*_महाराष्ट्र राज्याच्या निर्मितीपासून जडण-घडणेचे साक्षीदार महाराष्ट्राचा ज्ञानकोष, ज्येष्ठ विचारवंत, संपादक व पत्रकार मधुकर भावे यांचा 9 ऑक्टोबर हा जन्मदिवस. आज ते 82 व्या वर्षात पदार्पण करत आहेत.त्यांना आई तुळजा भवानी व साई बाबा उदंड आरोग्यदायी आयुष्य देवो.

*_महाराष्ट्र राज्याच्या निर्मितीपासून जडण-घडणेचे साक्षीदार महाराष्ट्राचा ज्ञानकोष, ज्येष्ठ विचारवंत, संपादक व पत्रकार मधुकर भावे यांचा 9 ऑक्टोबर हा जन्मदिवस. आज ते 82 व्या वर्षात पदार्पण करत आहेत.त्यांना आई तुळजा भवानी व साई बाबा उदंड आरोग्यदायी आयुष्य देवो.भावे सरांना त्यांच्या बाबतीत कोणी लिहलेले आवडत नाही.त्यांच्यावर लिहण्या एवढी माजी उंचीही नाही.तरी ही त्यांच्या सहवासातून मला अनुभवता आलेले भावे सर त्यांची पुर्व परवानगी न घेता लिहण्याचा हा टोकडा प्रयत्न.सर माफ करा..._*

*'भाव'लेले भावे सर!*

*"होय मी भावे आहे!जरुर पण पु.भा.भावेंच्या नव्हे तर विनोबा भावेंच्या कुळीतील.आणि ते व्रत शेवटपर्यंत जपेन'* असे व्यासपीठावरुन ठणकावून सांगणारे मधुकर भावे सर पाहिले की कुठला जातीयवाद मनात येत नाही त्याचा स्पर्शही जाणवत नाही. आजच्या म्हणजे जातीय विभाजनाच्या काळात तर त्यांचं हे व्यक्तीमत्व अधिकच उठून दिसतं. व्यासपीठावर भावे सर कुठंही असले तरी त्याचं अस्तित्व उजळून येण कुणाला नाकारता येत नाही. महाराष्ट्रातला कोणताही राजकारणी त्यांना टाळू शकत नाही. उलट त्यांचा सल्ला घेतो. वयोमानाने शरीरावर सुरकुत्या जरुर असतील पण मन, मेंदू आणि विचारांवर सुरकुत्या न पडलेले चिरतरुण संपादक, ज्येष्ठ पत्रकार, विचारवंत महाराष्ट्राचा चालता बोलता इतिहास व ज्ञानकोष म्हणजेच मधुकर भावे सर. 
पंडित जवाहरलाल नेहरुपासून इंदिरा, राहुल गांधी पर्यंत यशवंतराव चव्हाण साहेबांपासून आजचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरेपर्यंत. अटलबिहारी, अडवाणी पासून मोदी शहांपर्यंत बाळासाहेब ठाकरे पासून आदित्य पर्यंत शरद पवार ते अजित, सुप्रिया व रोहित पवार, डांगे,एस.एम ते जयंत पाटील,भाऊसाहेब थोरात ते बाळासाहेब थोरात,राजाराम बापू ते जयंत पाटील,बाळासाहेब देसाई ते शंभूराज देसाई,वसंत दादा ते प्रतिक पाटील या सह महाराष्टातील सर्वच पिढ्याचां राजकीय प्रवास दीर्घ आणि डोळसपणे मांडणारे,कोणताही मुलाहीजा न राखून लिहणारे ज्येष्ठत्वाचा अहंकार नसलेले मराठी पत्रकारितेतील भिष्म म्हणजे भावेसर त्याचं असणचं निव्वळ आनंददायी आहे! या वयातही तितकेच व्यस्त असणारे परखड संपादक म्हणजेच भावे सर.त्यांचा या वयातील उत्साह तरुणांना लाजवेल असाच आहे.
मधुकर भावे सर रोह्यातील एका सामान्य कुटूंबातला मुलगा. आईच्या संस्कारांनी त्यांना मजबूत बनवलं. पुढं शिकत शिकत ते आचार्य अत्रेंच्या "मराठा'पर्यंत पोहचले. आणि त्यानंतर सुरु झाल ते "भावे'पर्व. अंडरवर्ड, सिनेपत्रकारिता ते थेट राजकीय पत्रकारितेचा प्रवास सोपा नव्हता. पण त्यांनी तो पेलला, सांभाळला. तो ही निती तत्वे पाळून म्हणूनच त्यांचा आजही धाकयुक्त दरारा,आदर आज पत्रकारांच्यात आहे. श्रद्धेत खोट नाही, आणि निष्ठेत फट नाही.अस हे व्यक्तीमत्तव. 
सारेच राजकीय नेते त्यांचे जवळचे मित्र.विशेषत: यशवंतराव ते विलासराव हे त्याचं पुस्तक तर राजकारण्यासाठी "गाईड'च ठरलयं. त्या पुस्तकाची प्रस्तावना भावेसरांच्या भाषेत रेठ­याचे कार्लमाक्र्स यशवंतराव मोहिते यांची.ती शब्दकांन करण्याचे भाग्य मला लाभले. ते भावे सरां मुळेच.
आजच्या मंत्रीमंडळातील अनेक मंत्री त्यांनी "हाफ पॅन्टीत' पाहीलेत. महाराष्ट्राचा रस्ता नी रस्ता, कार्यकर्ता त्यांचे रंगढंग, तळहातावरच्या रेषांसारखं पाठ असणारं शरद पवारांनंतरचे भावे सर "गाईड' आहेत.
पत्रकारांनी सार्वजनिक किंवा एखाद्या विशिष्ट पक्षाच्या व्यासपीठावर जाव का, ते जाणं कितपत योग्य हा चर्चेचा विषय आहे. पण त्यांनी अनेक अशक्यप्राय असलेल्या राजकीय तडजोडी घडवून आणल्या त्याचे राजकीय दुरगामी परिणाम झाले.ते सोडा पण भावे सर काँग्रेसच्या प्रत्येक व्यासपीठावर असतात. कारण तेच सुरवातीचं वाक्य "मी विनोबा भावेचा!' आज बघतो अनेक पत्रकार, संपादक पक्षाची बाजू ओढताना आमदार, खासदरकी ओरपताना दिसतात. भावेसरांच्या नशिबात हे आले की नाही किंवा त्यांनी नाकारले हे माहित नाही. पण हा माणूस आज अखेर उपेक्षितच राहीला. काँग्रेसी मध्यम मार्गी विचारसरणी त्यांनी जपली पण कधी वाहून गेले नाहीत. म्हणूनच अजूनही ते त्या पक्षाच्या नेत्यांना कानपिचक्या देत असतात. अधिकारवाणीनं .... 
भावे सर आजही लिहितात. ते सडेतोड असतं,सर्वसामान्यांच्या भावनांना नव्हे तर प्रश्नांना कागदावर आणि व्यासपीठावर साद घालणार असतं.आजच्या मिडीयात अनेक तानाजी तडपडलेत पण एक शेलार मामा अजूनही साद घालतोय तुम्ही लढा... म्हणून.
भावेसाहेब पेन आणि कागदाला वाहून घेतलेला व्रतस्थ पत्रकार म्हणून आम्ही तुमच्याकडे बघतो. "लोकमत' जाणून घेवून "प्रहार' करणारे आपण आमचे आदर्श आहात आपण शंभरी पार करावी आणि आम्हाला ती बघण्याचे भाग्य मिळावे हीच एक ईश्वरचरणी प्रार्थना!
         _जगदीश पाटील_
               कराड.

Comments

Popular posts from this blog

*अनाथ मुलांचे स्वीकारले स्वामी धामने पालकत्व*

संजय गणपती पाटील उर्फ संजू दादा भावपूर्ण श्रद्धांजली

*रात्री माझं गाव विकताना पाहिलं*