आई सोडून गेली, आजी स्वर्गवासी झाली ,बाप देवाघरी गेला, आता सांभाळी विठ्ठला !माळेवाडी येथील अनाथ मुलांची मदतीसाठी हाक.....
आई सोडून गेली, आजी स्वर्गवासी झाली ,बाप देवाघरी गेला, आता सांभाळी विठ्ठला !
माळेवाडी येथील अनाथ मुलांची मदतीसाठी हाक.....
मनोजकुमार मस्के:
दोन वर्षांपूर्वी आई घर सोडून पळून गेली. आईच्या माघारी बाप आणी आजी आईची माया देत होते. पण नियतीला ते मान्य नव्हते. या कुटुंबाला कुणाची दृष्ट लागली कुणास ठाऊक. ऑगस्ट मध्ये बापही हिरावून घेतला. आणी मायेचा हात तोंडावरून फिरविणारी आजी ही जग सोडून गेली. अगदी खेळण्या- बागडण्याच्या वयात त्या कोवळ्या लेकरांवर संसाराची धुरा सांभाळण्याची वेळ येऊन ठेपली. शेवटी आई पळून गेली, आजी देवाघरी गेली, बाप गेला, आता सांभाळी विठ्ठला... असे म्हणण्याची वेळ त्या चिमुकल्या भावा- बहिणींवर आली.
माळेवाडी ता. शिराळा येथील ही घटना मोठी मुलगी सुवर्णा चौदा वर्षांची, विद्या बारा वर्षांची, तर मुलगा प्रसाद आकरा वर्षांचा, अथर्व अवघ्या दहा वर्षांचा. चौघांच्याही वाट्याला अनाथाचं जगणं आलं.
दहा अकरा वर्षाची असतानाच आई-वडिलांची दररोज भांडणे होत असल्याने आई आम्हाला सोडून निघून गेली. त्यानंतर वडील आणि आजी आमचा चांगला संभाळ करत होते. परंतु थोडेच दिवसात वडील ही स्वर्गवासी झाले. पाठोपाठ आजी आम्हाला सोडून गेली आणि आम्ही अनाथ झालो. असे पाण्याने भरलेल्या डोळ्यांनी 14 वर्षाची सुवर्णा सांगत होती. आमचा संभाळ करण्यासारखी आमच्या चुलत्यांकडे किंवा पै- पाहुण्यांच्यात कोणाचीही परिस्थिती चांगली नाही. मांगरूळ येथे राहत असणारी आत्ती सुजाता व मामा अकाराम हे टॅक्सी ड्रायव्हर म्हणून काम करतात यांनी आश्रम शाळा जावडे रत्नागिरी येथे अनाथाश्रमात या भावंडांना ठेवले. तिथे शिक्षणाचा आणि जेवणाचा खर्च मोफत असल्याने सध्या ही चौघे भावंडे अनाथ आश्रमातच राहतात.आश्रम शाळेतील शिक्षक सुट्टीला गावाकडे आणून सोडतात गावाकडे चुलते आणि चुलती आहे. परंतु दोन्हीही अपंग त्यामुळे त्यांना जगणे मुश्किल असताना या चार मुलांचा ते कसा सांभाळ करतील. मांगरूळ येथे राहणारे आत्ती आणि मामा हे वरचेवर येत असतात कपडे देत असतात. परंतु तूटपुंज्या पगारात त्यांचच भागत नाही. मग या मुलांचं कुठून भागवणार आई, बाबा,अजी यापैकी कोणाचाच मायेचा हात तोंडावर फिरत नसल्याने दिलेल्या कपड्यांना उभारा मिळणार का? हा प्रश्न प्रामुख्याने उभा राहतो.
खरंतर ही भावंडे एकमेकांच्या चेहऱ्यावर हात फिरवतात आणि दुःख गिळून टाकतात. गरज आहे त्यांना मायेच्या उभाऱ्याची गरज आहे त्यांना पुढच्या वाटचालीची, आपल्याच भागातील ही अनाथ मुलं... काय त्यांचा गुन्हा होता! का बरं हे दुःख त्यांच्या वाटेला आले. कोण त्यांना जेवला का .. खाल्लं का... झोपला का.. म्हणून विचारत नाही. विचार केला तर अंगावर काटा मारतो.
मे महिन्याच्या सुट्टीत सरांनी गावाकडे आणून सोडलं खरं पण आधीच कसंतरी जगत असणारे चलते आणि चुलती त्यात या चिमुकल्याची भर ना कुणाची मदत ना कुणाची मेहरबानी खाल्लं तर खाल्लं नाही तर उपाशी राहिलं अशी अवस्था असताना या घराकडे खरंच धनवान आपल्या नजरा वळवतील का? आणि आपल्या खिशात हात घालून या कुटुंबाला मदत करतील का? या अशेची वाट बघत हे कुटुंब दिवस ढकलत आहे. खऱ्या अर्थाने या कुटुंबाला मदतीची गरज आहे. आज या कोवळ्या मुलांचा कोणताही दोष नसताना त्यांना या यातना का? भोगावे लागत आहेत. कदाचित येणारा काळ त्यांच्यासाठी सुखकर असेल परंतु चालू काळ हा त्यांच्यासाठी दुःखाचा पहाड आहे. शासनाने त्यांना मदत करावीच ही अपेक्षा असताना पैसे वाल्यानी किमान एका वेळेचे जेवण होईल एवढी मदत करावी. आज या कुटुंबाला मायेचा हात आणि आर्थिक साथ याची गरज आहे. आपण केलेली मदत या मुलांना आयुष्यात जगण्याची उमेद ठरू शकते.
चौकट
पंधरा तारखेपर्यंत शाळेची सुट्टी संपणार आहे. त्यानंतर ही मुलं आश्रम शाळा जावडे जि. रत्नागिरी येथे जाणार आहेत. तत्पूर्वी ज्या कोणाला या मुलांना आर्थिक सहाय्य करायचे असेल किंवा कपडे द्यायचे असतील तर त्यांना माळेवाडी येथील राहत्या घरी नेऊन द्यावी. या मुलांच्या जवळ कोणताही मोबाईल नाही. या संदर्भात संपर्क साधायचा असेल तर मामा आकाराम खांडेकर - 9702026875 या नंबरसी साधावा. AC no - 02705110016218
IFC:- Ibklosdc027
Comments
Post a Comment