पै.आनंदा धुमाळ कुस्तीतील एक चक्रीवादळ
पै.आनंदा धुमाळ कुस्तीतील एक तुफाणी मल्ल , अनेकांना धुळ चारत चारी मुंड्या चित करत, भारत सरकारचा युवा गौरव पुरस्कार विजेते ते भारतीय रेल्वेचे प्रशिक्षक ईथपर्यंत मजल मारणारे कुस्तीतील जादुगर पै. आनंदा धुमाळ घरची परिस्थीती हलाखीची असल्याने खुराकाची कमतरता कायम भासली. पै.धुमाळ वस्तादांचे गाव शिराळा तालुक्यातील एक छोटेशे खेडेगाव पणुंब्रे. या गावातच त्यांची कुस्तीला सुरवात झाली. घरी दुभती जणावरं असल्याने दुध हा त्यांचा खुराक बनला. धुमाळ वस्तादांचे चुलते पैलवान होते. वयाच्या पाच वर्षापासूनच चुलते आनंदा धुमाळ यांना आपल्याबरोबर गावयात्रेंच्या फडावर नेत असत. तिथेच त्यांना कुस्तीची आवड लागली. हे पोरगं चांगल्या कुस्त्या करत असल्याचे गाववाल्यांच्या पण लक्षात आले . साधारन १९५९-६० तो काळ असेल. भागात उत्कृष्ट कुस्ती करणारा पैलवान म्हणून आनंदा धुमाळ हे नाव लौकीक होऊ लागले. कही वर्ष गावाकडेच कुस्त्या करत नावलौकीक मीळवलेले आनंदा धुमाळ यांना गरज होती ती काहीतरी करून दाखवन्याची. त्यातच त्यांचे नातेवाईक मां...