के. डी. पाटील (दादा) यांना वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा!
मांगरूळ गावचे ज्येष्ठ नागरिक आणि एकेकाळचे सुप्रसिद्ध वकील, प्रत्येक गोष्ट कणखरपणे मांडणारे व एखाद्याच्या मदतीला धावून जाणारे एक अभ्यासू व्यक्तिमत्त्व म्हणून ज्यांना ओळखलं जातं असे कृष्णराव दादू पाटील म्हणजेच के. डी. पाटील (दादा) यांना वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा!
पहिल्यापासूनच दादा हुशार आणि अभ्यासू होते. गरीब कुटुंबात दादांचा जन्म झाला. संघर्ष हा जणू त्यांच्या पाचवीलाच पजलेला होता. आयुष्याची वाटचाल करत असताना अनेक संघर्षांना सामोरे जात आपलं आयुष्य नेहमी हसत खेळत आणि दुसऱ्याच्या आनंदात आपला आनंद मानत पुढे ढकलणारे दादा खऱ्या अर्थानं सर्वांचे आवडते आहेत. आई-वडिलांची सेवा करणारे दादा आम्ही जवळून पाहिले आहेत. पत्नीच्या आजारपणात ही सेवा दादांनी न डगमगता केली. शिवाय मुलांचे ही पालन पोषण अतिशय कणखरपणे केले. खरं पाहता मधुमेह सारख्या आजाराने ग्रासलेले असताना देखील त्यांचे वाचन क्षमता आणि वैचारिक बुद्धीत मात्र कधीही खंड पडला नाही. नेहमी दुसऱ्याला योग्य सल्ला देणारे आणि गावच्या विषयी तळमळ असणारे, आमच्या सर्वांच्या आवडीचे के. डी. पाटील दादा यांना वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा
Comments
Post a Comment