Posts

मांगरुळमधील पैलवानांचा गणपती! पैलवान

Image
मांगरुळमधील पैलवानांचा गणपती!  पैलवान.... मांगरूळ वार्ताहर :  मांगरूळ येथे गणेशोत्सव जल्लोषात साजरा केला जातो.  मांगरूळला तसा क्रांतीकारकांचा मोठा इतिहास आहे. शिवकालीन, पेशवेकालीन व गणेशत्सवाचा मांगरूळ गाव साक्षीदार आहे. त्याचबरोबर पैलवानकीचा सुद्धा साक्षीदार आहे. अनेक नामांकित पैलवान या मांगरूळगावातून तयार झाले . पैलवानकीचा ऐतिहासिक वारसा आपल्याला मांगरुळातील गणेशोत्सवात पाहायला मिळतो.   तालमीतील गणपती हा मानाचा व संपूर्ण गावाचा गणपती समजला जातो. 1947 ला देश स्वातंत्र्य झाल्यानंतर कुस्तीची परंपरा पुढे गेली. गावोगावी तालमी उभ्या राहील्या.  यात अनेक पैलवान तयार होत होते.  प्रत्येक तालमीत हनुमानाचं मंदिर असतं. त्याचं प्रमाणे तालमीच्या पैलवानांनी गणपती बसवण्याची परंपंरा ही कायम पुढे चालवली. या वर्षी पैलवानाच्या रूपातील गणेशमूर्ती साकारून संपूर्ण गावासह ईतर परीसराचे लक्ष वेधून घेतले. चक्क हुबेहूब पैलवानच  असल्यासारखे भासवणारी गणेशमुर्ती कौतुकाचा विषय ठरत आहे.  हि मुर्ती पाहण्यासाठी भाविक मोठ्या प्रमाणात गर्दी करताना दिसत आहेत. गावात प...

*भावपूर्ण श्रद्धांजली – संजय गणपती पाटील (संजू दादा)*

Image
*भावपूर्ण श्रद्धांजली – संजय गणपती पाटील (संजू दादा)* मनोजकुमार मस्के, मांगरूळ "*आठवणी कधीच मरत नाहीत, त्या मनात घर करून राहतात... आणि माणूस जातो तेव्हा फक्त शरीर जातं, आठवणींमध्ये तो कायमच जिवंत राहतो*." आज संजू दादा आपल्याला सोडून जाऊन एक संपूर्ण वर्ष लोटलंय… पण खरं सांगायचं तर, तुमची आठवण, तुमचं हास्य, तुमचं मार्गदर्शन, तुमचं माणुसपण — हे सगळं अजूनही ताजंच वाटतं… अगदी कालच घडलंय असं. नेहमी हसतमुख असणारा, प्रत्येकाशी आपुलकीनं वागणारा, कोणत्याही अडचणीत मार्गदर्शन करणारा, "भविष्यासाठी काहीतरी करून ठेवावं..." असा सल्ला देणारा — हा आपला संजू दादा अचानक गेल्याचं ऐकून काळीज थरथरलं. एलआयसीच्या माध्यमातून अनेक कुटुंबांच्या भविष्याची आखणी करणारा, अनेक घरांना आर्थिक साक्षरतेची दिशा दाखवणारा माणूस... स्वतः मात्र इतक्या अचानकपणे कोणालाही काही न सांगता निघून जाईल असं वाटलंच नव्हतं. दादा, तुमच्या जाण्यानं एक मोठा आधारच निखळला. पत्नी, लहान मुलं, कुटुंबीय — सगळे अजूनही त्या धक्क्यातून सावरले नाहीत. मित्रमंडळी, स्नेही, शेजारी — आजही तुझी वाट पाहतायत. तुझं ते हसणं, मनमोकळं ...

महाराष्ट्राची भळभळती जखम..

Image
महाराष्ट्राची भळभळती जखम... -मधुकर भावे गेला संपूर्ण आठवडा महाराष्ट्र अस्वस्थ आहे. एका पाठोपाठ एक, अशा काही लाजीरवाण्या, संतापजनक आणि मनाला इंगळ्या डसाव्यात अशा घटना घडल्या. त्यामुळे या अस्वस्थ महाराष्ट्राचा तडफडाट झालेला आहे. शिवछत्रपतींच्या पुळ्याची जी विटंबना झाली त्यामुळे तर महराष्ट्राच्या हृदयाच्या चिंधड्या झाल्या. चार लाख एवढे सैन्य असलेल्या औरंगजेबाच्या पुढे जो स्वाभिमानी राजे झुकले नाहीत... अपमान झाल्यावर औरंगजेबाला पाठ दाखवून दरबारातून निघून गेले... आणि अग्र्याच्या कैदेतून शिताफिने निसटले ते महाराष्ट्राचे आराध्य दैवत कोसळून पडणे ही कल्पनाच महाराष्ट्र सहन करू शकत नाही. त्यानंतर त्याची जी चित्र प्रसिद्ध झाली ती पाहताना हृदय विदर्ण व्हावे, अशी स्थिती होती. ते सोशल मिडीयारील व्हायरल होणारे फोटो नंतर थांबवले म्हणून बरे झाले... पण, महाराष्ट्राच्या मनाला बसलेला धक्का हा अस्वस्थ करणारा आहे.... त्या आगोदर बदलापूरमध्ये घडलेला भयानक प्रकार... अंबरनाथमधील किळसवाणा प्रकार आणि पोलीस स्टेशनमध्ये ‘पोलीस अधिकाऱ्यावर कोयत्याने हल्ला’ या सगळ्या तीन दिवसांच्या वाईट घटनेनंतर महाराष्ट्...

देशासाठी बलिदान करणार्‍या क्रांतिवीरांच्या स्मृती कायम जपल्या पाहिजेत — मनोज मस्के.

Image
देशासाठी बलिदान करणाऱ्या क्रांतिवीरांच्या स्मृती कायम जतन केल्या पाहिजेत. स्वातंत्र्य चळवळील शिराळा पेठ्याचे योगदान मोठे आहे, असे प्रतिपादन दैनिक पुण्यनगरी चे पत्रकार मनोज मस्के यांनी केले.  विश्वास विद्यानिकेतन,चिखली विद्यालयात क्रांतीदिन साजरा करण्यात आला. यावेळी ते बोलत होते. अध्यक्षस्थानी मुख्याध्यापक पी. आर. वरेकर होते.   प्रारंभी क्रांतीसिंह नाना पाटील यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले.     यावेळी मनोज मस्के म्हणाले, स्वातंत्र्य चळवळीत शिराळा तालुक्यातील क्रांतीकारकांचे योगदान मोठे आहे भारत छोडो आंदोलनाने संपूर्ण देश ढवळून निघाला. यामध्ये बिळाशी, मांगरूळ या गावातून मोठ्या प्रमाणात आंदोलन तीव्र करण्यात आले होते. मांगरूळ गावचे सुपूत्र हुतात्मा धोंडी संतू कुंभार व शंकर भाऊ चांभार या चौदा वर्षे वयाच्या मुलांनी आपले बलिदान दिले. तर ज्ञानू बाळा लुगडे यांच्या डाव्या पायात गोळी लागून जायबंदी झाले.   सांस्कृतिक विभाग प्रमुख मनीषा कुंभार,  श्रीराज मोरे, यशराज कोळी यांनी भाषणे केली. यावेळी समाजसेवक अजित पाटील,  वैशाली शिंदे, प्...

_आगरकर जीवन गौरव पुरस्कारने मधुकर भावे यांचा सोमवारी सन्मान करण्यात आला*

Image
*_आगरकर  जीवन गौरव पुरस्कारने मधुकर भावे यांचा सोमवारी सन्मान करण्यात आला* ज्येष्ठ संपादक व राजकीय विश्लेषक  मधुकर भावे यांना ' सुधारककार गोपाळ गणेश आगरकर जीवनगौरव' पुरस्कार कराड येथील सद्गुरु गाडगे महाराज महाविद्यालयातील हॉलमध्ये महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या हस्ते देण्यात आला. यावेळी सुधारककार गोपाळ गणेश आगरकर  राज्यस्तरीय पत्रकारिता पुरस्कार दैनिक लोकमतच्या सोलापूर आवृत्तीचे कार्यकारी संपादक सचिन जवळकोटे, साम टीव्ही च्या वरिष्ठ पत्रकार सोनाली शिंदे, दैनिक तरुण भारत च्या सातारा आवृत्तीचे प्रमुख दीपक प्रभावळकर, दैनिक सामनाचे जिल्हाप्रमुख गजानन चेणगे यांनां ही सन्मानीत करण्यात आले. कराड शहरातील पत्रकारांच्या इंद्रधनु विचार मंच फाउंडेशन च्या वतीने सदर पुरस्कार देण्यात आला होता. यावेळी प्रसिद्ध व्याख्याते प्रा. नितीन बानगुडे पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती. टेंभू गावच्या लोकनियुक्त सरपंच सौ. रुपाली भोईटे अध्यक्षस्थानी होत्या . प्राचार्य मोहन राजमाने व उद्योजक रामकृष्ण वेताळ यांची प्रमुख उपस्थिती होती. 

आई सोडून गेली, आजी स्वर्गवासी झाली ,बाप देवाघरी गेला, आता सांभाळी विठ्ठला !माळेवाडी येथील अनाथ मुलांची मदतीसाठी हाक.....

Image
आई सोडून गेली, आजी स्वर्गवासी  झाली ,बाप देवाघरी गेला, आता सांभाळी विठ्ठला ! माळेवाडी येथील अनाथ मुलांची  मदतीसाठी हाक..... मनोजकुमार मस्के:  दोन वर्षांपूर्वी आई घर सोडून पळून गेली. आईच्या माघारी बाप आणी आजी आईची माया देत होते. पण नियतीला ते मान्य नव्हते. या कुटुंबाला कुणाची दृष्ट लागली कुणास ठाऊक. ऑगस्ट मध्ये बापही हिरावून घेतला. आणी मायेचा हात तोंडावरून फिरविणारी आजी ही जग सोडून गेली. अगदी खेळण्या- बागडण्याच्या वयात त्या कोवळ्या लेकरांवर संसाराची धुरा सांभाळण्याची वेळ येऊन ठेपली. शेवटी आई पळून गेली, आजी देवाघरी गेली, बाप गेला, आता सांभाळी विठ्ठला... असे म्हणण्याची वेळ त्या चिमुकल्या भावा- बहिणींवर आली.  माळेवाडी ता. शिराळा येथील ही घटना मोठी मुलगी सुवर्णा चौदा वर्षांची, विद्या बारा वर्षांची, तर मुलगा प्रसाद आकरा वर्षांचा, अथर्व अवघ्या दहा वर्षांचा. चौघांच्याही वाट्याला अनाथाचं जगणं आलं.   दहा अकरा वर्षाची असतानाच आई-वडिलांची दररोज भांडणे होत असल्याने आई आम्हाला सोडून निघून गेली. त्यानंतर वडील आणि आजी आमचा चांगला संभाळ करत होते. परंतु थोडेच दिव...

कै. कलाबाई शंकर खवरे

Image
कळविण्यास दुःख होते कि , संजय शंकर खवरे यांच्या मातोश्री  कै. कलाबाई शंकर खवरे यांचे आज शनिवार दि. 29 जुन 2024 रोजी सकाळी 12:30 वाजता वृद्धोपकाळाने दुःखद निधन झाले असून सोमवारी दि. 1  जुलै 2024 रोजी सकाळी 9:30 वाजता त्यांच्या शिराळा गोरक्षनाथ कॉलनी -3 येथील निवास स्थानी  रक्षाविसर्ज होईल . ईश्वर त्यांच्या आत्म्यास चिरशांती देवो.