आम्ही तुमच्या नियमाचे पालन करु पण आम्हाला गावात घ्या


- मनोजकुमार मस्के - शिराळा

सध्या कोरोना विषाणूचा संसर्ग झाल्यामुळे सर्व मानवाचे जीवन विस्कळीत झाले आहे. आज माणसाला प्रत्येक माणूस रोगी असल्याचा भास होत आहे. पोटचं पोरगं जरी मुंबईवरुन आलं असेल.  तर आई त्याला दारातच उभी करते आहे. एवढंच काय तर जनावरांच्या गोट्यात सुद्धा त्याला जागा दिली जात नाही. का ? तर म्हणे त्याच्यामुळे जनावरांना हा रोग होईल. माणसाजवळच्या माणुसकीची खरी ओळख या कोरोनाच्या काळात प्रत्येक मुंबईकर अनुभवत आहे. 
     याचाच प्रत्यय अनेक गावात येत आहे. प्रत्येक निवडणुकीच्या काळात स्व:ता चे पैसे देऊन मतदानासाठी गावाला आणनारे गाव पुढारी. आज मात्र मुंबईकर गावात येऊ नये म्हणुन प्रयत्न करत आहेत. परवा शाहुवाडी तालुक्यातील ९३ मुंबईकरांना शाहुवाडी तालुक्याच्या हद्दीवरून परत मुंबईला जावं लागले. कोणतेही लोकप्रतीनिधी उपयोगी पडले नाही की या लोकांनी काय खल्ले काय नाही याची देखील विचारपुस केली नाही. कोकरूड पोलीस ठाण्याचे फोजदार दत्तात्रय कदम  व कर्मचारी यांनी त्या लोकांना जेऊ घातले. व त्यांनंतर त्यांना परत मुंबईस जावे लागले.
   त्याच बरोबर निगडी गावातील दोन मुलांसह एक महिला पास घेऊन रितसर परमीशन घेऊन मुबई ठाणे येथुन शिराळा चेकनाक्यावर आले असता. त्यांना मागे घालवन्याचे आदेश तहसिलदार यांना  नाविलाजाखातर द्यावे लागले . कुठे जाणार ते जोडपे ते गायावया करत होते. आमच्याकडे पैसे नाहीत आम्हाला कुठेही काॅरंटाईन करा. आम्ही तिथे राहण्यास तयार आहे. शेवटी त्यांना नातेवाईक यांच्या मदतीने इस्लामपूर पेठ येथे कोरेंटाईन कक्षात दाखल करण्यात आले.
      खरं तर असंच पाहीजे मुंबईकरांना येणेजाणे मिळतय आणी खायलापियाला भेटते म्हणुन मतदानाला येणार्या लाचार मुंबईकरांना संकाटाच्या काळात केलेलं मतदान नाही उयोगी पडलं . घरच्यांना सुद्धा नको वाटू लागला मुंबईवाला , गाववाल्याना डोकेदुखी झाला  मुंबईवाला. केलेल्या चुकांची परतफेड व्याजासकट येते हे आता कळुन चुकले. आम्ही मुंबईकर  आता या पुढं अशी चुक करणार नाही असं धायमोकलुन रडतरडत तो सांगत होता. शेतात खोपटात राहतो म्हटलं तरी येऊ दिलं नाही, तर शिव   कुंपून घेतली. लाज वाटते मला माझा गाव म्हणनण्याची आज हा गाव पोरखां झाला आम्हा मुंबईवाल्यांसाठी. मुंबईहुन गावी आलो की चुलतेमालते, मित्रमंडळी, सगेसोयरे सगळे गोळा होत होते. आज त्या प्रत्येकाला आमची भिती वाटुन राहीली, प्रत्येकाला वाटतंय आम्हाला कोरेना झाला. काय चुक आमची ऐवढी मोठी सजा देव आम्हा मुंबईकरांना देतोय. ज्याप्रकारे भिती गववाल्यांना आहे त्याप्रकारे ती मुंबईवाल्यांना सुद्धा आहे. आम्हाला परस्थितीची जाणीव आहे. पण आम्हाला कुत्र्यासमान वागणुक देऊ नका. घराच्या वळचणीला जागा द्या, आम्ही तुम्ही ठरवलेल्या नियमाचं पालन करू पण आमचं गाव बंद करु नका. यदा कदाचीत हे दिवस जातील पण मिळालेली वागणूक कशी खोडता येईल. आम्ही मुंबईला राहतो ते जगण्यासाठी नाही तर गावाकडल्यांना जगवण्यासाठी. आज प्रत्येक मुंबईवाला संकटात आहे.  त्याला गरज आहे तुमची करा मदतीचा हात त्याला. आणी पळवून लावा कोरोना संकटाला. 

Comments

  1. Yes. It is not the way to treat for Mumbai people's. What is written in this article, it is 100% right. And I agree with this. So i request to all people's that, accept to our brother's, sisters, what ever relationship. Allow them to stay in their home.

    ReplyDelete

Post a Comment

Popular posts from this blog

*अनाथ मुलांचे स्वीकारले स्वामी धामने पालकत्व*

संजय गणपती पाटील उर्फ संजू दादा भावपूर्ण श्रद्धांजली

*रात्री माझं गाव विकताना पाहिलं*