Posts

Showing posts with the label मधुकर भावे - उत्तर-दक्षिण शनिवार दिनांक १ आॅगस्ट ... एक विलक्षण दिवस

ती धीट मराठी मूर्तीकणखर ताठ....’१ आॅगस्ट २०२० : लोकमान्यांच्या स्मृतीदिनाचे शतक

Image
‘ती धीट मराठी मूर्ती कणखर ताठ....’ १ आॅगस्ट २०२० : लोकमान्यांच्या स्मृतीदिनाचे शतक मधुकर भावे  - उत्तर-दक्षिण  शनिवार दिनांक १ आॅगस्ट ... एक विलक्षण दिवस आहे. लोकमान्यांच्या स्मृती दिनाची १०० वर्षे याच दिवशी होतात. तरुण पिढीनं टिळक, गांधी किती वाचले, अभ्यासले माहित नाही. पण, टिळक महाराजांना शनिवार दिनांक १ आॅगस्ट रोजी स्वर्गवास होऊन १०० वर्ष होतील. १ आॅगस्ट १९२० ते १ आॅगस्ट २०२०... अक्राळ-विक्राळ काळाच्या दाढेत शंभर वर्ष फस्त झाली. टिळक-गांधी युग माझ्या अगोदरच्या पिढीनं पाहिले. नेहरु युग माझ्या पिढीला पाहता आले. देशासाठी सर्व जीवन देणारी ही माणसं आता होणे नाही. लोकमान्य हे एक विलक्षण रसायन होते. एका व्यक्तिमत्वात किती गुणविशेष असावेत. शिक्षक, संपादक, प्राध्यापक, गणिताचे तज्ञ, इतिहास, खगोल शास्त्राचे अभ्यासक, क्रांतीकारी नेते देशाच्या स्वातंत्र्याच्या चळवळीतील तेल्या-तांबोळ्यांमध्ये स्वातंत्र्यांची चळवळ पोहोचविणारा पहिला नेता. गीतेचे भाष्यकार, हिंदु-मुस्लिम यांना एकत्र घेऊन ब्रिटीश साम्राज्यशाहीविरुध्द लढणारा महानायक. अशी टिळकांची असंख््य रुपे आहेत. २२ जुलै १९०८ला म...