तीन शिबिरे... हजारो रुग्ण...!

 तीन शिबिरे... हजारो रुग्ण...!

*ज्येष्ठ पत्रकार- मधुकर भावे* 

मानवी शरीरशास्त्र अघटित आहे. एक छान वाक्य आहे... 
‘देही आरोग्य नांदते...
भाग्य नाही या परते....’
गरिब असो, श्रीमंत असो... व्याधी कोणाला चुकलेल्या नाहीत. प्रत्येकाच्या व्याधींचे स्वरूप वेगळे. पण प्रामुख्याने कंबरदुखी, पाठदुखी, मणकादुखी, सांधेदुखी, गुडगादुखी, हाताला मुंग्या येणे, हे सामान्यपणे जवळपास बहुसंख्य रुग्णांना होणारे आजार... जोधपूरला डॉ. गोवर्धनलाल पाराशर यांच्या रुग्णालयात जावून उपचार घेवून मी १० िमनीटांत ठणठणीत बरा झालो. त्यानंतर गेली १४ महिने पत्रकारितेच्या व्यापात 
डॉ. पाराशर यांचे उपचार सामान्य रुग्णांना िमळाल्यानंतर काय फरक पडतो, हे डोळ्यांनी पाहिले. एक वेगळी अनुभती मिळाली. त्यानंतर ३१ जानेवारी २०२१ ला ‘दो अंगुठे की कमाल’ हा लेख महाराष्ट्रभर प्रसारित झाला. हा लेख वाचून हजारो रुग्ण जोधपूरकडे धावले. आतापर्यंत महाराष्ट्रातून जोधपूरला गेलेल्या रुग्णांची संख्या १५ हजारांच्या पुढे अाहे. सर्वांना जोधपूर गाठणे शक्य नाही... खर्चही परवडणारा नाही.... जाणे-येणे आिण तिथे राहणे हाच मुख्य खर्च. मनात विचार येत होता की, डॉ. पाराशर यांच्या जादुई विद्येचा फायदा सामान्य माणसांना कसा मिळेल? या विचारातूनच १४ अॅागस्ट २०२१ ला मालाड येथे पाराशर हिलिंग सेंटर सुरू झाले. 
श्री. अशोक मुन्शी, श्री. िकशोर आग्रहारकर या दोन िमत्रांनी पुढाकार घेवून हे केंद्र सुरू केले. सामान्य माणसांच्या उपचारांची व्यवस्था या रुग्णालयात झाली. जोधपूर असो की, मालाड केंद्र असो, ८० ते ९० टक्के रुग्णांना या केंद्रातील उपचाराने फायदा झालेला आहे. कण्हत येणारे, रडत येणारे, दुखण्याने हैराण झालेले असे िकत्येक रुग्ण परत जाताना आनंदाने जात होते... हे पाहत असताना एक वेगळीच ऊर्जा  मिळते. 
डॉ. पाराशर यांनी मालाड येथील पाराशर हिलिंग सेंटरमध्ये जाेधपूरच्या डॉक्टरांची टीम पाठवून महाराष्ट्रातील सामान्य माणसांचा फार मोठा दुवा घेतलेला आहे. त्या केंद्रातील सर्व डॉक्टर आिण सकाळी ८ ते रात्री ८ जीव लावून सेवा देतात. गेली १० महिने व्यवस्थापन करणारे श्री. अशोक मुन्शी व त्यांचे सहकारी या सर्वांचेच फार मोठे श्रेय आहे. परंतु जोधपूर आिण मुंबईखेरिजही त्यांच्या या प्रभावी उपचाराचा ग्रामीण भागातील सामान्य माणसांना फायदा िमळावा, या विचाराने त्यांची काही शिबिरे आयोिजत करण्याचा विचार झाला. महाराष्ट्रात अनेक राजकीय िशबिरे पाहिली आहेत... अनेक साहित्य संमेलने पाहिली आहेत... अनेक कवी संमेलने... अनेक सांस्कृतिक संमेलने रोज हाेतात. पण ती त्या त्या िदवसांपूरती असतात. त्या त्या िशबिराला मोठी प्रसिद्धी मिळते. डॉ. गोवर्धनलाल पाराशर आिण त्यांच्या टीमने महाराष्ट्रात गेल्या ६ महिन्यांत ३ मोठी आरोग्य िशबिरे घेतली. एकही पैसा फी न घेता हजारो सामान्य माणसांची तपासणी झाली. उपचार झाले. ७० ते ८० टक्के रुग्ण ठणठणीत बरे झाले. गोळी नाही... इंजेक्शन नाही... एक्सरे नाही... एम. आर. अाय नाही... डॉ. पाराशर आिण त्यांच्या डॉक्टर टीमने जीव लावून केलेल्या उपचाराने अनेक रुग्ण बरे झालेले पािहलेत. ही ३ िशबिरे सामान्य रुग्णांसाठी फार मोठी फायद्याची ठरली. २५, २६, २७ नोव्हेंबर रोजी यवतमाळ येथे तीन दिवसांचे शिबीर. श्री. विजय दर्डा, श्री. कीर्ती गांधी यांच्या प्रयत्नाने हे िशबीर झाले. ७ ते ८ हजार रुग्णांना त्याचा फायदा झाला. २५, २६, २७ एप्रिलला नागपूरजवळील सावंगी येथे डॉ. संजय उगेमुगे यांच्या तीन िदवसांच्या िशबिरात ६ ते ७ हजार रुग्णांनी उपचार घेतले. परवाचे पुण्यातले शिबीर थक्क करणारे होते. प्राध्यापक संजय चोरडिया यांच्याच शैक्षणिक संकुलात हे िशबीर पार पडले. ७ ते ८ हजार रुग्णांनी उपचार घेतले. सामान्य माणसे डॉक्टरांना दु:ख सांगतात.... उपचार सुरू होतात.. आिण १५ िमनीटांत तो रुग्ण हसत हसत बाहेर येवून डॉक्टरांना पाया पडताना पाहिल्यावर या सगळ्या प्रयोगाचे िकती महत्त्व आहे... िनदान सामान्य माणसांना तरी त्याची जाणीव होते. पण पुण्याच्या शिबिराने आणखी काही विक्रम केले. देशाच्या माजी राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील यांनाही पायाचे दुखणे होते. त्यांनी स्वत: शिबीरात येऊन उपचार करून घेण्याची इच्छा व्यक्त केली. डॉ. पाराशर म्हणाले, ‘ताईसाहेब, आपण येवू नका... आपण िजथे आहात, ितथे मी येईन... ’ त्यांचे सहकारी डॉक्टर मधुसुदन पाराशर आिण अन्य तीन सहकारी डॉक्टरांसह प्रतिभाताईंच्या  पुण्यातील ‘रायगड’ िनवासस्थानी डॉक्टर पाराशर गेले. ताईंना चालायला त्रास होत होता. १५ ते २० िमनीटांच्या उपचारानंतर ताई मुख्य हॉलमध्ये स्वत:च चालत आल्या. डॉ. पी. डी. पाटील हे स्वत: पिंपरी-िचंचवड आरोग्य संकुलाचे प्रमुख. डी. वाय. पाटील पिंपरी-चिंचवड विद्यापीठाचे कुलगुरू. त्यांचे स्वत:चे फार मोठे अद्ययावत रुग्णालय आहे. पण त्यांच्या कमरेतील दुखणे दूर करून घेण्यासाठी ते ३ दिवस िशबिरात पोहोचले आिण त्यांची भावना त्यांनी मनापासून समारोपाच्या कार्यक्रमात व्यक्त केली... महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेचे अध्यक्ष बाळासाहेब अनासकर तीन दिवस शिबिराला हजेरी लावत होते. त्यांचा उजवा हात आिण खांदा दुखतो. कोणत्याही मोठ्या रुग्णालयात ते उपचार करून घेवू शकतात... पण ते िशबिरात आले. त्यापूर्वी मालाड येथील पाराशर हिलिंग केंद्रात ते उपचारासाठी येतच होते. ते आिण त्यांच्या पत्नींना या उपचार पद्धतीने जमीन-आस्मानाचा फरक पडला, अशा शब्दांत त्यांनी आपली भावना व्यक्त केली. पुण्यातल्या प्रख्यात सिम्बॉसिस या शैक्षणिक संस्थेचे प्रमुख डॉ. एस. बी. मुजुमदार हे शिबिरात आले. त्यांनी उपचार करून घेतले. ही दिग्गज माणसे. कसलाही संकोच न बाळगता आपले दुखणे सांगत आली... उपचार घेवून झालेला फरक जाणवल्यावर या फरकाचे मूल्य िकती आहे हे मोकळेपणाने सांगून गेले. डॉ. पाराशर यांच्या भोवती एवढ्या महान व्यक्तीमत्त्वांनी मनमोकळेपणाने उपचाराचा फायदा झाल्याचे सांगताना डॉ. पाराशरही गदगद झाले होते.  सकाळी ८ ते रात्री ८ वाजेपर्यंत शेकडो रुग्णांचे उपचार करताना डॉक्टर आिण त्यांची टीम थकून जात होती. पण या सर्व टीमच्या चेहऱ्यावर  कमालीचे समाधान होते.  पुण्याच्या िशबिरासाठी प्रा. संजय चोरडिया यांनी त्यांच्या धर्मपत्नी सुषमा चोरडिया, त्यांच्या चिरंजीवांनी चोख व्यवस्था ठेवली. शिवाय पुण्यातील सांस्कृतिक प्रतिक श्री. सचिन ईटकर, सचिन सगरे आिण त्यांची सगळी टीम यांनी कमालीची मेहनत घेतली. तीन िदवसांत असा एकही माणूस भेटला नाही की ज्याला उपचाराचा फायदा झाला नाही, असे सांगत होता.  प्रत्येकाला या शिबिराचा खूप मोठा आधार वाटला. पण एक तर चमत्कारच झाला. त्याचे असे झाले की, ‘कोथरूडमधील िशवामृतकृपा सह. गृहनिर्माण संस्थेत िकशोर शहा नावाचे एक गृहस्थ राहतात. त्यांच्या नातेवाईक श्रीमती मंजुशा जैन यांच्या कमरेतील मणक्याचे अॅापरेशन सोमवार िदनांक २ मे रोजी ठरले होते. त्यांना जेव्हा िशबिराची मािहती िमळाली तेव्हा त्यांनी विचार केला... आधी डॉक्टर पाराशर यांना दाखवूया... जर अॅापरेशन करायचे ठरले तर ते नंतर करता येईल. ते श्रीमती जैन यांना घेवून आले. डॉ. पाराशर यांनी तपासले... उपचार केले.... स्पष्ट शब्दांत सांिगतले... अॅापरेशनची गरज नाही... चार-पाच दिवस जोधपूरला या... ठणठणीत बऱ्या व्हाल....’
किशोर शहा यांना मी विचारले,... ‘तीन िदवस घेतलेल्या उपचारांचा काही फरक झाला का?’ त्यांनी मनापासून सांिगतले, ‘पुष्कळ फरक वाटतोय.... अॅापरेशन टळले, हे बरे वाटले.. अाता जोधपूरला जायचे ठरवले आहे....’ मग त्यांना मी आणखी एक हकीगत सांिगतली. चंद्रपूरचे खासदार बाळासाहेब धानोरकर हे मणक्याच्या अॅापरेशनसाठी कोकीलाबेन अंबानी रुग्णालयात दाखल झाले होते. अडीच लाख रुपये भरून झाले होते. दोन िदवसांनी अॅापरेशन ठरले होते. त्यांना िडस्ाचार्ज घ्यायला लावून आग्ाोदर मालाड येथे पाराशर हिलींग केंद्र आिण नंतर जोधपूर येथील उपचाराने खासदार धानोरकर ठणठणीत बरे झाले. 
कारगील युद्ध लढणारे वायुसैनिक संदेश सिंगलकर यांचेही असेच अॅापरेशन ठरले होते. डॉ. गोवर्धनलाल पाराशर यांनी त्यांना जोधपूरमध्ये ठणठणीत बरे केले. अशी एक नव्हे अनेक उदाहरणे आहेत. 
पण, मुख्य विषय असा आहे की, सामान्य माणसांच्या हित्याच्या या उपचारपद्धतीला आणि कमी खर्चाच्या उपचार पद्धतीला देशभर मान्यता का िमळत नाही? अॅलिओपॅथीवाल्यांची मोठी लॉबी या मान्यतेला विरोध करते आहे का? देशाचे आजचे पंतप्रधान श्री. नरेंद्रजी मोदी गुजरातचे मुख्यमंत्री असताना  डॉ. पाराशर यांच्याकडून त्यांनीही पाठीच्या दुखण्यावर उपचार करून घेतले होते. आिण त्यांनी जाहिरही केले होते की, ‘माझ्या राज्यात (गुजरात) तरी मी या अभ्यासक्रमाला मान्यता देईल. पण तेही झाले नाही.’ सुदैवाने जोधपूरच्या आयुर्वेद महािवद्यालयात अॅस्टिओपॅथी या उपचार पद्धतीला मान्यता मिळालेली आहे. िवनाअौषध असलेली ही उपचारपद्धती... शरीरशास्त्राच्या सर्व महाविद्यालयात अभ्यासक्रमात समाविष्ट व्हायला हवीत. तर मोठ्या प्रमाणात डी. ओ. (doctor of osteopathy) तयार होवू शकतील. आिण ग्रामीण भागातील गरीब रुग्णांना त्याचा फार मोठा फायदा होईल. आजच्या कोणत्याही आजारावर उपचार करताना हजारो रुपयांचा खर्च आहे... न परवडणारे आजार... सामान्य माणूस कसे पेलू शकतील.. 
   डॉ. पाराशर यांच्या रुग्णालयात िकंवा िशबिरात जे िदग्गज लोक येवून उपचार घेवून जातात त्यांनीही पुढाकार घेवून आता या वैद्यक शाखेला प्रतिष्ठा आिण मान्यता या दोन्ही गोष्टी देण्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत, तरच या शिबिरात त्यांनी उपचार घेतले 
त्याचा फायदा सामान्य माणसांना होईल. 
डॉ. पाराशर यांचा हात लागण्यानंतर तो 
रुग्ण हमखास बरा होतो, ही भावना सर्वत्र आहे. त्यामुळे सामान्य माणसांचा विश्वास हीच त्यांच्या उपचार पद्धतीची सर्वात मोठी मान्यता आहे. ती कोणालाच काढून घेता येणार नाही. मान्यतेसाठी डॉ. पाराशर थांबलेही नाहीत. देश-विदेशात त्यांचे आज नाव झाले आहे. आिण म्हणून मोठ्या रुग्णालयात न जाता 
गायक अनुप जलोटा असोत, शिवसेनेचे खासदार अरविंद सावंत असोत, 
कॉमेिडयन सुदेश लहरी असो हे 
उपचार घेण्याकरिता मालाड किंवा 
जोधपूरला जातात. पण या सगळ्यापेक्षा 
मोठा आनंद आहे तो महाराष्ट्रातील िशबिरांमध्ये सामान्य माणसाचे दु:ख डॉक्टर पाराशर यांच्या जादुई स्पर्शाने आनंदात रुपांतरीत होत होते. हे पाहात असताना मनाला मिळणारे समाधान कोणत्याही तागडीत तोलता येणार नाही. 
- मधुकर भावे

Comments

Popular posts from this blog

*अनाथ मुलांचे स्वीकारले स्वामी धामने पालकत्व*

संजय गणपती पाटील उर्फ संजू दादा भावपूर्ण श्रद्धांजली

*रात्री माझं गाव विकताना पाहिलं*