शिराळा शहर आणि तालुका कडकडीत बंद
*शिराळा शहर आणि तालुका कडकडीत बंद*
*सकल मराठा समाज, मुस्लिम समाज व नागरिकांच्या वतीने तहसिलदार निवेदन*
जालना जिल्ह्यातील अंतरावली सराटी येथे शांततामय मार्गाने सुरू असलेल्या उपोषणस्थळी पोलीसांनी केलेल्या बेछूट लाठीचार्जच्या निषेधार्थ दि. ०७ सप्टेंबर रोजी शिराळा शहर आणि तालुक्यात कडकडीत बंद पाळण्यात आला. सकल मराठा समाजाच्या वतीने करण्यात आलेल्या बंदच्या आवाहनास शिराळा शहरासह तालुक्यातील व्यापारी, व्यावसायिक व नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. दैनंदिन व्यवहार, बाजारहाट पूर्णतः ठप्प झाल्याने मुख्य चौक, रहदारीचे रस्ते आणि बाजारपेठांमध्ये शुकशुकाट होता. अत्यावश्यक सेवा व आरोग्य सुविधा वगळून सदर बंद पार पडला.
सकल मराठा समाजाच्या वतीने शिराळा तहसिलदार कार्यालय येथे जालना येथील घटनेचा निषेध नोंदविण्यात आला. लाठीचार्ज करणा-या पोलीस अधिकाऱ्यांना तात्काळ आदेशाने बडतर्फ करावे; सदर अमानवी लाठीचार्जची नैतिक जबाबदारी स्वीकारून गृहमंत्र्यांनी राजीनामा द्यावा व मराठा समाजाच्या आरक्षणाचा प्रश्न तातडीने सोडवावा आदी मागण्यांचे निवेदन तहसिलदारांना देण्यात आले. यावेळी शिराळा तालुक्यातील समस्त मुस्लिम समाजाच्या वतीने मराठा आरक्षणास पाठिंबा व आरक्षणाची पूर्तता करण्याची मागणी करणारे निवेदन तहसिलदारांना दिले. यावेळी पोलीस निरीक्षक सिद्धेश्वर जंगम उपस्थित होते. अमित गायकवाड यांनी प्रास्ताविक केले. कासम अली पठाण, ॲड. अक्षय कदम, रामचंद्र पाटील, प्रा. सम्राट शिंदे, अजय जाधव यांनी मनोगत व्यक्त केले. कैलास देसाई यांनी आभार मानले.
याप्रसंगी प्रमोद नाईक, सर्जेराव कोकाटे, महादेव कदम, दस्तगीर आत्तार, सुनिल कवठेकर, राजेंद्र निकम, प्रताप पाटील, सचिन शेटे, संभाजी गायकवाड, ॲड. रवि पाटील, संजय हिरुगडे, तानाजी करंजवडे, विनोद कदम, वसंत कांबळे, डॉ. मिलिंद साळवे, पृथ्वीराज पाटील, उत्तम पाटील, जितेंद्र गायकवाड, बाळासाहेब पाटील, आकाश कांबळे, फिरोज मुजावर, संजय देसाई, नितेश निकम, अजित देसाई, निखिल साळुंखे, खलील मोमीन, अमर खबाले, अंकुश देसाई, वैभव गायकवाड, अविनाश खोत, अमित देसाई, राजेंद्र कदम, विक्रमसिंह पाटील, निलेश आवटे, कुलभूषण पाटील, ऋषिकेश पाटील, अभिषेक नायकवडी, सुनिल पवार, प्रसाद पाटील, संभाजी पाटील, संदिप कदम, अशोक पाटील, सचिन उर्फ पिनू पाटील, राहुल पाटील, अमर पाटील, दिग्विजय पाटील, अमोल पाटील, मारूती रोकडे आदींसह मराठा समाजबांधव आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
Comments
Post a Comment