राहुलला पुरस्कार मिळाला अभिनंदन ! पण ३८ वर्ष झली राम वनवासात का?
राहुलला पुरस्कार मिळाला अभिनंदन ! पण ३८ वर्ष झली राम वनवासात का?
आज राहुल आवारे यांना आर्जुनविर पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. हा खऱ्याअर्थाने महाराष्ट्राचा स्वाभिमान म्हणावा लागेल. अनेक खडतर प्रवास करत पै. राहुल आवारे लढला. एवढंच काय आपल्या शांत स्वभावाने त्यांनी संपुर्ण भारताचे लक्ष वेधले. अशा या प्रामाणिक, शांत आणि संयमी पैलवानाला केंद्र शासनाचा अर्जुनविर पुरस्काराने सन्मान होत असताना महाराष्ट्राच्या मातीला न्याय मिळाला हे मात्र खरे.
एकीकडे पै.राहुल आवारे यांना आर्जुनविर पुरस्काराने सन्मानित केले. त्याचा आनंद संपुर्ण महाराष्ट्रात होत आहे. दुसरीकडे कुस्तीतील जादुगार १९८२ ला काॅमनवेल्थ गेममधुन गोल्डमिडल घेतलेल्या राम सारंग यांचेवर अन्याय होताना दिसत आहे. आज प्रामुख्याने मान्यता प्राप्त चार गेम आहेत त्यामध्ये एशियन गेम्स, काॅमनवेल्थ गेम,. वर्ल्ड चॅम्पियनशिप आणि आॅलंपिक या चार गेममध्ये महाराष्ट्राचे मिडल असणारे स्वर्गिय पै. गणपतराव आंदळकर, पै. मारूती माने, पै.हरिषचंद्र बिराजदार, पै. राम सारंग सर आणि पै. राहुल आवारे याचा प्रामुख्याने समावेश आहे. त्यापैकी अर्जुनविर पुरस्कार पै.गणपतराव आंदळकर, पै. काका पवार आणि पै. राहुल आवारे यांनाच मिळाला. तर पै. मारूती माने व पै. हरिषचंद्र बिराजदार यांना ध्यानचंद पुरस्कार देऊन सन्मानित केले. मात्र अन्याय झाला तो पै. राम सारंग सरांच्यावर. दिल्लीच्या कुटील राजकारणापुढे या प्रामाणिक पैलवानाचा साधेपणा टीकला नाही. किंबहूना महाराष्ट्राच्या कुठल्याही केंद्रिय मंत्र्यांना हा होणारा आन्याय डोळ्यांनी दिसला नाही.
अनेक वेळा वेळोवेळी महाराष्ट्राला डावलण्याचे काम भारतीय कुस्ती महासंघ करत आले आहे. उदाहरण द्यायचे झाले तर. १९८४ साली कोल्हापूर च्या राम सारंग सर यांच्यावरती अन्याय करून पै. सुनील कुमार ला आॅौलंम्पिक ची संधी दिली गेली , १९९६ साली पै. काका पवार सर यांना डावलून पै. पप्पू यादवला संधी दिली , २०१६ साली पै. नरसिह यादव याला कटकारस्थान करून बाहेर काढले तर राहुल आवारे याला २०१२ व २०१६ सालच्या ओलंम्पिक स्पर्ध्ये साठी काहीही करून पाठवायचेच नाही म्हणून भारतीय कुस्ती महासंघाने विडा उचलला. पण आमच्या महाराष्ट्रातील केंद्रीय मंत्र्यांनी तोंडातुन ब्र सुद्धा काढला नाही. विदेशात देशाची संपत्ती म्हणुन खेळाडूंकडे पाहीले जाते. आमच्या देशात खऱ्या खेळाडूला कोर्टात मी पुरस्कारांसाठी पात्र असल्याची दाद मागावी लागते तेंव्हा पुरस्कार भेटतो दुर्दैव आमचे.
आज इतर देशातील वर्तमानपत्र सुद्धा कुस्तीवर पुर्ण पान लिहतात व क्रिकेटला कुठेतरी कोपऱ्यात जागा देतात. म्हणून तर ते देश डझनभर मिडल घेऊन जातात. भारतात मात्र याच्या विरोधात चित्र आहे. क्रिकेट पान भरुन असते कुस्तीला किंवा इतर खेळाला जागाच नसते. आज २० वर्ष या पुरस्काराची मागणी करत असणारे राष्ट्रकुल विजेते पै. राम सारंग सरांना जिवंतपणी तरी हा पुरस्कार लाभेल का असा सवाल अनेक कुस्ती संघटना विचारित आहेत .
आज राहुल आवारेंना पुरस्कार दिला याबद्दल नेहमीच आम्ही शासनाचा आदर करूच पण त्याच बरोबर पै. राम सारंग सरांचा २० वर्षाचा वनवास सुद्धा पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात यावा असी व्यथा अनेक पैलवान मंडळींनी बोलुन दाखवली.
*राष्ट्रकुल विजेते पै.राम सारंग अध्याप कोणताही केंद्र सरकारचा पुरस्कार नाही*
● 1982 ऑस्ट्रेलिया येथे झालेल्या राष्ट्रकुल स्पर्धेत सुवर्ण पदक
●1981- ज्युनियर विश्व अजिक्यपद कुस्ती स्पर्धा, अमेरिका- सहभाग,
●इराण, उजबेकिंस्थान, याकुतीया (रशिया) व आफ्रिका येथे झालेल्या आंतरराष्ट्रीय कुस्ती स्पर्धेत भारतीय संघाचे मार्गदर्शन म्हणून काम पाहिले.
●राज्य व राष्ट्रीय स्पर्धेत जवळपास 20 पेक्षाही अधिक पदके
●महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा सलग 4 वर्षे सुवर्ण पदक
●शेकडो राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय खेळाडू तयार करण्यात मोलाचा वाटा.
● 1990 साली NIS कोर्स
● मार्गदर्शक- बी. टी. भोसले सर
● महाराष्ट्र व कर्नाटक राज्यात अनेक राज्य व राष्ट्रीय स्पर्धेचे आयोजन नियोजन.
कुस्ती सम्राट स्वर्गवासी गुरु कॅप्टन चाँदरूप यांचे लाडके शिष्य सरकारी भारत केसरी, कोमनवेल्थ गेम्स मेडलिस्ट, असिया गेम्स मेडलिस्ट पैलवान नेत्रपाल हूडा फरीदाबाद हरियाणा पैलवान नेत्रपाल यांना राष्ट्रपति द्वारा 29 अगस्ट 2020 ला ध्यानचंद अवार्ड ने सन्मानित करण्यात येणार आहे. पैलवान नेत्रपाल हे 15 वर्षापासुन ध्यानचंद अवार्ड मिळावा म्हणुन सरकार बरोबर लढत होते. अखेर परमेश्वराने ऐकले व त्यांना १५ वर्षांनंतर यश मिळाले. भारतात पुरस्कारासाठी कोर्टाची दारे ठोठवावी लागतात हीच मोठी खंत आहे. गुरू चाॅंदरूप यांचे सोबत पैलवान नेत्रपाल
संकलन -: *मनोज मस्के*, पत्रकार
शिराळा तालुका अध्यक्ष
*कुस्ती हेच जीवन* महाराष्ट्र
फोनः- 8999693594 / 9890291065
Comments
Post a Comment