*मा सरपंच पै प्रकाश पाटील वाढदिवस विशेष*

🌹 *मा सरपंच पै प्रकाश पाटील वाढदिवस विशेष*🌹
........................... 
✍ *लेखन- पै अशोक सावंत / पाटील*- सोंडोलीकर

श्रीमंत मनाचा, आदर्श विचारांचा, मित्रांच्या जिव्हाळ्याचा, नाती जपनाराचा, वाढदिवस एका *आदर्श व्यक्तिमत्त्वाचा, कुस्तीसंघटकाचा* ...........
     माणुस कुठे जन्माला आला, कुणाच्या घरात जन्माला आला, कुठल्या गावात जन्माला आला, कुठल्या जातीत जन्माला आला, व किती जगला याच्यापेक्षा तो कसा जगला ,कसा वागला ,कसा लढला, याला फार महत्त्व आहे .............
     आपल्या जगण्याणे ,आपल्या वागण्याणे , आपल्या स्वभावाने लोकप्रिय ठरलेले व्यक्ती मत्व म्हणजे  *पै प्रकाश पाटील (दादा) सोंडोलीकर* यांचा आज वाढदिवस..............
  शाहु महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या कोल्हापूर जिल्ह्यात शाहुवाडी तालुक्यातील सोंडोली गाव हे *प्रकाश पाटील* यांच  जन्मगाव. 

*प्रकाश पाटील* यांना लहानपणापासून कुस्ती सारख्या रांगड्या खेळाची भारी आवड वयाच्या १०व्या  वर्षी  गावातील तालमीत कुस्ती सरावाचा श्रीगणेशा केला इयत्ता सातवी पर्यंत गावात शिक्षण घेतल्या नंतर पुढील शिक्षणासाठी शिराळा तालुक्यातील चरण या गावात प्रवेश घेतला शालेय कुस्ती स्पर्धेत सहभागी झाले तालुका स्तरीय, राज्य स्तरीय कुस्ती क्षेत्रात नावलौकिक मिळवला 
प्रकाश पाटील यांच्या वडिलांना वाटु लागले की आपल्या मुलाला मोठा पैलवान करायचा, सर्व काही व्यवस्थित चालू असताना काळाला याची पर्वा कुठे आळवावरचा पाण्याचा थेंब जसा अलगद निघुन जावा तसा सोंडोली मधुन *प्रगतशील शेतकरी ज्ञानदेव पाटील* नावाचा हिरा देवाने सहज उचलून नेला म्हणजेच प्रकाश पाटलांच्या वडिलांचे निधन झाले अगदी कमी वयात घरची सर्व जबाबदारी यांच्यावर येऊन पडली पण ते डगमगले नाहीत त्यावेळी त्यांच्या मोठ्या चुलतीने त्यांना धीर देऊन सांगितले 
की मी तुला पैलवान करणार! 

 आणि आपल्या दिवंगत दिराचे स्वप्न पूर्ण करायचे एवढे तिने  आपल्या मनात पक्के ठरवले आपल्या पुतन्याला सोन्याचा घास करुन खायला घातला पुर्ण सकस आहार त्यामध्ये रोज दुध,केळी, फळे, मांसाहार, हे सर्व चालू झाले आणि प्रकाश पाटील एक मोठे पैलवान म्हणून नावारुपाला आले आणि त्यांच्या वडिलांचे आपल्या मुलाला पैलवान बनविण्याचे स्वप्न त्यांची चुलती म्हणजे गावात *थोरली आई* म्हणून प्रसिद्ध असलेल्या एका वृद्ध स्त्रीने पुर्ण केले त्यांचे कौतुक करावे तितके थोडेच आहे 

प्रकाश पाटील नावाचं वारं  कुस्ती मैदानात घोंगावायला सुरुवात झाली पंचक्रोशीतील कुस्ती मैदानं प्रकाश भाऊंनी गाजवायला सुरुवात केली धरील तिथे डाव करणारे पैलवान म्हणून त्याची ओळख निर्माण झाली समोर पैलवान कोण आहे याची कधी पर्वाच केली नाही पैलवान झाल्यापासून त्यांनी कधी मागे वळून पाहिलेच नाही मी त्यावेळी त्यांच्या कुस्त्या अगदी जवळुन पाहील्या आहेत 

१९९७ ला बारावी पर्यंतचे शिक्षण पूर्ण केले 
म्हणतात ना की पै म्हणजे पहिला वाण आणि *राजकारणातला र माहित नसणारे पैलवान प्रकाश पाटील यांना गावाने २००० साली उपसरपंच म्हणून एकमताने निवडुन दिले. अगदी कमी वयात गावाची जिम्मेदारी त्यांच्यावर येऊन पडली पण  हे आव्हान त्यांनी लिलया पेलले त्यानंतर राजकीय क्षेत्रात त्याची छाप पडायला सुरुवात झाली त्यानंतर २००५ ते २०१० परत एकदा उपसरपंच आणि २०१०ते २०१५ सरपंच म्हणून गावाचा गाडा त्यांनी इमानेइतबारे चालवला* सलग पंधरा वर्षे पदावर असणारे प्रकाश पाटील यांनी त्यांच्या कारकिर्दीत अनेक कामे मार्गि लावली . 

 एक पैलवान ते उपसरपंच  आणि उपसरपंच ते सरपंच हा सर्व खडतर प्रवास मी अगदी जवळुन पाहीला आहे 

   प्रकाश पाटील हे एक व्यक्ती नसुन अष्टपैलू व्यक्तीमत्व आहे  कुस्ती बरोबरच समाजकारण,राजकारण, विद्यायक काम, दांडगा जनसंपर्क, गोड वक्तृत्व शैली, युवक संघटन, सामाजिक बांधिलकी, हे प्रकाश पाटील यांच्या अंगी विशेष गुण आहेत.प्रत्येकाच्या सुख दुःखात सावलीसारखे सोबत असतात
  समोर आलेल्या प्रत्येक व्यक्तीला नावासकट व गावासकट ओळखतात.  जिव्हाळ्यामुळे अनेक क्षेत्रातील प्रतिष्ठित व्यक्तिंचे त्यांनी एक वेगळे गठबंधन केले आहे. जेथे कुस्ती मैदान तेथे प्रकाश पाटील असे जणू काही समिकरणच झाले आहे प्रत्येक मैदानाला त्यांची हजेरी असते, चालु वर्षी तर गावच्या तालमीच्या नुतनीकरणाच्या कामाला त्यांनी सढळ हाताने मदत केली आहे. त्यांचा एकुलता एक मुलगा पैलवान करायचा हे ध्येय त्यांनी ठेवले असुन मुलगा साहील पाटील त्या प्रमाणे कसुुन सराव करत आहे
आपल्या स्वतःच्या गावचे याञेचे कुस्ती मैदान पार पाडण्यासाठी त्यांचा सिंहाचा वाटा असतो 

      अशा या बहुआयामी व्यक्तिमत्वाचा आज वाढदिवस
*एक उत्तम कुस्ती प्रसारक,  कुस्ती संघटक,* आमचे जिवाभावाचे सहकारी मित्र *मा. प्रकाश पाटील (दादा)*  यांना  *कुस्ती हेच जीवन महाराष्ट्र राज्य* संघटनेकडून *वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा* ....... .........
 धन्यवाद  
••••••••••••••••••••
 धन्यवाद
*पै. अशोक सावंत/ पाटील* कुस्ती संघटक 
*कुस्ती हेच जीवन महाराष्ट्र राज्य*
अध्यक्ष शाहुवाडी तालुका
मो. ९७०२९८४००६

Comments

Popular posts from this blog

*अनाथ मुलांचे स्वीकारले स्वामी धामने पालकत्व*

संजय गणपती पाटील उर्फ संजू दादा भावपूर्ण श्रद्धांजली

*रात्री माझं गाव विकताना पाहिलं*