Posts

Showing posts from April, 2026

“पेरीडची माती, पैलवानांची शान – १२७ वर्षांची कुस्ती परंपरेचा भव्य कुंभमेळा!” 💪🔥

Image
“पेरीडची माती, पैलवानांची शान – १२७ वर्षांची कुस्ती परंपरेचा भव्य कुंभमेळा!” 💪🔥 *मनोजकुमार मस्के, मांगरूळ*  शाहूवाडी तालुक्यात सह्याद्रीच्या कुशीत विसावलेलं, कोकणाला लागून असलेलं आणि मातीचा गंध अंगात भिनलेलं पेरीड गाव म्हणजे खरंच रगेल-रांगड्या महाराष्ट्राची शान! *“पैलवानांचं गाव”* म्हणून ओळख मिळवलेलं हे गाव फक्त नावालाच नाही, तर परंपरा, ताकद आणि मातब्बरपणाचं जिवंत उदाहरण आहे. डोंगरांच्या पायथ्याशी वसलेलं हे गाव जसं निसर्गाने श्रीमंत, तसंच माणसांनीही दमदार आहे. इथं पैशाची कमतरता नाही, पण त्याहून मोठं म्हणजे इथल्या लोकांच्या मनाचा श्रीमंतीपणा. “कुस्ती” म्हणजे जीव तोडून लढणं – ती इथल्या मातीची ओळखच बनली आहे. पेरीडमध्ये लागणारी प्रत्येक कुस्ती म्हणजे फक्त सामना नसतो, तर तो असतो जिगर, प्रतिष्ठा आणि परंपरेचा थरारक संग्राम! *गावाची ग्रामपंचायतही काही साधी नाही* – थेट विधानभवनाची प्रतिकृती उभी केलेली आहे. हेच दाखवून देतं की पेरीड गाव फक्त कुस्तीपुरतं मर्यादित नाही, तर विकासाच्या बाबतीतही आघाडीवर आहे. सर्जेराव पेरीडकर दादा, पोलीस अधिकारी बाजीराव पाटील दादा, पै. रंगराव पेरीडकर ...

लक्ष्मी आनंदा कुंभार भावपूर्ण श्रद्धांजली....

Image
*कुंभारवाड्यावरची मायेची सावली हरपली*… *मनोजकुमार मस्के, मांगरूळ*  आज सकाळी जशीच बातमी कानावर आली, तसं मन एकदम सुन्न झालं. “कुंभाराची नानी राहिली नाही…” हे शब्द ऐकून अंगावर अक्षरशः काटा आला. पाय जणू थबकले. दुकानावर जाण्याचा विचार तिथेच थांबला. मनाला पटत नव्हतं, म्हणून फोन लावला… पण बातमी खरीच होती. आणि त्या क्षणी जाणवलं — *कुंभारवाड्याचा आधारवड कोसळला*… नानी म्हणजे फक्त एक व्यक्ती नव्हती, ती एक भावना होती… मायेचा ओलावा होता… कष्टाचं जिवंत उदाहरण होती. आयुष्यभर काबाडकष्ट करत तिनं संसाराचा गाडा ओढला. कितीही थकली असली तरी “काम” हा तिचा श्वासच होता. हात कधीच थांबले नाहीत. अंगात ताकद उरली नसली तरी मनानं ती नेहमीच खंबीर उभी राहिली. कुंभारवाड्यावर गेलं की नानी दिसायचीच — कधी भाकरी थापताना, कधी गुरं सांभाळताना, तर कधी कुणाच्या तरी मदतीला धावून जाताना. तिच्या चेहऱ्यावरचा साधेपणा आणि डोळ्यातली माया… ते दृश्य आजही डोळ्यासमोर उभं राहतंय. *“बाळा…”*  हा तिचा शब्द अजूनही कानात घुमतोय. कोण आपलं, कोण परकं — हा भेद तिनं कधीच केला नाही. गावातलं प्रत्येक मूल तिच्यासाठी “बाळा”च होतं. आ...