*मुंबईत रंगणार ३२ वी अखिल भारतीय महापौर केसरी कुस्ती स्पर्धा*
*मुंबईत रंगणार ३२ वी अखिल भारतीय महापौर केसरी कुस्ती स्पर्धा* *मनोजकुमार मस्के, मांगरुळ* बृहन्मुंबई महानगरपालिका व मुंबई शहर तालीम संघ यांच्या संयुक्त विद्यमाने ३२ वी अखिल भारतीय मुंबई महापौर केसरी कुस्ती स्पर्धा २०२५-२६ चे आयोजन करण्यात आले असून, देशभरातील नामांकित मल्ल या स्पर्धेत सहभागी होणार आहेत. ही प्रतिष्ठेची स्पर्धा १४ व १५ मे २०२६ रोजी भारतीय क्रीडा मंदिर, नारायण क्रॉस रोड, वडाळा, मुंबई येथे रंगणार आहे. महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर संघाच्या मान्यतेने आयोजित करण्यात आलेल्या या स्पर्धेमुळे मुंबईतील कुस्तीप्रेमींमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे. स्पर्धेमध्ये विविध वजन गटांमध्ये सामने होणार असून विजेत्या मल्लांना आकर्षक रोख बक्षिसे, चषक व प्रशस्तीपत्र देण्यात येणार आहेत. महापौर केसरी गटात ८२ किलोपेक्षा अधिक वजन गटासाठी प्रथम क्रमांकाला तब्बल १ लाख रुपयांचे बक्षीस जाहीर करण्यात आले आहे. तसेच द्वितीय, तृतीय व चतुर्थ क्रमांकासाठी अनुक्रमे ५१ हजार, ३२ हजार आणि २२ हजार रुपयांची बक्षिसे ठेवण्यात आली आहेत. ५० ते ६० किलो वयोगटातील (१७ वर्षांखालील) मल्लांसाठीही स्वतंत्र ग...