देशासाठी बलिदान करणार्या क्रांतिवीरांच्या स्मृती कायम जपल्या पाहिजेत — मनोज मस्के.
देशासाठी बलिदान करणाऱ्या क्रांतिवीरांच्या स्मृती कायम जतन केल्या पाहिजेत. स्वातंत्र्य चळवळील शिराळा पेठ्याचे योगदान मोठे आहे, असे प्रतिपादन दैनिक पुण्यनगरी चे पत्रकार मनोज मस्के यांनी केले.
विश्वास विद्यानिकेतन,चिखली विद्यालयात क्रांतीदिन साजरा करण्यात आला. यावेळी ते बोलत होते. अध्यक्षस्थानी मुख्याध्यापक पी. आर. वरेकर होते.
प्रारंभी क्रांतीसिंह नाना पाटील यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले.
यावेळी मनोज मस्के म्हणाले, स्वातंत्र्य चळवळीत शिराळा तालुक्यातील क्रांतीकारकांचे योगदान मोठे आहे भारत छोडो आंदोलनाने संपूर्ण देश ढवळून निघाला. यामध्ये बिळाशी, मांगरूळ या गावातून मोठ्या प्रमाणात आंदोलन तीव्र करण्यात आले होते. मांगरूळ गावचे सुपूत्र हुतात्मा धोंडी संतू कुंभार व शंकर भाऊ चांभार या चौदा वर्षे वयाच्या मुलांनी आपले बलिदान दिले. तर ज्ञानू बाळा लुगडे यांच्या डाव्या पायात गोळी लागून जायबंदी झाले.
सांस्कृतिक विभाग प्रमुख मनीषा कुंभार, श्रीराज मोरे, यशराज कोळी यांनी भाषणे केली.
यावेळी समाजसेवक अजित पाटील, वैशाली शिंदे, प्राजक्ता पाटील ,तानाजी पाटील, ए.डी. माने सर्व शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी, विद्यार्थी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन सोनाक्षी माने हिने केले. परिचय मंथन निकम याने केला. प्रास्ताविक शर्वरी गोतपागर हिने केले.आभार राजश्री जाधव हिने मानले.
Comments
Post a Comment