*मांगरूळ येथील एक तरुण तडफदार सामाजिक कार्यकर्ते निलेश मस्के पाटील रविवारी सकाळी उपोषणाला बसणार*
*मांगरूळ येथील एक तरुण तडफदार सामाजिक कार्यकर्ते निलेश मस्के पाटील रविवारी सकाळी उपोषणाला बसणार*
श्रद्धेय मनोज जरांगे पाटील यांनी आपल्या मराठी समाजासाठी अन्न पाणी त्याग करून उपोषण सुरू केले आहे. आमचेही समाजप्रती त्यांना पाठिंबा देणे कर्तव्य आहे. राज्यसभा असो व लोकसभा असो अशा या राजकारण्यांना आम्ही मराठा समाज गाव बंद आंदोलन आमच्या पातळीवरती करू इच्छित आहे. यामध्ये गावचे स्थानिक पुढारी यांनी पुढाकार घेऊन मराठ्यांच्या पाठीशी उभा राहणे अपेक्षित होते. परंतु तेरी भी चूप मेरी चूप... या भूमिकेचे बरेच जण दिसत आहेत. म्हणूनच मी निलेश मस्के पाटील आपणा सर्वांना आवाहन करतो की मी स्वतः रविवार दिनांक 29 ऑक्टोबर 2023 रोजी सकाळी ठीक नऊ वाजता एक दिवशीय उपोषणाला बसत आहे. मी माझे कर्तव्य पार पाडत असून आपणही आपले कर्तव्य पार पाडावे अशी माझी अपेक्षा आहे. खरतर आंदोलन करताना पाठिंबा देणे गरजेचे असताना जेणेकरून आमच्या मराठा बांधवांच्या भावना सर्व लोकप्रतिनिधींना समजावे आमच्या मराठा समाजाच्या आर्थिक व शैक्षणिक मागासलेपणा दूर होण्यासाठी आम्हाला किंवा आमच्या मुलाबाळांना आरक्षणाची नितांत गरज आहे. त्यासाठी आमच्या मराठा समाजाच्या वतीने मनोज जरांगे पाटील यांना जाहीर पाठिंबा दर्शवण्यासाठी नेत्यांना गाव बंद आंदोलन करावयाचे आहे. तरी एकदिवसीय उपोषनासाठी स्वतः मी निलेश मस्के पाटील स्टँड परीसरात बसणार आहे .गावातील सकल मराठा बांधव यांनी उद्या सकाळी ठीक नऊ वाजता एसटी स्टँड मांगरूळ येथे जमून आंदोलनास पाठिंबा जाहीर करावा आपला निलेश मस्के पाटील
Comments
Post a Comment