"स्मशानातील सोनं.."
"स्मशानातील सोनं.." इ. १०वी मध्ये हा धडा कोणी-कोणी वाचलाय आठवतो का ? ---------------------------------- शेजारच्या गावात एक बलाढ्य सावकार मरण पावल्याची बातमी ऐकून भीमान ताडकन उङी मारली.त्याला समाधानाचं भरत आलं.आनंद त्याच्या हृदयात मावेनासा झाला.त्यानं त्या गावाकडे पाहून भरकन आपली नजर आकाशात सूर्याकडे झुगारली. सूर्य तेव्हा मावळत होता. आकाशात पावसाळी ढगांनी गर्दी केली होती. ते नांगरून पडलेल्या जमिनी प्रमाणे ओबड धोबड दिसत होते. त्या आक्राळ विक्राळ ढगातून मावळता प्रकाश मुंबईवर वर्षात होता. वारा मंद वाहत होता.त्यामुळे ते घनदाट जंगल करकरत होतं आणि त्या जंगलात बसलेली तीस-पन्नास झोपडी भेदरलेली होती. जुने पत्रे, चटया, फळ्या, पोती यांनी तिथं घरांचा आकार घेतला नि त्या घरात मानसं राहात होती. बेकार वस्तूंनी तिथं बेकारांव छाया धरली होती. दिवसभर पोटाच्या पाठी धावून दमलेली मानसं आता तिथं स्थिरावली होती. सर्वत्र चुली पेटल्या होत्या. हिरव्या झाडीतून शुभ्र धूर रेंगाळत होता पोर खेळत होती. एका प्रचंड चिंचेखाली भीमा विचार मग्न बसला होता.त्याच्या हृदयात भयंकर हुरहूर उठली होती.त्याला त्या मेलेल्या ...