मैत्रीचा खरा हिरा, संघर्षातून घडलेला पत्रकार… सुरेश पवार!
💐🎂 मैत्रीचा खरा हिरा, संघर्षातून घडलेला पत्रकार… सुरेश पवार! 🎂💐 दैनिक पुण्यनगरी, शेडगेवाडीचे पत्रकार मित्र श्री. सुरेश पवार यांना वाढदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा! 💐💐 पत्रकारिता म्हणजे केवळ बातम्या लिहिणे नव्हे, तर सर्वसामान्यांच्या दुःखाला शब्द देणे, अन्यायाविरुद्ध आवाज उठवणे आणि लोकांच्या प्रश्नांना न्याय मिळवून देण्यासाठी सातत्याने प्रयत्न करणे… आणि हे काम आपल्या परीने प्रामाणिकपणे करणारे नाव म्हणजे सुरेश पवार! आयुष्यातील परिस्थितीशी दोन हात करत, संसाराचा गाडा ओढत आणि त्याच वेळी पत्रकारितेची ज्योत तेवत ठेवणारा हा माणूस खरोखरच कौतुकास पात्र आहे. स्वतःच्या अडचणींचा बाऊ न करता समाजातील सामान्य माणसांच्या अडचणी आपल्या लेखणीतून मांडणे, हीच त्यांच्या पत्रकारितेची खरी ओळख आहे. शेडगेवाडी परिसरासह आजूबाजूच्या अनेक गावांतील लोकांचे प्रश्न त्यांनी दैनिक पुण्यनगरीच्या माध्यमातून समाजासमोर आणले. सामाजिक असो, राजकीय असो किंवा क्रीडा क्षेत्रातील असो, प्रत्येक विषयाला आपल्या खास शैलीत शब्दबद्ध करून त्यांनी वाचकांपर्यंत पोहोचवले. अनेक प्रश्नांवर आवाज उठवला, आंदोलनांतून जनतेच्य...