*मौजे मांगरुळ (ता. शिराळा) येथे सोमवार दि २१ एप्रिल रोजी होणार जंगी मल्लयुध* *दोन महाराष्ट्र केसरी एकमेकाला भिडणार*...

*मौजे मांगरुळ (ता. शिराळा) येथे सोमवार दि 10 एप्रिल रोजी होणार जंगी मल्लयुध* *दोन अंतरराष्ट्रीय एकमेकाला भिडणार*...
-------------------------
*मनोजकुमार मस्के -मांगरूळ*
   शिराळा तालुक्यातील मांगरूळ या गावात *चिंचेश्वर देवाच्या यात्रेनिमित्त* चिंचेश्वर यात्रा कमिटी, व ग्रामपंचायत मांगरुळ यांच्या विद्यमाने भव्य दिव्य कुस्तीचे मैदान होणार आहे.
   मांगरूळ हे गाव तसे पहिल्यापासूनच लढवय्यांचे गाव म्हणून ओळखले जाते. अनेक मात्तबर पैलवान याच गावात घडले आहेत. प्रत्येक घरात ऐक पैलवान म्हटलं तर वावघं ठरणार नाही. *मोरेवाडी येथील स्व. पैलवान राजाराम पवार* यांचे संपूर्ण पंचक्रोशीत नाव होते. त्याच बरोबर याच गावातील *शेणवी कुटुंबातील कै. तुकाराम शेणवी (ठेकेदार)* हे सुद्धा मोठमोठाले कुस्ती मैदान भरवत असत. *त्याचबरोबर अनेक नॅशनल, इंटरनॅशनल, शिवछत्रपती पुरस्कार इथपर्यंत पोहोचलेले अनेक पैलवान याच मांगरूळच्या मातीतून उदयास आले*. मांगरूळच्या मैदानात कुस्ती म्हणजे खासबागच्या मैदानात कुस्ती, असंच काहीसं गणित मांगरूळच्या मैदानाच्या बाबतीत आहे. याचं कारण ही तसंच आहे. *हिंदकेसरी गणपतराव आंदळकर (आबा) आणि केशव भेडसगावकर )दादा)* यांची तुफानी कुस्ती एकेकाळी मांगरूळच्या यात्रेच्या मैदानात घेण्यात आली होती. संपूर्ण पंचक्रोशी चे डोळे या कुस्तीकडे होते पंच कमिटी कुस्ती कुणाची होईल, कोण कुणाला चितपट करील हा अंदाज बांधत होते. तसं पाहिलं तर केशव भेडसगावकर (दादा) आंधळकर आबांच्या साठी एक आव्हानच होतं. कारण केशव दादांना हरवणे इतकं सोपं नव्हतं. आबांची आणि केशव भेडसगावकरांची कुस्ती बघण्यासाठी संपूर्ण पंचक्रोशीने गर्दी केली होती याच मांगरूळच्या मैदानात कुस्ती जोडली. डोळ्याचे पारणे फेडणारी ही कुस्ती एका क्षणावर येऊन पोहोचली, तो क्षण होता लक्कलकोट वरती  आबांनी केशव दादांना ढकललं आणि तिथेच कुस्तीचा निर्णय झाला. त्यानंतर भाऊ चिखलकर यांनी आबांना कोल्हापूरला खेळायला पाठवले. *एका हिंदकेसरीची सुरुवात याच मांगरूळच्या मातीतून झाली. त्यानंतर अनेक मातब्बर पैलवान या मातीत लढले त्यामुळे या मांगरूळच्या मैदानातील मातीला एक विशेष महत्त्व पूर्वीपासूनच आलेले आहे*.
   
  मांगरुळ गांव तसे कुस्तीगीरांचे गाव आहे जुन्या काळात अनेक तगडे मल्ल या गावात घडले आहेत. ग्रामदैवत चिंचेश्वर देवाच्या छत्रछायेखाली असणारे हे गाव आता सुजलाम सुफलाम आहे.
 
  *यात्रा कमिटी मांगरूळ, सरपंच उपसरपंच तसेच ग्रामस्थ व सर्व आजी माजी सरपंच, उपसरपंच, पैलवान मंडळींच्या* सहकार्याने हे मांगरूळ चे मैदान पार पडणार आहे. आणि दुसरे विशेष म्हणजे या मैदानात *चालु वर्षी दोन आंतरराष्ट्रीय पैलवान एकमेकांशी भिडणार आहेत*...

 चला तर मग मांगरुळ च्या मैदानाचे याची देही याची डोळा साक्षीदार बनुया....

Comments

Popular posts from this blog

शिरशी गावच्या लोकनियुक्त पहिल्या सरपंच – सौ. स्मिताताई बापूराव भोसले

*शिराळा उत्तरच्या मातीत दोन दिवसांपूर्वी जे घडलं, ते फक्त निवडणूक नव्हतं*… *तो विश्वासाचा, नात्याचा आणि घराण्याच्या संस्कारांचा विजय होता*.

*सोंडोलीमध्ये रंगणार दोन महाराष्ट्र केसरींची तुफानी दंगल देवा थापा स्पर्धेचे खास आकर्षण*