Posts

Showing posts from July, 2026

स्वामी धामची ही कहाणी

Image
पत्र्याच्या शेडपासून उभ्या राहिलेल्या स्वामी धामची ही कहाणी डोळ्यांत पाणी आणल्याशिवाय राहणार नाही! अंत्री बुद्रुक मातीत स्वामीभक्तीची ज्योत पेटवणाऱ्या शिवाजी रसाळ तथा शिवानंद गुरुजी आणि उषा रसाळ माई यांच्या त्याग, तपस्या आणि अखंड सेवेला गुरुपौर्णिमेनिमित्त मानाचे वंदन मनोजकुमार मस्के, मांगरूळ -9890291065 काही मंदिरं दगड-विटांनी उभी राहतात, काही मंदिरं पैशांच्या बळावर उभी राहतात; पण काही मंदिरं अशी असतात की, ती उभी राहतात ती केवळ श्रद्धेच्या बळावर, त्यागाच्या घामावर आणि एखाद्या वेड्या ध्यासाच्या ताकदीवर! अंत्री बुद्रुक येथील स्वामी धाम हे अशाच एका अद्भुत भक्तीप्रवासाचे साक्षीदार आहे. आज स्वामी धामचे भव्य रूप पाहताना मन प्रसन्न होते, स्वामींच्या नामस्मरणाने परिसर दुमदुमून जातो, सकाळ-संध्याकाळ आरतीचा मंगलध्वनी घुमतो, असंख्य भाविक दर्शनासाठी येतात, अनेक भक्तांनी शिवाजी रसाळ शिवानंद गुरुजींना आपले गुरू मानले आहे; परंतु या भव्य स्वामी धामच्या उभारणीमागे किती घाम, किती त्याग, किती अडचणी आणि किती निस्सीम स्वामीभक्ती दडलेली आहे, हे कदाचित आजच्या पिढीला सांगितल्याशिवाय कळणार नाही. म्...

*₹८,८५२ कोटींचा हिशोब कुठे?३१ लाखांहून अधिक गुंतवणूकदारांच्या पैशांचा अंतिम ताळेबंद कधी?

Image
*₹८,८५२ कोटींचा हिशोब कुठे? ३१ लाखांहून अधिक गुंतवणूकदारांच्या पैशांचा अंतिम ताळेबंद कधी? Citrus Check Inns–Royal Twinkle प्रकरणात परतावा सुरू; मात्र हजारो कुटुंबांचा कष्टाचा पैसा अजूनही प्रतीक्षेत — सरकार, SEBI आणि यंत्रणांना १० थेट सवाल मनोजकुमार मस्के, मांगरूळ  दहा-बारा वर्षे हा काळ एखाद्या सर्वसामान्य माणसासाठी किती मोठा असतो, याचा विचार सरकारच्या कार्यालयात बसलेल्या अधिकाऱ्यांनी आणि व्यवस्था चालविणाऱ्यांनी एकदा तरी करायला हवा. कारण Citrus Check Inns Limited आणि Royal Twinkle Star Club Limited या कंपन्यांमध्ये आपल्या आयुष्याची बचत गुंतवलेल्या हजारो-लाखो गुंतवणूकदारांसाठी ही प्रतीक्षा आता केवळ आर्थिक राहिलेली नाही; ती जगण्याच्या विश्वासाची, वृद्धापकाळाच्या आधाराची आणि पुढच्या पिढीच्या भवितव्याची लढाई बनली आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या नोंदीनुसार, फॉरेन्सिक अहवालात या दोन कंपन्यांनी सार्वजनिक गुंतवणूकदारांकडून तब्बल ₹८,८५२ कोटी जमा केल्याचे नमूद आहे. त्यापैकी ₹३,४३० कोटी गुंतवणूकदारांना परत करण्यात आल्याचे न्यायालयीन नोंदीत आहे. त्याच नोंदीनुसार ₹३,०७७ कोटी commissi...

दहा-बारा वर्षे झाली; गुंतवणूकदारांच्या पैशांचा हिशेब कधी?

Image
दहा-बारा वर्षे झाली; गुंतवणूकदारांच्या पैशांचा हिशेब कधी? रॉयल ट्विंकल स्टार क्लब–सिट्रस चेक इन्स प्रकरणात ‘तारीख पे तारीख’चा खेळ कधी थांबणार? हजारो सर्वसामान्य गुंतवणूकदारांचा आक्रोश : व्याज नको, किमान आमची मुद्दल तरी परत द्या! मनोजकुमार मस्के,  9890291065 आयुष्यभर कष्ट करून, घाम गाळून, काटकसर करून उभा केलेला पैसा सुरक्षित राहावा आणि भविष्यात उपयोगी पडावा, या आशेने सर्वसामान्य नागरिकांनी Royal Twinkle Star Club Private Limited आणि Citrus Check Inns Limited यांच्या योजनांमध्ये गुंतवणूक केली. परंतु वर्षे उलटली... एक-दोन नव्हे, तर तब्बल दहा-बारा वर्षांचा काळ लोटला. अनेक गुंतवणूकदारांच्या हातात आजही त्यांच्या मेहनतीच्या पैशांचा परतावा नाही. सर्वात वेदनादायक प्रश्न असा— ज्यांनी हा पैसा गुंतवला, त्यातील काही गुंतवणूकदार आज हयातही नाहीत. मग त्यांच्या वारसांनी काय करायचे? आपल्या आई-वडिलांनी आयुष्यभर कष्ट करून जमा केलेला पैसा परत मिळण्यासाठी पुढची पिढीही न्यायालयाच्या दारात उभी राहायची का? हा प्रश्न केवळ पैशांचा नाही; हा विश्वासाचा, न्यायाचा आणि व्यवस्थेच्या उत्तरदायित्वाचा प्र...

गोरक्षनाथांच्या पादुका विठ्ठलाच्या भेटीला… मग भाविक गोरक्षनाथांच्या दर्शनाला का?

Image
गोरक्षनाथांच्या पादुका विठ्ठलाच्या भेटीला… मग भाविक गोरक्षनाथांच्या दर्शनाला का? श्रद्धेचा हा विरोधाभास नाही; हीच तर शिराळ्याच्या भक्तीपरंपरेची अनोखी ओळख! मनोज मस्के,  आषाढी एकादशी म्हटले की डोळ्यासमोर उभे राहते ते पंढरपूर, चंद्रभागा, विठ्ठल-रखुमाई आणि टाळ-मृदंगाच्या गजरात पंढरीच्या दिशेने निघालेल्या असंख्य दिंड्या. महाराष्ट्राच्या मातीत रुजलेली ही वारकरी परंपरा केवळ धार्मिक नाही, तर ती भक्ती, समता, त्याग आणि संस्कारांची चालती-बोलती शाळाच आहे. याच भक्तीपरंपरेचा एक आगळावेगळा अध्याय शिराळ्यातील गोरक्षनाथ मंदिराशी जोडलेला आहे. आषाढी एकादशीच्या निमित्ताने परिसरातील अनेक गावांमधून छोट्या-मोठ्या दिंड्या गोरक्षनाथ मंदिराकडे दर्शनासाठी येतात. विशेष म्हणजे गोरक्षनाथ मंदिरातील दिंडी आणि गोरक्षनाथांच्या पादुका विठ्ठलाच्या दर्शनासाठी पंढरीकडे गेलेल्या असताना, परिसरातील भाविक मात्र शिराळ्यातील गोरक्षनाथ मंदिरात दर्शनासाठी गर्दी करतात. इथेच एक प्रश्न मनात निर्माण होतो— “गोरक्षनाथांच्या पादुका विठ्ठलाच्या दर्शनाला गेल्या आहेत, मग भाविक गोरक्षनाथ मंदिरात दर्शनाला का येतात?” हा प्रश्न क...

*मांगरूळचे आधारस्तंभ, लोकनेते आणि कुटुंबवत्सल व्यक्तिमत्त्व – रंगराव (बापू) भाऊराव पाटील यांना ९१व्या वाढदिवसानिमित्त अभिष्टचिंतन*

Image
*मांगरूळचे आधारस्तंभ, लोकनेते आणि कुटुंबवत्सल व्यक्तिमत्त्व – रंगराव (बापू) भाऊराव पाटील यांना ९१व्या वाढदिवसानिमित्त अभिष्टचिंतन* मनोजकुमार मस्के,मांगरूळ  गावाचा इतिहास हा केवळ इमारती, रस्ते किंवा विकासकामांनी घडत नसतो; तर तो घडतो काही अशा व्यक्तिमत्त्वांमुळे, ज्यांच्या विचारांनी, निर्णयांनी, त्यागाने आणि माणुसकीने अनेक पिढ्या घडतात. मांगरूळ गावासाठी असेच एक अजातशत्रू, निस्वार्थी, रोखठोक, न्यायप्रिय आणि सर्वांच्या मनावर अधिराज्य गाजवणारे व्यक्तिमत्त्व म्हणजे * माजी तालुका पंचायत सदस्य श्री रंगराव (बापू) भाऊराव पाटील* . आज बापूंनी आपल्या आयुष्याच्या * ९१व्या वर्षात पदार्पण* केले आहे. त्यांच्या या वाढदिवसानिमित्त संपूर्ण मांगरूळ गावासाठी हा केवळ आनंदाचा दिवस नाही, तर एका प्रेरणादायी प्रवासाला सलाम करण्याचा क्षण आहे. भारत स्वतंत्र होत असतानाचा काळ त्यांनी अनुभवला. स्वातंत्र्यानंतर देश उभा राहताना त्यांनी स्वतःच्या डोळ्यांनी पाहिले. बदलत्या काळासोबत त्यांनी स्वतःला घडवले आणि गावाच्या विकासासाठी आयुष्य झोकून दिले. ग्रामपंचायतीच्या माध्यमातून गावाच्या विकासाला दिशा दिली, अन...

पै. संदीपभाऊ पाटील यांना वाढदिवसाच्या मनःपूर्वक हार्दिक शुभेच्छा

Image
🎉💐 शिराळा तालुक्याचे भूषण, कुस्ती क्षेत्रातील ऋषितुल्य व्यक्तिमत्त्व, आमचे ज्येष्ठ मार्गदर्शक मा. पै. संदीपभाऊ पाटील यांना वाढदिवसाच्या मनःपूर्वक हार्दिक शुभेच्छा! 💐🎉 शिराळा तालुक्यातील कणदुर या मातीत जन्म घेऊन महाराष्ट्राच्या कुस्ती विश्वात आपल्या कर्तृत्वाचा अढळ ठसा उमटवणारे, साधेपणा, प्रामाणिकपणा आणि निष्ठेचा आदर्श असलेले ज्येष्ठ वस्ताद मा. पै. संदीपभाऊ पाटील यांना वाढदिवसानिमित्त कोटी कोटी शुभेच्छा! एकेकाळी पद्मभूषण वसंतदादा पाटील कुस्ती केंद्राचे तुफानी मल्ल, अनेक राज्य व राष्ट्रीय स्पर्धांमध्ये पदकांची कमाई करणारे विजेते, ऑल इंडिया चॅम्पियन, डबल महाराष्ट्र (मुंबई) कामगार केसरी किताबाचे मानकरी, तसेच मानाचा वसंतदादा क्रीडा पुरस्कार आणि राज्य शासनाचा दादोजी कोंडदेव पुरस्कार प्राप्त करून महाराष्ट्राच्या कुस्ती परंपरेचा गौरव वाढवणारे हे व्यक्तिमत्त्व आजही असंख्य मल्लांसाठी प्रेरणास्थान आहे. गुरुवर्य दिनकररावजी सूर्यवंशी सरांचे आज्ञाधारक शिष्य आणि त्यांच्या विचारांचा खरा वारसा जपणारे संदीपभाऊ यांनी अनेक वर्षे सांगली जिल्ह्याचे महाराष्ट्र कुस्ती अधिवेशनात प्रभावी नेतृत्व...