दत्तसेवा विद्यालय व कुस्ती हेच जीवन आयोजित कुस्ती शिबिराला मा रामदास दिपक पाटील यांच्या कडून पैलवान मुलांसाठी केळी वाटप*...

*दत्तसेवा विद्यालय व कुस्ती हेच जीवन आयोजित कुस्ती शिबिराला मा रामदास दिपक पाटील यांच्या कडून पैलवान मुलांसाठी केळी वाटप*...
-----------------------
 आज १६ मे काणसा वारणा फौंडेशन चे संस्थापक मा दिपक दादा पाटील यांचे सुपुत्र *श्री रामदास पाटील यांचा आज वाढदिवस आहे*, आणि त्यानिमित्ताने तुरुकवाडी येथे उन्हाळी कुस्ती शिबिराला पैलवान मुलांना खुराकासाठी पंचवीस डझन केळी वाटप केली आहे.
   खर्या अर्थाने दिपक दादा पाटील यांचा सर्व परिवार कुस्ती या रांगड्या खेळावर प्रेम करतो. आज रामदास भाऊंचा वाढदिवस अनेक ठिकाणी साजरा केला जातो आहे पण रामदास भाऊंचे चुलते म्हणजे दिपक दादांचे छोटे बंधू युवा सरपंच मा कृष्णा पाटील यांनी सपत्नीक कुस्ती शिबिराला भेट देऊन पैलवानांना खुराक वाटप केले. गेल्याच आठवडय़ात मा दिपक दादा पाटील यांनी सुद्धा कुस्ती शिबिराला भेट देऊन पैलवानांना मार्गदर्शन केले शिवाय त्यांनी सुद्धा खुराक वाटप केले, अशा या दानतदार व्यक्तीच्या माध्यमातून कुस्ती शिबिराला अनेक लोकांच्या माध्यमातून खुराक उपलब्ध होत आहे.

  १ मे रोजी कुस्ती तुरुकवाडी येथील *दत्त सेवा परिवाराचे संस्थापक अध्यक्ष मा आनंदराव माईंगडे दादा व कुस्ती हेच जीवन* यांच्या मार्गदर्शनाखाली  कुस्ती शिबिराला प्रारंभ झाला आहे आणि २२ मे ला या शिबिराची सांगता होणार आहे. 
  खुप सुंदर असे संयोजन आणि नियोजन, मुलांच्या साठी प्रशस्त अशी सर्वच बाबतीत व्यवस्था त्याठिकाणी करण्यात आली आहे शिवाय अनुभवी कुस्ती कोच संदीप दळवी सर ऑल इंडिया चॅम्पियन पै आनंदा धुमाळ सर, राऊत सर आहेत आणि याचा फायदा गेली १५ दिवस झाले त्याठिकाणी कुस्ती कॅम्प मध्ये भरती झालेले पैलवान घेत आहेत. 
---------------------------
धन्यवाद 
*पै अशोक सावंत /पाटील* 
कुस्ती हेच जीवन महासंघ महाराष्ट्र राज्य, 
अध्यक्ष शाहूवाडी तालुका 
मो 9702984006

Comments

Popular posts from this blog

*अनाथ मुलांचे स्वीकारले स्वामी धामने पालकत्व*

संजय गणपती पाटील उर्फ संजू दादा भावपूर्ण श्रद्धांजली

*रात्री माझं गाव विकताना पाहिलं*