मांगरुळमधील पैलवानांचा गणपती! पैलवान

मांगरुळमधील पैलवानांचा गणपती!  पैलवान....
मांगरूळ वार्ताहर : 
मांगरूळ येथे गणेशोत्सव जल्लोषात साजरा केला जातो.  मांगरूळला तसा क्रांतीकारकांचा मोठा इतिहास आहे. शिवकालीन, पेशवेकालीन व गणेशत्सवाचा मांगरूळ गाव साक्षीदार आहे. त्याचबरोबर पैलवानकीचा सुद्धा साक्षीदार आहे. अनेक नामांकित पैलवान या मांगरूळगावातून तयार झाले . पैलवानकीचा ऐतिहासिक वारसा आपल्याला मांगरुळातील गणेशोत्सवात पाहायला मिळतो.   तालमीतील गणपती हा मानाचा व संपूर्ण गावाचा गणपती समजला जातो.

1947 ला देश स्वातंत्र्य झाल्यानंतर कुस्तीची परंपरा पुढे गेली. गावोगावी तालमी उभ्या राहील्या.  यात अनेक पैलवान तयार होत होते.  प्रत्येक तालमीत हनुमानाचं मंदिर असतं. त्याचं प्रमाणे तालमीच्या पैलवानांनी गणपती बसवण्याची परंपंरा ही कायम पुढे चालवली. या वर्षी पैलवानाच्या रूपातील गणेशमूर्ती साकारून संपूर्ण गावासह ईतर परीसराचे लक्ष वेधून घेतले. चक्क हुबेहूब पैलवानच  असल्यासारखे भासवणारी गणेशमुर्ती कौतुकाचा विषय ठरत आहे.  हि मुर्ती पाहण्यासाठी भाविक मोठ्या प्रमाणात गर्दी करताना दिसत आहेत. गावात प्रत्येक गल्लीत ऐक मंडळ असले तरी तालमीचा गणपती हाच मानाचा गणपती समजला जातो. 

Comments

Popular posts from this blog

शिरशी गावच्या लोकनियुक्त पहिल्या सरपंच – सौ. स्मिताताई बापूराव भोसले

*शिराळा उत्तरच्या मातीत दोन दिवसांपूर्वी जे घडलं, ते फक्त निवडणूक नव्हतं*… *तो विश्वासाचा, नात्याचा आणि घराण्याच्या संस्कारांचा विजय होता*.

*सोंडोलीमध्ये रंगणार दोन महाराष्ट्र केसरींची तुफानी दंगल देवा थापा स्पर्धेचे खास आकर्षण*