Posts

अमृत महोत्सवाच्या शासकीय उपचारात उपमुख्यमंत्री फडणवीस का नव्हते?- मधुकर भावे

Image
अमृत महोत्सवाच्या शासकीय उपचारात उपमुख्यमंत्री फडणवीस का नव्हते? - मधुकर भावे मराठवाडा मुक्तीसंग्रामाचा अमृत महोत्सव साजरा झाला.  शासकीय पातळीवरच साजरा झाला. संपूर्ण मराठवाड्यात लोकांतर्फे हा महोत्सव ज्या पद्धतीने साजरा व्हायला पाहिजे होता, तसा झाला नाही. खरं म्हणजे तसं वाचतावरणच तयार केले गेले नाही. हे वातावरण नेत्यांनी करायचे असते. त्याकरिता नियोजन असावे लागते. सरकारच्या कल्पना आणि नियोजन मर्यादित आहे. त्यामुळे झेंडा फडकवला, राष्ट्रगीत गायले... मराठवाड्याच्या ‘मागास’ या शब्दाला पुसून टाकण्याचे आश्वासन देवून झाले... कार्यक्रम संपला.  हा मुक्तीसंग्रामाचा महोत्सव अजिबात वाटला नाही. थोडासा अपवाद लातूरचा. तिथे एका चांगल्या ग्रंथाचे प्रकाशन झाले. त्या संबंधात  जनार्दन वाघमारे यांच्यासारख्या माजी कुलगुरुंची मुलाखत... असे कार्यक्रम वातावरण निर्मिती करत असतात. मी १५ अॅागस्ट १९९७ ला म्हणजे देशाच्या स्वातंत्र्याला ५० वर्षे झाली त्यावेळी, लातुरच्या ‘एकमत’ला संपादक म्हणून काम करत होतो. सुवर्ण महोत्सवाचा स्वातंत्र्यदिन साजरा  केला. सकाळी ‘एकमत’ कार्यालयात ‘स्वातंत्र...

शिराळा शहर आणि तालुका कडकडीत बंद

Image
*शिराळा शहर आणि तालुका कडकडीत बंद*  *सकल मराठा समाज, मुस्लिम समाज व नागरिकांच्या वतीने तहसिलदार निवेदन* जालना जिल्ह्यातील अंतरावली सराटी येथे शांततामय मार्गाने सुरू असलेल्या उपोषणस्थळी पोलीसांनी केलेल्या बेछूट लाठीचार्जच्या निषेधार्थ दि. ०७ सप्टेंबर रोजी शिराळा शहर आणि तालुक्यात कडकडीत बंद पाळण्यात आला. सकल मराठा समाजाच्या वतीने करण्यात आलेल्या बंदच्या आवाहनास शिराळा शहरासह तालुक्यातील व्यापारी, व्यावसायिक व नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. दैनंदिन व्यवहार, बाजारहाट पूर्णतः ठप्प झाल्याने मुख्य चौक, रहदारीचे रस्ते आणि बाजारपेठांमध्ये शुकशुकाट होता. अत्यावश्यक सेवा व आरोग्य सुविधा वगळून सदर बंद पार पडला.  सकल मराठा समाजाच्या वतीने शिराळा तहसिलदार कार्यालय येथे जालना येथील घटनेचा निषेध नोंदविण्यात आला‌. लाठीचार्ज करणा-या पोलीस अधिकाऱ्यांना तात्काळ आदेशाने बडतर्फ करावे; सदर अमानवी लाठीचार्जची नैतिक जबाबदारी स्वीकारून गृहमंत्र्यांनी राजीनामा द्यावा व मराठा समाजाच्या आरक्षणाचा प्रश्न तातडीने सोडवावा आदी मागण्यांचे निवेदन तहसिलदारांना देण्यात आले. यावेळी शिराळा तालुक्...

*एकाच रात्रीत 23 घरफोड्या करणाऱ्या टोळीतील तिघेजन कोकरूड पोलिसांच्या हाती* ...

Image
*एकाच रात्रीत 23 घरफोड्या करणाऱ्या टोळीतील  तिघेजन कोकरूड पोलिसांच्या हाती* ...  बिळाशी ता.शिराळा  येथील चौदा, मांगरुळ पाच, बेलेवाडी एक, अस्वलेवाडी एक, रिळे दोन असे एकूण तेवीस  बंद असलेली घरे, एका रात्रीत चोरट्यांनी फोडून सुमारे एक लाख सव्वीस हजार रुपये किमतीचा मुद्देमाल लंपास केला होता. सातारा पोलिसांनी परिसरातील घरफोडी मधील संशयित आरोपी सुरदेव सिलोन नानावत, परदुम सिलोन नानावत रा. घोटवडे ता. मुळशी, राम धारा बिरावत रा. करमोळी ता. मुळशी, जिल्हा. पुणे या तीन आरोपींना अटक केली होती. त्यांचा ताबा कोकरूड पोलीसांनी घेवून न्यायालयात हजर केले असता त्यांना पाच दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. पोलिसाकडून मिळालेली माहिती अशी की, सातारा जिल्ह्यातील भुईंज, मेढा, वाई, वाटार स्टेशन पोलीस ठाण्याच्या हद्दीत बावीस घरफोड्या झाल्या होत्या. या चोरीतील तीन संशयित आरोपींना सातारा एल. सी. बी. च्या टीमने अटक केली होती. त्यांचा ताबा कोकरूड पोलिसांनी घेतला असून आरोपींना शिराळा न्यायालयात हजर केले असता, त्यांना पाच दिवसाची पोलीस कोठडी सुनावण्यात आली. चोरट्यांनी एका रात्रीत ब...

*मांगरूळच्या राजकारणातील एक चाणक्य हरपला*....*माजी सभापती पंचायत समिती शिराळा आकाराम चंद्रू मस्के यांचे निधन*....

Image
*मांगरूळच्या राजकारणातील एक चाणक्य हरपला*.... *माजी सभापती  पंचायत समिती शिराळा आकाराम चंद्रू मस्के यांचे निधन*.... मांगरूळ गावचे चाणाक्ष राजनैतिक, स्वाभिमानी नेतृत्व, व शिराळा तालुक्याचे माजी उपसभापती, सहकार शिक्षण क्षेत्रातील अभ्यासू व्यक्तिमत्व, प्रशासकीय पातळीवर ज्यांच्या रुबाबदारीची छाप असणारे, भरदार मिशा, अंगात नेहरू शर्ट, त्यावर धोतर पायात कोल्हापुरी पायतान, तलवारी सारख्या लांबलचक मिशा असा हा राजबिंडा दिसणारा पुढारी आकाराम मस्के  (बापू) यांचे आज दि. २३/८/२३ रोजी  सकाळी  त्यांचे आजारी असल्याने निधन झाले. संपूर्ण कुटुंबात बापूंचा एक वेगळा दरारा असायचा... किंबहुना बापूंचा शब्द मोडून पुढे जाण्याची कोणाचीही हिंमत नव्हती. संपूर्ण कुटुंब एकीने ठेवण्यात बापू माहेर होते. बापूंनी इतक्या वर्ष राजकारण केलं परंतु चुकीला चुकी आणि बरोबरला बरोबरच म्हणत राजकारण केलं . खऱ्या अर्थाने राजकीय पुढाऱ्यांनी कसं दिसावं हे बापूंच्या कडून शिकावे. शिवाय राजकारणातील  डावपेच त्यातील अभ्यास कुठल्या वेळेत काय केलं पाहिजे याचा परफेक्ट अंदाज असणारा हा मंगरूळ गावचा पुढारीच होता...

के. डी. पाटील (दादा) यांना वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा!

Image
मांगरूळ गावचे ज्येष्ठ नागरिक आणि एकेकाळचे सुप्रसिद्ध वकील, प्रत्येक गोष्ट  कणखरपणे मांडणारे व एखाद्याच्या मदतीला धावून जाणारे एक अभ्यासू व्यक्तिमत्त्व म्हणून ज्यांना ओळखलं जातं असे कृष्णराव दादू पाटील म्हणजेच के. डी. पाटील (दादा) यांना वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा!  पहिल्यापासूनच दादा हुशार आणि अभ्यासू होते.  गरीब कुटुंबात दादांचा जन्म झाला. संघर्ष हा जणू त्यांच्या पाचवीलाच पजलेला होता. आयुष्याची वाटचाल करत असताना अनेक संघर्षांना सामोरे जात आपलं आयुष्य नेहमी हसत खेळत आणि दुसऱ्याच्या आनंदात आपला आनंद मानत पुढे ढकलणारे दादा खऱ्या अर्थानं सर्वांचे आवडते आहेत. आई-वडिलांची सेवा करणारे दादा आम्ही जवळून पाहिले आहेत. पत्नीच्या आजारपणात ही सेवा दादांनी न डगमगता केली. शिवाय मुलांचे ही पालन पोषण अतिशय कणखरपणे केले. खरं पाहता मधुमेह सारख्या आजाराने ग्रासलेले असताना देखील त्यांचे वाचन क्षमता आणि वैचारिक बुद्धीत मात्र कधीही खंड पडला नाही. नेहमी दुसऱ्याला योग्य सल्ला देणारे आणि गावच्या विषयी तळमळ असणारे, आमच्या सर्वांच्या आवडीचे के. डी. पाटील दादा यांना वाढदिवसाच्या...

मंगरूळ गावातील सर्व नागरिकांना माता भगिनींना कळविण्यात येते की,

Image
*मंगरूळ गावातील सर्व नागरिकांना माता भगिनींना कळविण्यात येते की, प्रत्येक वर्षी नागपंचमीच्या सणाला आपल्या गावातील नाभिक समाज आपल्या मानाच्या नागोबाला घेऊन मारुती मंदिरात येत असतात. पूर्वी गावातील महिला व छोटी मुलं (मेपटं आणि कटकं) घेऊन आनंद व्यक्त करत होते, महिला या मानाच्या नागोबाला पुजन्यासाठी आणि समस्या सोडवण्यासाठी साकडं घालण्यासाठी मोठ्या संख्येने उपस्थित राहत होत्या. अलीकडील काळात नाभिक समाज नित्यनेमाने आपला नागोबा घेऊन येतात खरं परंतु त्या नागोबाचा गावातील अनेक महिलांना व मुलांना विसर पडलेला दिसतोय. नाभिक समाजाकडून ही परंपरा आज सुद्धा अखंडी चालू आहे. परंतु नागरिक म्हणून भाविक भक्त म्हणून आपण या परंपरे कडे दुर्लक्ष करतोय माझी विनंती आहे किमान यावर्षीपासून तरी या नागोबाला पुजण्यासाठी आणि नागोबा जवळ झिम्मा फुगडी खेळण्यासाठी सर्व महिलांनी सायंकाळी ५.०० वाजता मारुती मंदिर परिसरात येऊन या मानाच्या नागोबाचं दर्शन घ्यायचं आहे. आपल्याच गावातील बाळू गायकवाड या नागोबाला घेऊन सायंकाळी ५.०० वाजता मारुती मंदिर परिसरात येणार असल्याचे त्यांनी सांगितले आहे. कृपया विनंती आहे आपण आपली ...

*वडापच्या गाडीवर उभा केला संसार.... कमांडर गाडीचा २५ वा वाढदिवस साजरा.. संपूर्ण गावात जेवणाचे नियोजन*....

Image
*वडापच्या गाडीवर उभा केला संसार....  कमांडर गाडीचा २५ वा वाढदिवस साजरा.. संपूर्ण गावात जेवणाचे नियोजन*....  मनोजकुमार मस्के - मांगरूळ काही वर्षांपूर्वी अशी गाडी होती. जिचे पाचही दरवाज्यातून खुली हवा खात लोक प्रवास करत होते. हल्लीच्या पिढीला हे  पटणार नाही. महेंद्र कंपनीची कमांडर गाडी होती ती. खऱ्या अर्थाने या गाडीने अनेकांचे संसार उभा केले. ग्रामीण भागातील अनेक तरुण आपल्या उदरनिर्वाहाचे साधन म्हणून  या गाडीकडे बघत होते. शासनाने या वडाप करणाऱ्या गाड्यांवरती निर्बंध आणले आणि अनेकांनी आपल्या गाड्या तोटा सहन करून विकल्या. अनेकजण या गाडीमध्ये कर्ज काढून ते परतफेड न करू शकल्याने बुडाले... परंतु याला अंत्री खुर्द येथील धोंडीराम वरेकर अपवाद ठरले. व्यवसायाच्या दृष्टिकोनातून घेतलेल्या त्यांच्या कमांडर गाडीला चक्क २५ वर्षे पूर्ण झाली आहेत. खऱ्या अर्थाने या गाडीच्या जोरावर धोंडीराम त्यांनी आपला संसार उभा केला.  नोकरीमध्ये अयशस्वी होत असल्याने आणि व्यवसायाची आवड असल्याने गाडीच्या जोरावर त्यांनी मुलांचे शिक्षण पूर्ण केले.  त्यांचा एक मुलगा मुंबई येथे बेस्ट मध...