Posts

आज शिराळा तहसील कार्यालयावर सकल मराठा समाजाचा मोर्चा

Image
आज शिराळा तहसील कार्यालयावर सकल मराठा समाजाचा मोर्चा मांगरूळ ,  : मराठा समाजाच्या आरक्षणाच्या मागणीसाठी आमरण उपोषण करणारे मनोज पाटील जरांगे  यांना पाठिंबा देण्यासाठी मांगरूळ येथील मराठा समाजाच्या वतीने शिराळा तहसील कार्यालयावर आज ( दि . 1 ) नोव्हेंबर रोजी मोर्चा काढण्यात येणार  . मराठा समाजाच्या आरक्षणासाठी 7 दिवसांपासून मनोज पाटील- जरांगे आमरण उपोषणाला बसले आहेत . तसेच त्यांच्या उपोषणाला पाठिंबा म्हणून शिराळा तालुक्यातील मौजे मांगरूळ येथील निलेश मस्के पाटील हे तहसिल कार्यालयासमोर आरक्षण मिळावे या मागणीचे निवेदन घेऊन जाणार आहेत. मांगरूळ बस स्टॉप येथून सकाळी १०.०० च्या दरम्यान मोर्चाला सुरुवात होईल . यावेळी घोषणाबाजी करत , आपल्या मागण्यांचे फलके हातात घेऊन , टाळ मृदंगाचा गजर करीत हा मोर्चा तहसील कार्यालयावर धडकेल . यावेळी मराठा समाज बांधव मोठ्या संख्येने रहावे असे आव्हान निलेश मस्के पाटील यांनी केले.

मोदीजी पंतप्रधान असतानाच पवारसाहेबांना ‘पद्मविभूषण’ पुरस्कार कोणत्या कारणाने दिला?- मधुकर भावे

Image
मोदीजी पंतप्रधान असतानाच पवारसाहेबांना ‘पद्मविभूषण’ पुरस्कार कोणत्या कारणाने दिला? - मधुकर भावे देशाचे पंतप्रधान श्री. नरेंद्रजी मोदी यांनी अहमदनगर जिल्ह्याचा दौरा केला. या दौऱ्यात काही विकासकामांचे लोकार्पण झाले. ‘श्री. शरद पवार हे कृषीमंत्री असताना त्यांनी काय केले?’ असा एक राजकीय प्रश्न या विकास कामांच्या लोकार्पणात पंतप्रधानांनी विचारला. निळवंडे धरणाच्या डाव्या कालव्याचे पाणी सोडण्याचे लोकार्पण त्यांनी केले. विकासकामांच्या कार्यक्रमात राजकीय विषय पंतप्रधान असलेल्या नेत्याने सहसा आणू नयेत. निवडणुकीच्या भाषणात ते ठीक आहेत. परंतु, श्री. शरद पवार यांच्याबद्दल त्यांनी जो प्रश्न विचारला त्यामुळे महाराष्ट्रात चर्चा होणे स्वाभाविक आहे... कारण, पवारसाहेबांनी कृषीमंत्री असताना काय केले... त्याहीपेक्षा त्यांच्या कृषीमंत्रीपदाच्या काळानंतर २०१७ साली श्री. मोदी पंतप्रधान असताना त्यांच्याच सरकारच्या शिफारशीने राष्ट्रपतींच्या हस्ते श्री. शरद पवार यांना कृषी आणि सहकार क्षेत्रातील प्रभावी कामाबद्दल पद्मविभूषण किताब सन्मानपूर्वक देण्यात आला. याची मोदींजींना कल्पना असेलच... त्यावेळचे राष...

*मांगरूळ येथील एक तरुण तडफदार सामाजिक कार्यकर्ते निलेश मस्के पाटील रविवारी सकाळी उपोषणाला बसणार*

Image
*मांगरूळ येथील एक तरुण तडफदार सामाजिक कार्यकर्ते निलेश मस्के पाटील रविवारी सकाळी उपोषणाला बसणार* श्रद्धेय मनोज जरांगे पाटील यांनी आपल्या मराठी समाजासाठी अन्न पाणी त्याग करून उपोषण सुरू केले आहे. आमचेही समाजप्रती त्यांना पाठिंबा देणे कर्तव्य आहे.  राज्यसभा असो व लोकसभा असो अशा या राजकारण्यांना आम्ही मराठा समाज गाव बंद आंदोलन आमच्या पातळीवरती करू इच्छित आहे. यामध्ये गावचे स्थानिक पुढारी यांनी पुढाकार घेऊन मराठ्यांच्या पाठीशी उभा राहणे अपेक्षित होते. परंतु तेरी भी चूप मेरी चूप... या भूमिकेचे बरेच जण दिसत आहेत. म्हणूनच मी निलेश मस्के पाटील आपणा सर्वांना आवाहन करतो की मी स्वतः रविवार दिनांक 29 ऑक्टोबर 2023 रोजी सकाळी ठीक नऊ वाजता एक दिवशीय उपोषणाला बसत आहे. मी माझे कर्तव्य पार पाडत असून आपणही आपले कर्तव्य पार पाडावे अशी माझी अपेक्षा आहे. खरतर आंदोलन करताना पाठिंबा देणे गरजेचे असताना  जेणेकरून आमच्या मराठा बांधवांच्या भावना सर्व लोकप्रतिनिधींना समजावे आमच्या मराठा समाजाच्या आर्थिक व शैक्षणिक मागासलेपणा दूर होण्यासाठी आम्हाला किंवा आमच्या मुलाबाळांना आरक्षणाची नितांत गरज ...

पुरोगामी विचारांचे जागरण करणारा जयसिंगपूरचा विचारमंच- मधुकर भावे

Image
पुरोगामी विचारांचे जागरण करणारा जयसिंगपूरचा विचारमंच- मधुकर भावे १२ अॅाक्टोबरला जयसिंगपूरला गेलो होतो. रत्नाप्पाण्णा कुंभार  यांची ११४ वी जयंती होती. रत्नाप्पाण्णा कोण? महराष्ट्रातील नवीन पिढीला माहितीही नसेल...  गेल्या १०० वर्षांत देशाचे स्वातंत्र्य मिळवण्यासाठी तुरुंगवास आणि सर्व काही हाल-अपेष्टा भोगलेले कितीतरी काळाच्या पडद्याआड आहेत. त्यांची आठवणही नाही. स्वातंत्र्य मिळाल्यानंतर  देशाच्या आणि या महाराष्ट्राच्या बांधणीसाठी ‘सेवा-समर्पण आणि त्याग’ या मंत्रावर ज्यांनी आयुष्ये झोकून दिली... असे अनेक दिग्गज  या महाराष्ट्रात आहेत.  ती राजकीय क्षेत्रात आहेत... सामाजिक क्षेत्रात आहेत... आजचे स्वातंत्र्य किंवा आजचा महाराष्ट्र कोणी कसा उभा केला... हे नवीन पिढीला सांगणाऱ्या तरुणांच्या संघटनाही फार नाहीत. ज्या संघटना किंवा जे कार्यकर्ते तळमळीने अशा विषयांत काम करतात त्यांच्या निष्ठेला वंदनच केले पाहिजे. त्याग करणारे नेते आता जसे नाहीत... त्याचप्रमाणे अशा निष्ठा ठेवून या जुन्या िपढीला नवी पिढीसमोर आदर्श ठेवणारे दुर्मिळ आहे. जयसिंगपूरचा ‘रत्नाप्पाण्णा विचार मं...

मनापासून श्रद्धा असेल तर परमेश्वर देवळात न जाता ‍ घरी येऊन भेटतो

Image
मनापासून श्रद्धा असेल तर परमेश्वर देवळात न जाता ‍ घरी येऊन भेटतो मनापासून श्रद्धा असेल तर परमेश्वर देवळात न जाता ‍ घरी येऊन भेटतो... हे अनेक वेळा वाचलं आहे. परंतु श्रद्धा असेल आणि तीही प्रामाणिक असेल तर घडू शकतं याचं उदाहरण म्हणजे साक्षात माझ्या दैवताने मला दर्शन दिले.. ते ही आमच्या घरात खरंच मी धन्य झालो. दिनांक 12/ 10 /2023 रोजी महाराष्ट्राचा चालता बोलता इतिहास व माझे गुरु, माझे दैवत असणारे ज्येष्ठ पत्रकार आदरणीय मधुकरजी भावे साहेब यांनी आमच्या घरी येऊन मला व माझ्या कुटुंबाला आशीर्वाद दिले.  माझ्या आयुष्यातील हा सगळ्यात मोठा क्षण होता. आज साहेबांचे 85 वर्ष वय असताना देखील आमच्या घरातील उंच असणाऱ्या पायऱ्या चढून आमच्या घरात येऊन आमच्या कुटुंबाला जवळ घेऊन जो मायेचा हात त्यांनी पाठीवरून फिरवला त्या हाताच्या स्पर्शाने आमच्या आनंदाला पाराच उरला नाही. आमचे कुटंब मुलं, माझी पत्नी आम्ही सारे अगदी भारावून गेलो.      माझ्या आयुष्यात भावे साहेब माझं दैवत बनून आले.  समाजात जगत असताना  प्रामाणिकपणा कसा जपायचा हे त्यांनी मला शिकवले.  अनेक म...

आभार आणि नमस्कार

Image
आभार आणि नमस्कार - मधुकर भावे ९ अॅक्टोबर... या वाढदिवसादिनी अनेक प्रिय मित्रांनी, वाचकांनी प्रत्यक्ष फोन करून, समाज माध्यमांद्वारे त्यांच्या अत्यंत प्रेमाच्या आणि शुभेच्छांच्या भावना व्यक्त केल्या.  त्या सर्वांच्या ऋणातून कसे मुक्त होता येईल... त्या क्षणाला मनाला असे वाटत होते की, मी  आज जगातील सगळ्यात श्रीमंत माणूस आहे. त्यात भर पडली माझी प्रिय कन्या नेत्रविशारद डॉ. मृदुला हिने या वाढदिवसाला औक्षण करताना, मला चक्क तीन पुस्तके भेट दिली. डॉ. मृदुला आता ५२ वर्षाची आहे. तिने मला पहिल्यांदाच पुस्तकांची भेट दिली.  तिने आजपर्यंत दिलेल्या अनेक भेटींपेक्षा हीच सर्वोत्तम भेट आहे. त्यातही ग. दी. माडगुळकरांचा ‘बांधावरच्या बाभळी’, हा कथासंग्रह, सुधा मूर्ती यांचे ‘परिघ’, आणि लक्ष्मण गायकवाड यांचे ‘उचल्या’ ही तीन पुस्तके हा वाढदिवसाचा खूप मोठा ठेवा  आणि मेवा आहे. त्यातील दोन पुस्तके वाचली होती. सुधा मूर्ती यांचे ‘परिघ’  मूळ पुस्तक वाचले होते. उमाताई कुलकर्णी यांनी केलेल्या अनुवादाचे हे पुस्तक छानच आहे... शिर्डीहून आल्याआल्या रातोरात वाचून काढले. लक्ष्मण गायकवाड या...

दोस्तीतला राजा माणूस हरपला..,..

Image
दोस्तीतला राजा माणूस हरपला..,.. आज सकाळीच अत्यंत वाईट एक वार्ता कळली संभाजी चंदर पवार हे आमच्या अत्यंत जवळचे मित्र अचानक आमच्यातून निघून गेले.  शांत स्वभावाचे, कुणालाही उलट न बोलणारे, अगदी सांगेल ते काम करणारे संभाजी पवार नाना हे अचानक आमच्यातून निघून गेले हा विश्वासच बसला नाही. हा माणूस अतिशय शांत होता. लहान पोराने जरी काम सांगितलं तरी ते ऐकणारी मानसिकता त्यांच्या मनात होती. आम्ही फार लहानपणापासून एकत्र, खरं पाहता स्वामी समर्थ बहुउद्देशीय सामाजिक संस्था, या संस्थेचे ते उपाध्यक्ष आहेत. आम्ही सगळे मिळून एकत्र काम करत होतो. नानांच्याच विचारातून पुढे आलेले काम ते म्हणजे थळपांढर देविचा चौथरा बांधने. आमच्याकडे त्यावेळेला पैसे नव्हते परंतु शिवा तांबिरे, विनोद सापते, मनोज मस्के अशी बरीचशी मंडळी आम्ही एकत्र आलो आणि अतिशय अडचणीत असणारी आमची थळपांढर देवी बाहेर काढून तिला चौथरा बांधायचं ठरवलं.संभाजी नानांनी फुकट काम करायचं सांगितलं, बाकीच्यांनी दगडाच्या ट्रॉल्या काढल्या, कुणी सिमेंट गोळा केलं प्रत्येक जण स्वत: कामावर राबत होता. स्वतः  संभाजी पवार हे बांधकाम करत होते. आज सुद्ध...