*मा प्रताप (भाऊ) कदम वाढदिवस विशेष* ..... 
................................ जिवंत नागाची पुजा करणारे गाव म्हणून महाराष्ट्रात आणि महाराष्ट्राबाहेर ओळख असणारे गाव नागपंचमीचे ३२, शिराळा, पैलवानांची खान म्हणून प्रसिद्ध असणारा हा तालुका आहे. आणि याच तालुक्यातील  तांबड्या मातीची अविरतपणे सेवा करणारे सर्वांचे लाडके कुस्ती प्रेमी आणि कुस्तीसाठी सदैव सेवा देण्यास बांधील असणारे *आमचे मित्र व कुस्ती प्रसारक प्रतापसिंह कदम (भाऊ)*. एकदम सच्चा दिलाचा दिलदार, तोंडावर रोखठोक बोलणं पटलं तर ठिक, नाही पटलं तर त्याहुन ठीक माननारा प्रताप कदम . आमची ओळख तशी कुस्तीच्या मैदानावरच झाली. 
   अनेक मैदानामध्ये आयोजकांना सन्मानपत्र देऊन सन्मान करणारा हा अवलिया कोण मला जाणून घेण्याची उत्सुकता लागली. मी न राहुन प्रतापराव कदम यांना विचारले  तुम्ही प्रत्येक गावच्या मैदानात प्रमाणपत्र देता याच्या मागचा उद्देश काय? तेंव्हा प्रतापभाऊंनी जे उत्तर दिले ते म्हणजे *आज जी कुस्ती लयास चालली आहे ती कुठतरी टीकावी ,वाढावी म्हणून मी पदरमोड करून हे कार्य चालु केले आहे*. खुपचं बरं वाटलं हे वाक्य ऐकुन वाटलं खरं काम तर या मानसाचं आहे. जो माणूस तालुक्यातील प्रत्येक गावात जाऊन कुस्तीवाढीसाठी स्वखर्चाने काम करत आहे. एवढंच नाही तर आमचे सहकारी मित्र सोंडोली गावचे पै अशोक सावंत बोलले प्रताप भाऊ कदम यांनी तर त्यांच्या सोंडोली गावच्या यात्रेचे सन्मान पत्र आणि ट्रॉफी सकाळी फोन केल्या नंतर लगेच बनवुन दुपारी त्यांनी पाठवुन दिले. कुस्ती खेळासाठी, कुस्ती मैदानासाठी मनापासून झटणारा हा अवलिया
कुस्तीमैदानाची जहिरात, हरिभक्त पारायणाची जाहिरात हे सर्व मोफत देणारा हा खऱ्याअर्थाने प्रतापच म्हणावा लागेल.
     *नागापंचमीचे ३२शिराळा येथे प्रताप कदम यांचे स्वमालकिचे प्रितीराज आॅफसेट आहे*. दिवसभर काम करायचे आणि चार नंतर कुस्तीमैदाने पहायला जायचे. तसं शिराळा हे मोठे गाव असले तरी या गावाला तसं कुस्ती मैदान हे कधीच नसते. अलीकडे गोरक्षनाथ यात्रेनिमित्त मंदिर परिसरात भागातील शेवटचे मैदान म्हणुन पुर्वीपासुनच प्रसिद्ध आहे. गेली दोन वर्ष झाली आदरणिय लोकप्रिय आमदार मानसिंगराव नाईक (भाऊ) यांच्या मार्गदर्शनाखाली प्रताप कदम, व सहकारी पार पाडताना दिसले. तसं  अनेक पैलवान प्रताप कदम यांना  जवळचे सहकारी मित्र म्हणूनच ओळखतात. तसेच महाराष्ट्रातील अनेक पैलवानांच्या ओळखी सुध्दा त्यांच्या आहेत. एक सच्चा दिलाचा प्रामाणिक माणूस आमचे मित्र व मार्गदर्शक असल्याचे, आमचे मोठे भाग्यच मानावे लागेल. आज या दाणतदार व्यक्तीचा वाढदिवस आहे
त्यांना *कुस्ती हेच जीवन महाराष्ट्र राज्य संघटनेकडून वाढदिवसाच्या या छोट्याशा मनपूर्वक शुभेच्छा*......आणि ही शब्दरूपी भेट 
•••••••••••••••••••••
धन्यवाद
*पै मनोज मस्के* - पत्रकार
*कुस्ती हेच जीवन महाराष्ट्र राज्य*
अध्यक्ष शिराळा तालुका
फोनः- ९५२९३०९६४० / ९८९०२९१०६५

Comments

Popular posts from this blog

*अनाथ मुलांचे स्वीकारले स्वामी धामने पालकत्व*

संजय गणपती पाटील उर्फ संजू दादा भावपूर्ण श्रद्धांजली

*रात्री माझं गाव विकताना पाहिलं*