*पेरीडच्या मैदानात सुरज पाटील याला आदर्श कुस्ती भूषण पुरस्काराने सन्मानित केले*....
*पेरीडच्या मैदानात सुरज पाटील याला आदर्श कुस्ती भूषण पुरस्काराने सन्मानित केले*....
मनोजकुमार मस्के -
खन- खन शड्डूचा आवाज करत मैदानातील प्रेक्षकांची मने जिंकणारा आणि काही मिनिटात चितपट कुस्ती करून विजय प्राप्त करणारा त्याचबरोबर अनेक पथकांचा मानकरी ठरलेला चित्तूर गावचा ढान्या वाघ पैलवान सुरज पाटील याला पिरेड येथील भव्य कुस्ती मैदानात आदर्श कुस्तीपटू म्हणून पुरस्काराने सन्मानित केले. चांगल्या पैलवानांचा आदर करणारे आणि पैलवानांना येथोचित्त मान देणारे पेरीडगाव हे पहिल्यापासूनच प्रसिद्ध आहे. या गावातील अनेक मल्ल मोठ्या हुद्द्यावर आहेत. त्याचबरोबर कुस्तीवर अतोनात प्रेम करणारे या गावातील सर्व गावकरी तसेच परिसरातील लोक पेरीडचे मैदान पाहण्यासाठी आवर्जून हजेरी लावत असतात.
अतिशय गरीब घरातील सुरज पाटील हा पैलवान शाहुवाडी तालुक्यातील शित्तूर गावचा असून सुरवातीला मुंबई येथील लक्ष्मी नारायण व्यायाम शाळेत तो सराव करत होता. सध्या सुरज कोल्हापूर येथील हिंदकेसरी दादू चौगुले मामा यांच्या तालमीत कुस्तीचा सराव करत आहे. अलीकडील काळात अनेक महान पैलवानांवर विजय मिळवत सुरज ने प्रेक्षकांची मने जिंकली आहेत. पाकिटात किती पैसे आहेत यावरून सुरजने कधीही आयोजकांसी तक्रार केली नाही. मिळेल ते मानधन घेऊन सुरजणे आपली कुस्तीची घोडदौड पुढे कायम चालू ठेवली. खऱ्या अर्थाने या पेरीड गावाने सुरजचा येथोचित्त सन्मान करून तालुक्यात जिल्ह्यात एक आदर्श निर्माण करून दिला आहे. प्रत्येक वर्षी चांगल्या प्रामाणिक आणि कष्टाळू पैलवानाला या मैदानात पुरस्काराने सन्मानित केले जाते. पेरीड गावचे लाडके नेतृत्व पैलवानकीतुनच राजकीय क्षेत्रात आपली छाप पाडणारे, कोल्हापूर जिल्हा परिषदेचे माजी बांधकाम सभापती , जिल्हा बॅंकेचे माजी संचालक, मा सर्जेराव पाटील दादा. त्याचबरोबर एक कर्तव्यदक्ष अधिकारी म्हणून ज्यांनी नावलौक मिळवला ते याच गावचे सुपुत्र माबाजीराव पाटील साहेब यांच्या उपस्थितीत हा पुरस्कार देण्यात आला. यावेळी पैलवान रंगराव पाटील पेरिलकर, सचिन पाटील मुंबई पोलीस, शाहूवाडी कुस्ती हेच जीवन चे अध्यक्ष अशोक सावंत, उपाध्यक्ष संपत पाटील, त्याचबरोबर पेरीड गावातील अनेक महान पैलवान, सरपंच, उपसरपंच, सदस्य उपस्थित होते. सुरत सारख्या प्रामाणिक पैलवानाला पेरीडच्या मैदानात पुरस्कार देऊन पुन्हा एकदा पिरीड गावाने आपला आदर्श कायम तालुक्याच्या पुढे व जिल्ह्याच्या पुढे ठेवला हे मात्र नक्की......
Comments
Post a Comment