*मांगरूळच्या राजकारणातील एक चाणक्य हरपला*....*माजी सभापती पंचायत समिती शिराळा आकाराम चंद्रू मस्के यांचे निधन*....
*मांगरूळच्या राजकारणातील एक चाणक्य हरपला*....
*माजी सभापती पंचायत समिती शिराळा आकाराम चंद्रू मस्के यांचे निधन*....
मांगरूळ गावचे चाणाक्ष राजनैतिक, स्वाभिमानी नेतृत्व, व शिराळा तालुक्याचे माजी उपसभापती, सहकार शिक्षण क्षेत्रातील अभ्यासू व्यक्तिमत्व, प्रशासकीय पातळीवर ज्यांच्या रुबाबदारीची छाप असणारे, भरदार मिशा, अंगात नेहरू शर्ट, त्यावर धोतर पायात कोल्हापुरी पायतान, तलवारी सारख्या लांबलचक मिशा असा हा राजबिंडा दिसणारा पुढारी आकाराम मस्के (बापू) यांचे आज दि. २३/८/२३ रोजी सकाळी त्यांचे आजारी असल्याने निधन झाले. संपूर्ण कुटुंबात बापूंचा एक वेगळा दरारा असायचा... किंबहुना बापूंचा शब्द मोडून पुढे जाण्याची कोणाचीही हिंमत नव्हती. संपूर्ण कुटुंब एकीने ठेवण्यात बापू माहेर होते. बापूंनी इतक्या वर्ष राजकारण केलं परंतु चुकीला चुकी आणि बरोबरला बरोबरच म्हणत राजकारण केलं . खऱ्या अर्थाने राजकीय पुढाऱ्यांनी कसं दिसावं हे बापूंच्या कडून शिकावे. शिवाय राजकारणातील डावपेच त्यातील अभ्यास कुठल्या वेळेत काय केलं पाहिजे याचा परफेक्ट अंदाज असणारा हा मंगरूळ गावचा पुढारीच होता. अनेक वर्ष बापूंनी राजकारणात काढली शिवाजीराव देशमुख यांचे ते अत्यंत जवळचे सहकारी. मांगरूळ मध्ये आकाराम बापू यांच्याशिवाय देशमुख पार्टी चे पान सुद्धा हलत नव्हते. राजकारण काय असतं हे मांगरूळच्या पुढार्याला पाहिल्यावर आपोआप समजत होतं. नुसतं बापुंच्याकडे बघितलं तरी तो पुढारी आहे हे समोरच्याला न सांगता समजत होतं. बापुंचे वय ८५ वर्ष होते. एखाद्या आमदाराला सुद्धा लाजवेल अशी त्यांची राहणीमान होती. राजकारण करत करत शेतीतून मिळणाऱ्या उत्पन्नावर बापूंनी आपल्या चारही मुलांचे शिक्षण पूर्ण केले. किंबहुना त्यांची लग्नही केली. कुठेही नोकरीला नसणारा हा माणूस शेतीच्या जीवावर आपलं कुटुंब संभाळून तालुक्याचं राजकारणही करत होते. संपूर्ण तालुक्यात या माणसाला पुढारी म्हणूनच ओळखलं जातं होतं आज ते अचानक आपल्यातून निघून गेल्याने मांगरूळच्या राजकारणात एक पोकळी निर्माण झाली एवढे मात्र नक्की. बापूंना भावपूर्ण श्रद्धांजली
श्री मनोज मस्के - मांगरूळ
Comments
Post a Comment