Posts

जगाचा पोसिंदा अडचणीत आहे.किमान पंचनामे तरी शेतकऱ्याच्या बांधावर जाऊन करा.

Image
जगाचा पोसिंदा अडचणीत आहे. किमान पंचनामे तरी शेतकऱ्याच्या बांधावर जाऊन करा.  मनोजकुमार मस्के बघता बघता वर्ष संपत आले. जन्मभर विसरता येणार नाही असं हे वर्ष होते. २०२०  या वर्षांत जनता घाबरली. संपूर्ण जग शांत होते. शेतकर्यांनी धान्याची, पैसेवाल्यांनी पैश्याची मिळेल ती मदत  केली. पैपाहुणे ऐकमेकाकडे येणे बंद झाले. सरकारने रेशनच्या माध्यमातून प्रत्येकाला धान्य पुरविले अनेकांच्या पोटाचा प्रश्न संपला असला तरी या संपूर्ण महामारीत पुरता मेला तो शेतकरी, कारण पेरणीपूर्वी महामारीचे सावट, पेरणीनंतर लाॅकडाउनमुळे अंतर मशागत करण्यास मजुरांची टंचाई, पिक काढणिच्या वेळी पावसाने झोडपले, आणि त्यातुन काही उरलेसुरलेले धान्य  शेतातुन  काढण्यासाठी रोजगारी मिळत नसल्याने शेतकरी पुरता बेजार झाला असल्याचे चित्र ग्रामीणभागात दिसत आहे.            रोजंदारी करणाऱ्यांची संख्या खुपचं कमी झाली. त्यामुळे अनेक शेतकऱ्यांना एकत्र येऊन पैरा पद्धत करूनच पिकांची पेरणी आणी काढणी करावी लागत आहे.    तंत्रज्ञानाचा वापर झाला खरा पण या तंत्रज्ञानाने माणूस...

*मा भिमराव (उर्फ) राहुल पाटील वाढदिवस विशेष*.

Image
*मा भिमराव (उर्फ) राहुल पाटील वाढदिवस विशेष*. शिराळा तालुक्यातील तडवळे गावचे सुपुत्र मा भिमराव पाटील यांचा आज वाढदिवस  भिमराव यांचे प्राथमिक, माध्यमिक शिक्षण गावातच झाले, आणि उच्च शिक्षण शिराळा येथे पुर्ण झाले  खरं सांगायचं झालं तर भिमराव पाटील यांची घरची परिस्थिती तशी जेमतेमच पण , लहानपणापासून भिमराव पाटील यांचा मित्र समुह तसा मोठाच. या मित्र परिवारात त्यांना एक सवय मात्र लागली ती म्हणजे सामाजिक बांधिलकीची. गावातील कोणतेही सामाजिक काम असो ते अगदी हसतमुखाने करत.गावात राहुन गावाची सेवा करायची ही त्यांची मनोमन ईच्छा असायची, पण पोटाचा प्रश्न निर्माण व्हायला लागला, गावात तालीम नाही की व्यायाम शाळा नाही, पण लाल मातीवर प्रेम मात्र भारी. गावातील जत्रेत मात्र पुढे होऊन काम करण्याची  त्यांची सवय मात्र आजही कायम आहे. पोटासाठी गाव सोडावे लागले. मुंबईत छोटे मोठे काम करत गावासाठी काय करता येईल का हा त्यांचा मनोमन विचार असायचा, सुरवातीला हा माणुस भाजी मार्केट मध्ये काम करणारा आज एका भायखळा मुंबई सारख्या शहरात भाजी मार्केटमध्ये मोठा व्यापारी आहे, हे सर्व करत असताना शिराळा वा...

*_महाराष्ट्र राज्याच्या निर्मितीपासून जडण-घडणेचे साक्षीदार महाराष्ट्राचा ज्ञानकोष, ज्येष्ठ विचारवंत, संपादक व पत्रकार मधुकर भावे यांचा 9 ऑक्टोबर हा जन्मदिवस. आज ते 82 व्या वर्षात पदार्पण करत आहेत.त्यांना आई तुळजा भवानी व साई बाबा उदंड आरोग्यदायी आयुष्य देवो.

Image
*_महाराष्ट्र राज्याच्या निर्मितीपासून जडण-घडणेचे साक्षीदार महाराष्ट्राचा ज्ञानकोष, ज्येष्ठ विचारवंत, संपादक व पत्रकार मधुकर भावे यांचा 9 ऑक्टोबर हा जन्मदिवस. आज ते 82 व्या वर्षात पदार्पण करत आहेत.त्यांना आई तुळजा भवानी व साई बाबा उदंड आरोग्यदायी आयुष्य देवो.भावे सरांना त्यांच्या बाबतीत कोणी लिहलेले आवडत नाही.त्यांच्यावर लिहण्या एवढी माजी उंचीही नाही.तरी ही त्यांच्या सहवासातून मला अनुभवता आलेले भावे सर त्यांची पुर्व परवानगी न घेता लिहण्याचा हा टोकडा प्रयत्न.सर माफ करा..._* *'भाव'लेले भावे सर!* *"होय मी भावे आहे!जरुर पण पु.भा.भावेंच्या नव्हे तर विनोबा भावेंच्या कुळीतील.आणि ते व्रत शेवटपर्यंत जपेन'* असे व्यासपीठावरुन ठणकावून सांगणारे मधुकर भावे सर पाहिले की कुठला जातीयवाद मनात येत नाही त्याचा स्पर्शही जाणवत नाही. आजच्या म्हणजे जातीय विभाजनाच्या काळात तर त्यांचं हे व्यक्तीमत्व अधिकच उठून दिसतं. व्यासपीठावर भावे सर कुठंही असले तरी त्याचं अस्तित्व उजळून येण कुणाला नाकारता येत नाही. महाराष्ट्रातला कोणताही राजकारणी त्यांना टाळू शकत नाही. उलट त्यांचा सल्ला घेतो. वयो...
Image
*मा प्रताप (भाऊ) कदम वाढदिवस विशेष* .....  ................................ जिवंत नागाची पुजा करणारे गाव म्हणून महाराष्ट्रात आणि महाराष्ट्राबाहेर ओळख असणारे गाव नागपंचमीचे ३२, शिराळा, पैलवानांची खान म्हणून प्रसिद्ध असणारा हा तालुका आहे. आणि याच तालुक्यातील  तांबड्या मातीची अविरतपणे सेवा करणारे सर्वांचे लाडके कुस्ती प्रेमी आणि कुस्तीसाठी सदैव सेवा देण्यास बांधील असणारे *आमचे मित्र व कुस्ती प्रसारक प्रतापसिंह कदम (भाऊ)*. एकदम सच्चा दिलाचा दिलदार, तोंडावर रोखठोक बोलणं पटलं तर ठिक, नाही पटलं तर त्याहुन ठीक माननारा प्रताप कदम . आमची ओळख तशी कुस्तीच्या मैदानावरच झाली.     अनेक मैदानामध्ये आयोजकांना सन्मानपत्र देऊन सन्मान करणारा हा अवलिया कोण मला जाणून घेण्याची उत्सुकता लागली. मी न राहुन प्रतापराव कदम यांना विचारले  तुम्ही प्रत्येक गावच्या मैदानात प्रमाणपत्र देता याच्या मागचा उद्देश काय? तेंव्हा प्रतापभाऊंनी जे उत्तर दिले ते म्हणजे *आज जी कुस्ती लयास चालली आहे ती कुठतरी टीकावी ,वाढावी म्हणून मी पदरमोड करून हे कार्य चालु केले आहे*. खुपचं बरं वाटलं हे वा...

मांगरूळच्या श्रीमती रूक्मीणि कृष्णराव पाटील यांचे हृदयविकाराणे निधन

Image
मांगरूळच्या श्रीमती रूक्मीणि कृष्णराव पाटील यांचे हृदयविकाराणे निधन श्रीमती रूक्मिणी कृष्णराव पाटील यांचे दि. ०९/०९/२० रोजी रात्री ९.०० वाजता  हृदयविकाराने निधन झाले. त्या ८२ वर्षाच्या होत्या.    रूक्मिणी पाटील (काकू)  यांचेवर कोल्हापूर येथे खाजगी रूग्नालयात उपचार सुरू होते. उपचारादरम्यानच त्यांचे निधन झाले.        पती कृष्णराव पाटील (गुरूजी) यांच्या निधनानंतर श्रीमती रूक्मिणी कृष्णराव पाटील यांनीच आपल्या तिनही मुलांचा सांभाळ केला. मोठा मुलगा फत्तेसिंह पाटील विशेष पोलीस महानिरीक्षक (ips) तर मधला मुलगा जयकर पाटील शासकीय दुध योजनेत  कार्यरत आहेत. सर्वात लहान संग्रामसिंह पाटील हे संस्थापक चेअरमन कृष्णराव पाटील पत संस्था मांगरूळ आपली मुलं कर्तुत्ववान असल्याचे आई रूक्मिणी पाटील (काकू) यांना कौतुक होते.            मांगरूळ येथील तालुका पंचायत समिती शिराळा माजी सदस्य रंगराव भाऊराव पाटील यांच्या त्या थोरल्या वहिनीसाहेब होत्या. संपुर्ण ५० -६० लोकांचे एकत्र कुटूंबामध्ये श्रीमती रूक्मीणि पाटील काकूंना नेहमीच आदराचे स्थान होत...

*मा सरपंच पै प्रकाश पाटील वाढदिवस विशेष*

Image
🌹 *मा सरपंच पै प्रकाश पाटील वाढदिवस विशेष*🌹 ...........................  ✍ *लेखन- पै अशोक सावंत / पाटील*- सोंडोलीकर श्रीमंत मनाचा, आदर्श विचारांचा, मित्रांच्या जिव्हाळ्याचा, नाती जपनाराचा, वाढदिवस एका *आदर्श व्यक्तिमत्त्वाचा, कुस्तीसंघटकाचा* ...........      माणुस कुठे जन्माला आला, कुणाच्या घरात जन्माला आला, कुठल्या गावात जन्माला आला, कुठल्या जातीत जन्माला आला, व किती जगला याच्यापेक्षा तो कसा जगला ,कसा वागला ,कसा लढला, याला फार महत्त्व आहे .............      आपल्या जगण्याणे ,आपल्या वागण्याणे , आपल्या स्वभावाने लोकप्रिय ठरलेले व्यक्ती मत्व म्हणजे  *पै प्रकाश पाटील (दादा) सोंडोलीकर* यांचा आज वाढदिवस..............   शाहु महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या कोल्हापूर जिल्ह्यात शाहुवाडी तालुक्यातील सोंडोली गाव हे *प्रकाश पाटील* यांच  जन्मगाव.  *प्रकाश पाटील* यांना लहानपणापासून कुस्ती सारख्या रांगड्या खेळाची भारी आवड वयाच्या १०व्या  वर्षी  गावातील तालमीत कुस्ती सरावाचा श्रीगणेशा केला इयत्ता सातवी पर्यंत गावात शि...

राहुलला पुरस्कार मिळाला अभिनंदन ! पण ३८ वर्ष झली राम वनवासात का?

Image
राहुलला पुरस्कार मिळाला अभिनंदन ! पण ३८ वर्ष झली राम वनवासात का?  आज राहुल आवारे यांना आर्जुनविर पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. हा खऱ्याअर्थाने महाराष्ट्राचा स्वाभिमान म्हणावा लागेल. अनेक खडतर प्रवास करत पै. राहुल आवारे लढला. एवढंच काय आपल्या शांत स्वभावाने त्यांनी संपुर्ण भारताचे लक्ष वेधले. अशा या प्रामाणिक, शांत आणि संयमी पैलवानाला केंद्र शासनाचा अर्जुनविर पुरस्काराने सन्मान होत असताना महाराष्ट्राच्या मातीला न्याय मिळाला हे मात्र खरे.             एकीकडे पै.राहुल आवारे यांना आर्जुनविर पुरस्काराने सन्मानित केले. त्याचा आनंद संपुर्ण महाराष्ट्रात होत आहे.  दुसरीकडे कुस्तीतील जादुगार १९८२ ला काॅमनवेल्थ गेममधुन गोल्डमिडल घेतलेल्या राम सारंग यांचेवर अन्याय होताना दिसत आहे.  आज प्रामुख्याने मान्यता प्राप्त चार गेम आहेत त्यामध्ये एशियन गेम्स, काॅमनवेल्थ गेम,. वर्ल्ड चॅम्पियनशिप आणि आॅलंपिक या चार गेममध्ये महाराष्ट्राचे मिडल असणारे स्वर्गिय पै. गणपतराव आंदळकर, पै. मारूती माने, पै.हरिषचंद्र बिराजदार, पै. राम सारंग सर आणि पै. राहुल...