारंभ दरवर्षी मोठ्या उत्साहात पार पडतो. यावर्षी ७० मुलांनी शिबिरास प्रवेश घेतला होता त्या सर्व मल्लांचा व पालकांचा सन्मान व सांगता सोहळा या निमित्त श्री स्वामी समर्थ मल्टीपर्पज हाॅल शेडगेवाडी येथे संपन्न झाला. या कार्यक्रमासाठी झी टाॅकीज फेम , युवा किर्तनकार , शिवचरिञकार ह.भ.प श्री गणेशजी डांगे महाराज , आॅलम्पिकवीर पै.बंडा पाटील मामा , बाजिंदकार पै.गणेशराव मानुगडे , महाराष्ट्र चॅम्पियन पै.धनाजी पाटील ,प्रा.मा.एन.बी.पाटील सर , युवा उद्योजक पै.आनंदा मुळीक , डाॅ.नंदकुमार पाटील , माजी पंचायत समिती सदस्य मा.अमर पाटील, मा.बाजीराव शेडगे , मा.नारायण जाधव (शेठ), मा.रंगराव शेडगे , अॅड.महेश शेडगे, मा.दिनेश जाधव , मा.राजेश शेडगे, पै.अनिल माळी , पै.प्रदीप देसाई , पै.शिवाजी लाड , पै.मारुती पाटील , पै.बाजीराव पाटील , पै.विश्वास पाटील , मा.विजय पाटील, मा.दिगंबर पाटील , मा.सुभाष पाटील , पै.गुंडा पाटील , पञकार पै.मनोज मस्के , मा.प्रतापराव शिंदे , मा.सुरेश पवार , पै.किशोर डिसले , पै.अभिजीत पाटील , पै.सुर्यकांत मदने , पै.उत्तम घोलप , पै.सतिश पाटील तसेच कुस्ती मल्लविद्या महासंघाचे सर्व पदाधिकारी उपस्थित होते. सदर कार्यक्रमाचे सुञसंचालन पै.सुरेश जाधव प्रास्ताविक मा.आनंदराव पाटील तर प्रा.एन.बी.पाटील , पै.धनाजी पाटील , मा.बाजीराव शेडगे , पै.गणेश मानुगडे आणि किर्तनकार ह.भ.प श्री.गणेशजी डांगे महाराज यांनी मनोगत व्यक्त केले.आभार पै.राकेश जाधव यांनी मानले.
*१००० कुस्ती मैदानाचे निवेदन केल्याबद्दल पै.सुरेश जाधव यांचा विशेष सन्मान....*
चिंचोली गावचे सुपुञ कुस्ती निवेदक पै.सुरेश जाधव यांनी अखंडपणे महाराष्ट्र आणि कर्नाटकात आपल्या पहाडी आवाजाने कुस्ती शॊकिनांना मंञमुग्ध करुन १००० कुस्ती मैदानाचा टप्पा पार केल्याबद्दल मल्लविद्या कुस्ती केंद्राच्या वतिने जाहीर सत्कार करण्यात आला.
*शिबिरार्थी मल्लांना टी शर्ट आणि शिल्ड वाटप...*
मल्लविद्या कुस्ती केंद्र आयोजित उन्हाळी कुस्ती प्रशिक्षण शिबिर दरम्यान प्रशिक्षणार्थी मल्लांना आंतरराष्ट्रीय कुस्तीगीर महाराष्ट्र केसरी पै.पृथ्वीराज पाटील यांच्याकडुन टी शर्ट चे वाटप तर यशस्वी उद्योजक आर.के.इंजिनिअरींगचे मालक मा.खाशाबा म्होपरेकर (भाऊ) यांच्याकडुन शिल्डचे वाटप करण्यात आले.
धन्यवाद..!
*Team.Kusti_Mallaivadya*
Comments
Post a Comment