मांगरूळच्या श्रीमती रूक्मीणि कृष्णराव पाटील यांचे हृदयविकाराणे निधन

मांगरूळच्या श्रीमती रूक्मीणि कृष्णराव पाटील यांचे हृदयविकाराणे निधन

श्रीमती रूक्मिणी कृष्णराव पाटील यांचे दि. ०९/०९/२० रोजी रात्री ९.०० वाजता  हृदयविकाराने निधन झाले. त्या ८२ वर्षाच्या होत्या.    रूक्मिणी पाटील (काकू)  यांचेवर कोल्हापूर येथे खाजगी रूग्नालयात उपचार सुरू होते. उपचारादरम्यानच त्यांचे निधन झाले.
       पती कृष्णराव पाटील (गुरूजी) यांच्या निधनानंतर श्रीमती रूक्मिणी कृष्णराव पाटील यांनीच आपल्या तिनही मुलांचा सांभाळ केला. मोठा मुलगा फत्तेसिंह पाटील विशेष पोलीस महानिरीक्षक (ips) तर मधला मुलगा जयकर पाटील शासकीय दुध योजनेत  कार्यरत आहेत. सर्वात लहान संग्रामसिंह पाटील हे संस्थापक चेअरमन कृष्णराव पाटील पत संस्था मांगरूळ आपली मुलं कर्तुत्ववान असल्याचे आई रूक्मिणी पाटील (काकू) यांना कौतुक होते. 
          मांगरूळ येथील तालुका पंचायत समिती शिराळा माजी सदस्य रंगराव भाऊराव पाटील यांच्या त्या थोरल्या वहिनीसाहेब होत्या. संपुर्ण ५० -६० लोकांचे एकत्र कुटूंबामध्ये श्रीमती रूक्मीणि पाटील काकूंना नेहमीच आदराचे स्थान होते. घरातील लहान असो वा मोठे कोणिही काकूंचा शब्द खाली पडू देत नव्हते. परंतु आज अचानक काकूंच्या जान्याने संपूर्ण कुटूंबावर जणू दुख्खाचा डोंगरच कोसळला आहे. काकूंच्या जान्याने कुटूंबात एक मोठी पोकळी निर्माण झाली आहे.  रूक्मिणी पाटील काकू गेल्याने त्यांच्या कुटूंबातील सर्वांना या दुख्:तुन सावरण्याची शक्ती परमेश्र्वर देवो हीच प्रार्थना.

Comments

Popular posts from this blog

*अनाथ मुलांचे स्वीकारले स्वामी धामने पालकत्व*

संजय गणपती पाटील उर्फ संजू दादा भावपूर्ण श्रद्धांजली

*रात्री माझं गाव विकताना पाहिलं*