संजय गणपती पाटील उर्फ संजू दादा भावपूर्ण श्रद्धांजली
*संजय गणपती पाटील उर्फ संजू दादा आज अचानक आपल्यातून निघून गेलेत त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली.
सतत हसरा चेहरा प्रत्येकाशी संवेदनशील वागणारा, नेहमीच उत्साही असणारा , प्रत्येकाला भविष्याची तरतूद करावयास सांगणारा, आयुष्य जगत असताना प्रत्येक पावलोपावली आपल्या भविष्याचा विचार करून जगता यावं यासाठी अनेकांना सल्ले देऊन अनेकांची कुटुंब ही सुखी समाधानी करणारा अनेकांच्या घरात बचतीची सवय लावणारा आज अचानक आम्हा सर्वांना सोडून गेला. मागे असणाऱ्या आपल्या लहान मुलांचा, पत्नीचा सर्वांचा हात सोडून परत न येण्याच्या वाटेवर संजू भाऊ तुम्ही निघून गेलात. नेहमी कुटुंबाचा विचार करत तुम्ही जगाला, त्या कुटुंबाला तुमचा मोठा आधार होता. एवढेच काय तर मित्र परिवारात सुद्धा तुम्ही नेहमीच रोखठोक बोलत होता. प्रत्येक सामुदायिक गोष्टीत पुढाकार घेऊन तुम्ही नेहमीच चांगल्या कामात सहभाग घेत होता. परवा तुम्ही माझ्यासोबत बराच वेळ बसलात गप्पा मारल्यात चहा घेतला. काल येताना तुम्ही दारात उभा असताना मी हॉर्न वाजवून तुम्हाला हात केला अतिशय सुंदर असं तुमचं ते हसणं पाहून बरं वाटलं आणि आज अचानक तुम्ही आम्हाला सोडून गेलेली बातमी कळली खरंच मनाला राहवलं नाही आणि डोळ्यातून आपोआप पाणी आलं. खरंतर जन्म मृत्यू कोणाला चुकलेला नाही परंतु तो तुमच्या बाबतीत इतक्या लवकर येईल असं कधीच वाटलं नव्हतं. कोणतीही चाहूल नाही की कोणताही उचका नाही, अचानक तुम्ही आम्हा सर्वांना सोडून गेलात हे पचवणं तेही इतकं सोपं नाही. तुम्ही स्वतःला वाचवण्याचा सुद्धा आम्हा लोकांना प्रयत्न करू दिला नाही. भले तुम्ही बसुन असता तरीसुद्धा कुटुंबाला एक आधार झाला असता किंबहुना आम्हालाही तो आधार वाटला असता. आता मात्र तुम्हाला विसरणं फार कठीण आहे. तुमचा मित्र परिवार, तुमचे जोडीदार आणि तुमचं कुटुंब आज धाईमोकलून रडत आहे फक्त त्यांची एवढीच इच्छा आहे तुम्ही एकदा परतून माघारी यावं*...
Comments
Post a Comment