*हक्काचा माणूस संग्रामसिंह (बाबा)*
* हक्काचा माणूस संग्रामसिंह (बाबा)* करडा आवाज, रोखठोक बोलणे, कार्यकर्त्यावर विश्वास, आणी मनाने हळवा असणारा आमचा हक्काचा माणूस संग्रामसिंह पाटील (बाबा) कै. कृष्णराव पाटील उद्योग समूहाच्या माध्यमातून गावातील व परिसरातील अनेक युवकांना रोजगाराची संधी उपलब्ध करून देणारी ही मांगरूळ गावातील पहीली व्यक्ती असं म्हटलं तर काय वावगं ठरणार नाही. आज संग्रामसिंह पाटील (बाबा) यांच्याकडे लोकं हक्काने आपली कामे घेऊन येतात. अनेकांची कामे स्वतःच्या खिशातून करणारा हा नेता खऱ्या अर्थाने अनेकांचा हक्काचा माणूस बनला आहे. कोणतेही काम हक्काने सांगावे असा हा माणसातला माणूस म्हणून अनेकांना परीचीत आहे. रात्री अपरात्री उठून संग्राम बाबांनी अनेक लोकांना मदत केली आहे. मदत करत असताना कोण कुठल्या पक्षाचा आहे, ज्या माणसाला मदत केली तो परत करेल का? नाही. अशा कुठल्याही शंका मनात येत नाहीत. त्यावेळी समोरच्या व्यक्तीचे काम महत्वाचे एवढंच या माणसाच्या डोक्यात असतं. संग्रामसिंह पाटील (बाबा) यांचा स्वभाव स्पष्ट बोलने हा आहे. त्...