*मा भिमराव (उर्फ) राहुल पाटील वाढदिवस विशेष*.


*मा भिमराव (उर्फ) राहुल पाटील वाढदिवस विशेष*.

शिराळा तालुक्यातील तडवळे गावचे सुपुत्र मा भिमराव पाटील यांचा आज वाढदिवस 
भिमराव यांचे प्राथमिक, माध्यमिक शिक्षण गावातच झाले, आणि उच्च शिक्षण शिराळा येथे पुर्ण झाले 
खरं सांगायचं झालं तर भिमराव पाटील यांची घरची परिस्थिती तशी जेमतेमच पण , लहानपणापासून भिमराव पाटील यांचा मित्र समुह तसा मोठाच. या मित्र परिवारात त्यांना एक सवय मात्र लागली ती म्हणजे सामाजिक बांधिलकीची. गावातील कोणतेही सामाजिक काम असो ते अगदी हसतमुखाने करत.गावात राहुन गावाची सेवा करायची ही त्यांची मनोमन ईच्छा असायची, पण पोटाचा प्रश्न निर्माण व्हायला लागला, गावात तालीम नाही की व्यायाम शाळा नाही, पण लाल मातीवर प्रेम मात्र भारी. गावातील जत्रेत मात्र पुढे होऊन काम करण्याची  त्यांची सवय मात्र आजही कायम आहे. पोटासाठी गाव सोडावे लागले. मुंबईत छोटे मोठे काम करत गावासाठी काय करता येईल का हा त्यांचा मनोमन विचार असायचा, सुरवातीला हा माणुस भाजी मार्केट मध्ये काम करणारा आज एका भायखळा मुंबई सारख्या शहरात भाजी मार्केटमध्ये मोठा व्यापारी आहे, हे सर्व करत असताना शिराळा वाळवा विकास मंच,तिरुपती बालाजी फ्रेंडली ग्रुप , यांची जबाबदारी त्यांच्यावर आहे, तसेच गावाकडे मोरणा फाऊंडेशन, आणि आता ज्योती साई को ऑपरेटिंग चे अध्यक्ष आहेत. 
गावात तालीम नाही, स्वतः पैलवान नाहीत पण आपल्या स्वतःच्या गावच्या यात्रेत महाराष्ट्रातील नावाजलेले पैलवान आणुन खेळवतात. वर्षाला कुस्ती वर हजारो रुपये ते स्वतः खर्च करत असतात. हे सर्व ते सामाजिक बांधिलकी म्हणून करत असतात गावात एक पैलवान नाही पण कुस्तीचे मैदान घेऊन इतरांच्या पुढे ते एक आदर्श ठरत आहेत. त्यांची एकच ईच्छा आहे की गावात तालीम झाली पाहिजे. आणि ही त्यांची ईच्छा लवकरच पुर्ण होईल एवढेच..... 
आज त्यांच्या जन्म दिनी त्यांना आमच्या कडुन या शब्दरूप शुभेच्छा.... 
•••••••••••••••••••••••••
धन्यवाद
*पै संपत पाटील* वारणा कोतोली
*कुस्ती हेच जीवन महाराष्ट्र राज्य*
उपाध्यक्ष शाहुवाडी तालुका

Comments

Popular posts from this blog

*अनाथ मुलांचे स्वीकारले स्वामी धामने पालकत्व*

संजय गणपती पाटील उर्फ संजू दादा भावपूर्ण श्रद्धांजली

*रात्री माझं गाव विकताना पाहिलं*