मंगरूळ गावातील सर्व नागरिकांना माता भगिनींना कळविण्यात येते की,
*मंगरूळ गावातील सर्व नागरिकांना माता भगिनींना कळविण्यात येते की, प्रत्येक वर्षी नागपंचमीच्या सणाला आपल्या गावातील नाभिक समाज आपल्या मानाच्या नागोबाला घेऊन मारुती मंदिरात येत असतात. पूर्वी गावातील महिला व छोटी मुलं (मेपटं आणि कटकं) घेऊन आनंद व्यक्त करत होते, महिला या मानाच्या नागोबाला पुजन्यासाठी आणि समस्या सोडवण्यासाठी साकडं घालण्यासाठी मोठ्या संख्येने उपस्थित राहत होत्या. अलीकडील काळात नाभिक समाज नित्यनेमाने आपला नागोबा घेऊन येतात खरं परंतु त्या नागोबाचा गावातील अनेक महिलांना व मुलांना विसर पडलेला दिसतोय. नाभिक समाजाकडून ही परंपरा आज सुद्धा अखंडी चालू आहे. परंतु नागरिक म्हणून भाविक भक्त म्हणून आपण या परंपरे कडे दुर्लक्ष करतोय माझी विनंती आहे किमान यावर्षीपासून तरी या नागोबाला पुजण्यासाठी आणि नागोबा जवळ झिम्मा फुगडी खेळण्यासाठी सर्व महिलांनी सायंकाळी ५.०० वाजता मारुती मंदिर परिसरात येऊन या मानाच्या नागोबाचं दर्शन घ्यायचं आहे. आपल्याच गावातील बाळू गायकवाड या नागोबाला घेऊन सायंकाळी ५.०० वाजता मारुती मंदिर परिसरात येणार असल्याचे त्यांनी सांगितले आहे. कृपया विनंती आहे आपण आपली परंपरा जपणं आणि एकत्र येऊन सण साजरे करणं गरजेचं आहे धन्यवाद*!
Comments
Post a Comment