*वनश्री दूध डेरी चिंचोली यांच्यावतीने गुढीपाडव्या निमीत्त सभासदांना बासुंदी वाटप*

 *वनश्री दूध डेरी चिंचोली यांच्यावतीने गुढीपाडव्या निमीत्त सभासदांना बासुंदी वाटप*
वनश्री दूध संकलन केंद्र चिंचोली ता. शिराळा दुधाला योग्य भाव, वेळेत लाभांश देत शेतकरी, दूध उत्पादक, सभासद यांचे हित साधले असल्याची माहिती  दूध डेअरीचे अध्यक्ष शरद पाटील यांनी दिली. 

शरद पाटील म्हणाले, वनश्री दूध संघाचे चेअरमन व  युवा नेते सम्राटसिंह महाडिक यांच्या मार्गदर्शनाखाली  अल्पावधित पश्चिम महाराष्ट्रात वेगळा ब्रँड तयार केला आहे. सध्या डेअरीचे चिंचोलीतून 200  लिटरपेक्षा जास्त संकलन होत असून डेरीचे वनश्री दुध संघ, श्रीखंड, आम्रखंड, बासुंदी, मसाला दूध, दही, ताक, लस्सी, तूप, खवा, चक्का, पेढे आदी पदार्थांना मोठी मागणी होत आहे. 
यावेळी वनश्री दूध संस्थेच्यावतीने, शेतकरी, दूध उत्पादक, सभासद यांना मान्यवरांच्याहस्ते प्रत्येकी  बासुंदी, वाटप करण्यात आले. असे वनश्री दूध संस्थेचे अध्यक्ष शरद पाटील यांनी सांगितले.

Comments

Popular posts from this blog

*अनाथ मुलांचे स्वीकारले स्वामी धामने पालकत्व*

संजय गणपती पाटील उर्फ संजू दादा भावपूर्ण श्रद्धांजली

*रात्री माझं गाव विकताना पाहिलं*