Posts

*मी एक समाजसेवक आहे मी कोणताही राजकिय पुढारी नाही*

Image
भारतीय शैली कुस्ती महासंघाचे उपाध्यक्ष मा. डी. आर. जाधव (आण्णा) यांचा वाढदिवस 2 जून ला प्रत्येक वर्षी केला जातो. महाराष्ट्राच्या लाल मातीला मिळालेला एक अश्रयदाता, आणि ग्रामिण भागातील एक दानशुर आणि दानतदार व्यक्तीमत्व म्हणजेच डी. आर. जाधव (आण्णा). आण्णांना वाढदिवस साजरा करणे हे अजिबात अवडत नाही पण मित्रांना दुखवणं हे त्यांच्या रक्तात नाही. नेहमी दुसर्‍याला देणारा हा कर्ण स्वत:साठी कधीच कोणाकडे काही मागत नाही. आण्णा नेहमी आपले गेलेले दिवस कुणालाही तसे दिवस येऊ नये म्हणून सतत आपल्या हातून जेवढे दान करता येईल तेवढे दान गरिब होतकरू व मेहनती मुलांना देत असतात. त्यामुळे या माणसाला अनेक चाहत्यांनी आपले दैवत मानले. आण्णांनी यशाचं शिखर गाठलं पण पाय नेहमी जमिनीवरच ठेवले . आण्णा आपली गरिबी सांगत होते. गावातील लोकांनी चिपट्या कोळव्याने आईला केलेली मदत. आणि लोकांच्या पाहुणेरावर जाऊन स्वत: न खाता आम्हा भावंडांना वडीलांनी घातलेलं जेवन. हे सांगत असताना मात्र आण्णा स्वत:हाला अश्रु डाहळण्यापासून रोकू शकले नाहीत. ओठ थरथरू लागले व आण्णांच्या डोळ्यातून पाणी येऊ लागले.  स्वर्गीय वसंतदादांनी आ...

*शाहूवाडी तालुक्यातील... येथे सापडले गुप्तधन*

Image
*शाहूवाडी तालुक्यातील अनुस्कुरा येथे सापडले गुप्तधन*---भेडसगाव/मारुती फाळके कोल्हापूर जिल्ह्याची सरहद्द. व शाहूवाडी तालुक्यातील शेवटचे.गाव अणूस्कूरा. पाचशे.पेक्षा. ही कमी लोकसंख्या असलेल्या एका छोट्याशा गावाला शिवकाळात . खूप महत्व होते. या गावातील विनायक पाटील याच्या शेताचे सपाटीकरण करत असताना पूरातन. खजिना मांतीच्या भांड्यात सापडला. मांतीच्या भांड्यात ७१६ जुनी नाणी सापडली. . अणूस्कूरा गावातील पाटील.  कुटूंबियानी वेगळा आदर्श निर्माण करून कोणताही मोह.न. बाळगता प्रशासनाला माहीती कळविली. पुरातन खजिना प्रांत अधिकारी श्री बी.आर. माळी शाहूवाडीचे तहसिलदार श्री गुरु बिरासदार व कृषी अधिकारी यांच्याकडे सुर्पूद केला अणूस्कूरा या गावाला पूर्वी चौकेवाडी ह्या नावाने ओळखले जात. रत्नागिरी जिल्हयातील राजापूर सीमेलगत कोल्हापूर जिल्ह्याच्या धाटमाथावर वसलेले आहे.कोल्हापूर, रत्नागिरी व  सिंधूदूर्ग या तीन जिल्हयांना एका माळेत गुंफण्याची अवघड किमया या घाटाने केली आहे. त्यामूळे कोल्हापूर वासियांना कोकणाशी व्यापार उद्दीमसह दळणवळण व सामाजिक सांस्कृतिच्या दृष्टीने अणूस्करा घाट विकासाचा मानदं...

तेव्हा मात्र पायाखालची जमीनच सरकली...

Image
काहीतरी म्हणजे काय लिहायचे...? माझ्या आयुष्यातील कोरोना....  यावर  काहीतरी  लिहिते... हा   कोरोना  जेव्हा  भारतात आला  तेव्हाच  कळले  कोरोना काय आहे तो किती  भयंकर आहे ..  पण तो इतक्या लवकर  माझ्या  आयुष्यात येईल असं जरा पण वाटले  नाही... लॉकडाऊन पर्यन्त  वाटत होते मी स्वतःची  खुप  काळजी घेते .. त्यामुळे  तो माझ्या जवळ येणारच नाही... पण तो माझ्या  ऑफिस प्रयन्त कधी येऊन पोचला ते कळलेच नाही... त्यानंतर ऑफिस मध्ये  खुप भीतीचे वातावरण निर्माण झाले...  पूर्ण  महाराष्ट्र लॉकडाऊन झाले...पण  अत्यावश्यक सेवेत असल्यामुळे मला ऑफिस ला जावेच लागत होते.. न जाऊन चालणार   न्हवते...  पण जेव्हा  ऑफिस मधील एका  व्यक्तीला कोरोना झाला आणि त्यांची डेथ झाली...  तेव्हा  मात्र पायाखालची जमीनच सरकली...  त्यानंतर  मला  कोरोनाची  लक्षणे  सारखी भासू  लागली... कारण  माझी  एक वर्षाची मुलगी  विरा तीची काळजी असल्यामुळे...

आम्ही तुमच्या नियमाचे पालन करु पण आम्हाला गावात घ्या

Image
- मनोजकुमार मस्के - शिराळा सध्या कोरोना विषाणूचा संसर्ग झाल्यामुळे सर्व मानवाचे जीवन विस्कळीत झाले आहे. आज माणसाला प्रत्येक माणूस रोगी असल्याचा भास होत आहे. पोटचं पोरगं जरी मुंबईवरुन आलं असेल.  तर आई त्याला दारातच उभी करते आहे. एवढंच काय तर जनावरांच्या गोट्यात सुद्धा त्याला जागा दिली जात नाही. का ? तर म्हणे त्याच्यामुळे जनावरांना हा रोग होईल. माणसाजवळच्या माणुसकीची खरी ओळख या कोरोनाच्या काळात प्रत्येक मुंबईकर अनुभवत आहे.       याचाच प्रत्यय अनेक गावात येत आहे. प्रत्येक निवडणुकीच्या काळात स्व:ता चे पैसे देऊन मतदानासाठी गावाला आणनारे गाव पुढारी. आज मात्र मुंबईकर गावात येऊ नये म्हणुन प्रयत्न करत आहेत. परवा शाहुवाडी तालुक्यातील ९३ मुंबईकरांना शाहुवाडी तालुक्याच्या हद्दीवरून परत मुंबईला जावं लागले. कोणतेही लोकप्रतीनिधी उपयोगी पडले नाही की या लोकांनी काय खल्ले काय नाही याची देखील विचारपुस केली नाही. कोकरूड पोलीस ठाण्याचे फोजदार दत्तात्रय कदम  व कर्मचारी यांनी त्या लोकांना जेऊ घातले. व त्यांनंतर त्यांना परत मुंबईस जावे लागले.    त्याच बरोबर न...

शिराळा कोकरूड रोडवर दिले मगरीने दर्शन

Image
शिराळा : -   सध्या कोरोनाच्या भितीने अनेक लोक त्रस्त असतानाच शिराळा तालुक्यातील बिळाशी या गावाच्या शेजारील शिराळा कोकरूड रोडवरून  चक्क मगर रस्ता पार करत असताना बिळाशी गावचे नागरीक शकील मुलानी यांनी पाहीले. त्यांच्या गाडीच्या प्रकाशात ही मगर रस्ता पार करुन नदीच्या दिशेने जाताना शकील मुलानी यांनी आपल्या मोबाईल मध्ये कैद केले. हीच मगर मागील आठ दिवसापुर्वी मांगरुळ येथील वारणा डावा कालवा बोगद्याच्या तोंडशी अनेक नागरीकांना दिसली होती. त्या दिवशी पासुन बोगद्याच्या तोंडाशी कोणीही जात नाहीत. या कालव्यात चांदोली धरणातील पाणी शेतीसाठी सोडण्यात येते. त्यामुळे या पाण्याच्या प्रवाहासोबत ही मगर खली आली आसावी असा वनखात्याचे म्हणने आहे. मागील आठदिवसा पुर्वी मांगरूळ बोगद्या शेजारी पाहण्यात आलेली व बिळाशी येथील रस्त्यावरून गेलेली मगर ही एकच आहे असे वनखात्याचे प्रकाश पाटील यांनी सांगितले.       या संदर्भात वनखात्याशी माहीती घेतली असता ही मगर भानुदास पाटील यांच्या विहरीत असल्याने ती पाण्यात पकडणे शक्य नसल्याचे वनसंरक्षक प्रकाश पाटील यांनी सांगीतले. दिनांक १४/०५/२०२०  ...

माणूस “मागे” असण्याची २३ कारणे…

Image
माणूस “मागे” असण्याची २३ कारणे… आर्थिक सल्लागार मकरंद गाडगीळ यांच्या लेखणीतून… 1. कमी प्रवास प्रवास केल्याने जग कळते, कल्पना सुचतात, मार्ग सापडतात व प्रगती होते. मराठी माणूस आर्थिक स्थितीमुळे फारसा प्रवास करताना दिसत नाही, अनेक औद्योगिक प्रदर्शनात मराठी माणूस दिसत नाही. 2.अति राजकारण सर्वतजास्त मराठी माणूस राजकारण वेडा आहे. राजकीय नेत्यांच्या सभेला आपला कामधंदा सोडून लाखोंच्या संख्येने येणारा मराठी माणूसच असतो. यात व्यापारी समाजातला एक तरी माणूस दिसतो का? मी काय करतो आहे या पेक्षा लोकांनी काय केले, काय करतात यात जास्त लक्ष. 3.दोनच हात कमावणारे सर्वसाधारण मराठी कुटुंबात एकच व्यक्ती कमवते. कुटुंबातील जास्तीत जास्त लोकांनी काम केले पाहिजे. 4.सर्वांची तोंडे वेगळ्या दिशेला – कुटुंबात एकी नसते. बाप एका दिशेला, मोठा मुलगा एका दिशेला तर लहान भाऊ तिसरीकडेच. प्रत्येक कुटूंबात एकी पाहिजे. ५) खोटं बोल पण रेटून बोल – सगळ्या थापा एकमेकांना गंडवण्याच्या गोष्टी, खरे सांगण्यासारखे नसतेच म्हणून खोट बोलावे लागते. मी हे करीन ते करीन या स्वप्नातच आयुष्य संपते, पण मी हे करतोच असा निश्चय घेत नाहीत. ६) आहार व...

लायकी दाखवण्याचे दिवस

Image
🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹   लायकी दाखवण्याचे दिवस बुधवार, 29 एप्रिल 2020 गवार वीस रुपये...  कलिंगडं शंभरला तीन! सूर्यही नीट उगवला नव्हता. रस्त्यावरून असा खणखणीत आवाज आला आणि डोळे चोळत उठलो. गॅलरीतून खाली पाहिलं. सोसायटीच्या खालीच तेरा चौदा वर्षाचा पोरगा येऊन थांबला होता. कपाळाचा घाम पुसत उभा. सोसायटीचा वॉचमन त्याला लांब थांबायला सांगत होता. तसा तो पोऱ्या वॉचमनला हात जोडत थांबू देण्याची विनंती करत होता. मी आवाज दिला आणि त्या पोऱ्याला थांबायला सांगितलं. पोऱ्यानं मान डुलवली. तोंडाला रुमाल बांधून खाली गेलो. दोन चार बाया आणि काही पुरुषही त्याच्याभोवती येऊन थांबले होते. सोशल डिस्टन्सिंग पाळत आम्ही सगळे गवार, कलिंगड घेऊ लागलो. इतक्‍यात तो पोऱ्या एकाला म्हणाला,     ‘दादा, तांब्याभर पाणी मिळंल का?’ दादानं तोंड वाकडं करत, ‘समोरच्या चौकात पाण्याची टाकीये. तिथं पे.’ असा सल्ला दिला. ‘एवढ्या सकाळी तहान कशी लागतीरे तुला?’ दुसऱ्या दादानं असं विचारत स्मित केलं. तसा तो पोऱ्या म्हणाला, ‘पहाटं पाचला निघलोय साहेब घरातून. सात किलोमीटर चालत आलोय. पाण्याची बाटली होती. पण, तिबी संपली. म्हणून म्हणाल...