जगाचा पोसिंदा अडचणीत आहे.किमान पंचनामे तरी शेतकऱ्याच्या बांधावर जाऊन करा.

जगाचा पोसिंदा अडचणीत आहे.
किमान पंचनामे तरी शेतकऱ्याच्या बांधावर जाऊन करा.

 मनोजकुमार मस्के

बघता बघता वर्ष संपत आले. जन्मभर विसरता येणार नाही असं हे वर्ष होते. २०२०  या वर्षांत जनता घाबरली. संपूर्ण जग शांत होते. शेतकर्यांनी धान्याची, पैसेवाल्यांनी पैश्याची मिळेल ती मदत  केली. पैपाहुणे ऐकमेकाकडे येणे बंद झाले. सरकारने रेशनच्या माध्यमातून प्रत्येकाला धान्य पुरविले अनेकांच्या पोटाचा प्रश्न संपला असला तरी या संपूर्ण महामारीत पुरता मेला तो शेतकरी, कारण पेरणीपूर्वी महामारीचे सावट, पेरणीनंतर लाॅकडाउनमुळे अंतर मशागत करण्यास मजुरांची टंचाई, पिक काढणिच्या वेळी पावसाने झोडपले, आणि त्यातुन काही उरलेसुरलेले धान्य  शेतातुन  काढण्यासाठी रोजगारी मिळत नसल्याने शेतकरी पुरता बेजार झाला असल्याचे चित्र ग्रामीणभागात दिसत आहे. 
          रोजंदारी करणाऱ्यांची संख्या खुपचं कमी झाली. त्यामुळे अनेक शेतकऱ्यांना एकत्र येऊन पैरा पद्धत करूनच पिकांची पेरणी आणी काढणी करावी लागत आहे.  
 तंत्रज्ञानाचा वापर झाला खरा पण या तंत्रज्ञानाने माणूस माणसात राहीला नाही. खरं पाहता पुर्वी मळणी ही खळ्यावर होत होती. आता ती रस्त्यावर आली. त्यात या भातमळणीचे दर आव्वाच्या सव्वा म्हणजे जेवढे शेतकरी सालभर मेहनत करून कमवू शकत नाही तेवढं मळणिमशिनवाले एका महिन्यात कमवतात. शेतकऱ्याच्या हातात काहीच पडत नाही.
       त्यामुळे अनेक शेतकऱ्यांनी शेतातच भात झोडपणे पसंत केले असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. आज जगाचा पोसिंदा अडचणीत असताना शासन मात्र खुर्चीत बसून पंचनामे करत आहे. या खुर्चीत बसण्याने खरा शेतकरी मात्र मदतीपासून वंचीत राहील्याचे वारंवार सिद्ध झाले आहे. शेतकऱ्याने स्वत:चे फोटो स्वत: काढून आणणे फाॅर्म भरणे नंतर शासन हे फोटो पाहुन नुकसान किती झाल्याचा आंदाज लावणार. अणि मग या पोशिंद्याच्या खात्यावर तुटपुंजी रक्कम जमा होणार. जमा झालेली रक्कम बॅंकवाले कर्जाला वर्ग करून घेतात. यात शेतकऱ्याला जगणे मुश्कील झाले आहे. त्यातच शेतकऱ्यांसाठी काम करणाऱ्या संघटना कुठेही शेतकऱ्याच्या पाठीशि उभी असल्याचे चित्र दिसत नाही.  किमान पंचनामेतरी या शेतकऱ्याच्या बांधावर जाऊन शासनाने करावे आणि खऱ्या शेतकऱ्याला त्याचा लाभ मिळावा. एवढीच माफक अपेक्षा आता शेतकरी वर्गातून होत आहे. 

Comments

Popular posts from this blog

*अनाथ मुलांचे स्वीकारले स्वामी धामने पालकत्व*

संजय गणपती पाटील उर्फ संजू दादा भावपूर्ण श्रद्धांजली

*रात्री माझं गाव विकताना पाहिलं*