तालमी बंद असल्याने पैलवानांना 'लाईव्ह' धडे
- मनोजकुमार मस्के - चिखली :- आज जगावर कोरोना सारखं महाभयंकर संकट आले आसताना आख्खा देश घरामध्ये आहे. ईतकं भयानक संकट येईल असं स्वप्नातही आले नाही. सुपर फास्ट धावणारा देश जाग्यावरच उभा राहिला आख्खी आर्थव्यवस्था ढासळली आणि देवावर विश्वास ठेवणारी जनता सरकारच्या धावा करू लागली. जगातील सर्व देवांनी आपापली दारे खिडक्या लावून घेतली तेंव्हा माणूसपण विसरलेल्या माणसाला माणसात देव दिसू लागला. देशाचा खजिना खाली होवू लागला. लोकं मिळेल ती मदत करू लागली. याच भावनेने संस्थापक कुस्ती हेच जीवन या संघटनेने पंतप्रधान मदत निधनिधीसाठी 12000 चा निधी मदत म्हणून दिला. तसेच एक वर्ष पुर्ण झाल्याबद्दल या संघटनेच्या माध्यमातून अनेक गरजुंना मदतीचे कीट देण्यात आले. एकच वर्ष झाले या संघटनेला . कुस्ती हेच जीवन नेहमीच मदतीचा हात पुढे करत असते. यानंतर मुख्यमंत्री मदत निधनिधीसाठी सुद्धा काही मदत करणार असल्याचे संस्थापक पै.रामदास देसाई सर यांनी सांगितले. या लाॅकडाउन च्या काळात फेसबुक, युट्यूब च्या माध्यमातून अनेक पैलवानांना फेसबुक लाईव्ह आणुन मार्गदर्शन दिले. अनेक डावांची माहीती ,अनेक जुन्या पैलव...