आज शिराळा तहसील कार्यालयावर सकल मराठा समाजाचा मोर्चा
आज शिराळा तहसील कार्यालयावर सकल मराठा समाजाचा मोर्चा
मांगरूळ , : मराठा समाजाच्या आरक्षणाच्या मागणीसाठी आमरण उपोषण करणारे मनोज पाटील जरांगे यांना पाठिंबा देण्यासाठी मांगरूळ येथील मराठा समाजाच्या वतीने शिराळा तहसील कार्यालयावर आज ( दि . 1 ) नोव्हेंबर रोजी मोर्चा काढण्यात येणार .
मराठा समाजाच्या आरक्षणासाठी 7 दिवसांपासून मनोज पाटील- जरांगे आमरण उपोषणाला बसले आहेत . तसेच त्यांच्या उपोषणाला पाठिंबा म्हणून शिराळा तालुक्यातील मौजे मांगरूळ येथील निलेश मस्के पाटील हे तहसिल कार्यालयासमोर आरक्षण मिळावे या मागणीचे निवेदन घेऊन जाणार आहेत. मांगरूळ बस स्टॉप येथून सकाळी १०.०० च्या दरम्यान मोर्चाला सुरुवात होईल . यावेळी घोषणाबाजी करत , आपल्या मागण्यांचे फलके हातात घेऊन , टाळ मृदंगाचा गजर करीत हा मोर्चा तहसील कार्यालयावर धडकेल . यावेळी मराठा समाज बांधव मोठ्या संख्येने रहावे असे आव्हान निलेश मस्के पाटील यांनी केले.
Comments
Post a Comment