Posts

Showing posts from June, 2025

वाढदिवसानिमित्त विशेष लेख: सौ. रेणुकादेवी सत्यजित देशमुख –

Image
सौ. रेणुकादेवी सत्यजित देशमुख : संस्कार, समर्पण आणि सौजन्याची तेजस्वी ओळख काही व्यक्तिमत्त्वे अशी असतात की त्यांचा मोठेपणा पद, प्रसिद्धी किंवा सत्तेमुळे नव्हे, तर त्यांच्या साधेपणामुळे, सुसंस्कृत वागणुकीमुळे आणि माणुसकीच्या जिव्हाळ्यामुळे अधोरेखित होत असतो. अशाच व्यक्तिमत्त्वांपैकी एक नाव म्हणजे सौ. रेणुकादेवी सत्यजित देशमुख. आज त्यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांच्या जीवनप्रवासाकडे पाहताना केवळ एका गृहिणीचे नव्हे, तर एका सुसंस्कृत कुटुंबव्यवस्थेच्या केंद्रबिंदूचे, समाजाभिमुख विचारांच्या स्त्रीचे आणि आदर्श मातृत्वाचे दर्शन घडते. प्रत्येक यशस्वी पुरुषामागे एका स्त्रीचे मोलाचे योगदान असते, हे वाक्य आपण नेहमी ऐकतो. मात्र त्याचे जिवंत उदाहरण जर पाहायचे असेल, तर देशमुख कुटुंबाकडे पाहावे लागेल. आमदार सत्यजित देशमुख यांच्या सामाजिक, राजकीय आणि लोकाभिमुख कार्याच्या भक्कम पायामध्ये सौ. रेणुकादेवी यांचे मूक पण अत्यंत प्रभावी योगदान आहे. त्या कधी प्रकाशझोतात येण्याचा प्रयत्न करत नाहीत; मात्र त्यांच्या शांत, संयमी आणि समंजस स्वभावामुळे अनेक कार्यांना दिशा मिळते. सौ. रेणुकादेवी यांचे व्यक्त...

गुरुमाऊली कृष्णातमामा

Image
*गुरुमाऊली कृष्णातमामा*  गुरूमाऊली बाळूमामा, हे एक प्रसिद्ध संत आणि योगी होते. ते त्यांच्या चमत्कारांसाठी आणि साधेपणा आणि दयाळूपणाच्या शिकवणीसाठी ओळखले जातात. त्यांचे भक्त कृष्णात पडवळे मामा यांना बाळूमामांचे व विठ्ठल बिरूदेव मामा यांचा आशीर्वाद कृष्णात मामा यांना लाभला आहे. कृष्णात मामा सतत मेंढरां सोबत तळावरच असतात. अनेक भक्त कृष्णात मामा यांना 'गुरूमाऊली' म्हणून संबोधतात. आज कृष्णातमामांचा वाढदिवस त्यानिमित्त  कृष्णात मामा कोण आहेत? कृष्णातमामा जन्म 20 जुन 1991 रोजी कोल्हापूर जिल्ह्यातील भुदरगड तालुक्यातील वाघापूर गावात झाला. त्यांचे खरे नाव कृष्णात लक्ष्मण पडवळे आहे. त्यांचे शिक्षण जेमतेमच झाले. वडिलोपार्जित मेंढपाळाचा व्यवसाय आणि बाळुमामाची भक्ती त्यांचे बालपण आणि तरुणपण मेंढपाळ म्हणनच गेले. त्यांनी लोकांची खूप मदत केली आणि त्यांच्या अडचणी सोडवल्या.  गुरूमाऊली का म्हणतात? कृष्णातमामा त्यांचे भक्त 'गुरूमाऊली' म्हणतात कारण त्यांनी लोकांना प्रेम, दया आणि सेवेचा मार्ग शिकवतात. ते लोकांना आध्यात्मिक मार्गदर्शन करतात आणि त्यांच्या दु:खांवर उपाय सांगतात . त्या...