तेव्हा मात्र पायाखालची जमीनच सरकली...





काहीतरी म्हणजे काय लिहायचे...? माझ्या आयुष्यातील कोरोना....  यावर  काहीतरी  लिहिते... हा   कोरोना  जेव्हा  भारतात आला  तेव्हाच  कळले  कोरोना काय आहे तो किती  भयंकर आहे ..  पण तो इतक्या लवकर  माझ्या  आयुष्यात येईल असं जरा पण वाटले  नाही... लॉकडाऊन पर्यन्त  वाटत होते मी स्वतःची  खुप  काळजी घेते .. त्यामुळे  तो माझ्या जवळ येणारच नाही... पण तो माझ्या  ऑफिस प्रयन्त कधी येऊन पोचला ते कळलेच नाही... त्यानंतर ऑफिस मध्ये  खुप भीतीचे वातावरण निर्माण झाले...  पूर्ण  महाराष्ट्र लॉकडाऊन झाले...पण  अत्यावश्यक सेवेत असल्यामुळे मला ऑफिस ला जावेच लागत होते.. न जाऊन चालणार   न्हवते...  पण जेव्हा  ऑफिस मधील एका  व्यक्तीला कोरोना झाला आणि त्यांची डेथ झाली...  तेव्हा  मात्र पायाखालची जमीनच सरकली...  त्यानंतर  मला  कोरोनाची  लक्षणे  सारखी भासू  लागली... कारण  माझी  एक वर्षाची मुलगी  विरा तीची काळजी असल्यामुळे  असं वाटतं असेल..  अशी समजूत मी स्वतःची काढत होते.. पण त्यानंतर  2 दिवस मी खूपच टेन्शन मध्ये राहिले होते .. त्यामुळे खूपच  अस्वस्थ वाटायला  लागले होते.  म्हणून  मनाची समजूत म्हणून  मी शेवटी test  करून घ्यायाचीच,  हा विचार पक्का केला  आणि  टेस्ट  करून आले...  पण दुसऱ्याच  दिवशी हा कोरोना घरा  भाहेर येऊन उभा राहील अस वाटत न्हवते,  पण तो घरा  बाहेर  येऊन उभा राहिलाच,, आणि  तितक्यात  मोबाईल  वर  त्याची  रिंग  वाजली भीत भीत  कॉल घेतला खरा..  आणि समोरून एक व्यक्तीचा आवाज आला.  मी वरळी कन्ट्रोल मधून  बोलतोय  मिस उर्मिला तुम्ही 2.5.20 la म्हणजे  काल  केलेल्या कोरोना  टेस्टचा  रिपोर्ट   ditect आला आहे आणि तुम्ही संवंशयित आहात म्हणून तुम्हाला आयसोलेट व्हावे लागेल.. 1 तासात  ऍम्ब्युलन्स  घ्यायला  येईल  तेव्हा तुम्ही  तयार राहा...  अस ऐकताच मोबाईल खाली   पडला  तशी  मी ही खाली कोसळले ...  असं सांघून कॉल कट झाला होता ...मन घट्ट करून रडू थांबवत आईला  समजून सांगितले तस तिने समजून घेतले खरं,  पण  विरा ला  सोडून जावे  लागणार  होते. ती कशी  राहते  त्याचे खुप टेन्शन होतेच पण घरी ती रहाणार नाही, ती आईला  खुप  दमवणार  हे ही माहित होते,   आणि  त्यावर काहीच उपाय करू शकत न्हवतो, त्यामुळे  दोघी खुप रडलो... आणि घरातून जे गरजेचे साहित्य लागणार होते , ते घेतले आणि  आईला  नमस्कार केला.पण विरा ला जवळ  न घेता, पाणीभरलेल्या  डोळयांनी बॅग  घेऊन  बाहेर  निघाले  तेवढ्यात विरा ने मला bye bye  केले आणि तिच्याच हाताचा  पा घेत तिने मला  टाटा केले... अचानक माझी 1वर्षाची  विरा इतकी   समंजस कशी झाली  याचे  खुप नवल  वाटले होते ..  पण काय करणार डोळे पुसत पुसत  मी  आसोलेट व्हायला nsci ला निघून  आले ...  तसें  आईची आवस्था तर खूपच बिकट होऊन गेली होती..  काय करावे  काय सुचतच  न्हवते  बाकी सर्व  गावी गेले  असल्यामुळे त्यांना लॉकडाऊन  मध्ये बोलून पण घेऊ शकत  न्हवते...  इकडे आई  आणि विरा  या अशा होत्या  कि त्याच्या वयाला कोरोनाचे संक्रमण लवकर  होणारे होते..  त्यामुळे तर  मला  त्यांना  सोडून जावेच लागणार होते... त्याप्रमाणे  मी nsci स्पोर्ट्स क्लब ला आले ...  पण तिथून  सर्वात वाईट  काळ समोर येऊन उभा राहिला ...  आई वीराला कशी सांभाळते यां विचाराने मी भांबावूनच  गेले होते, पण यामुळे आई आणि  विरा या  प्रसंगाला कशा सामोऱ्या जातात यानेच मी खचून गेले होते, पण मी स्वतःला सावरले, आणि  मी परत  कन्ट्रोल ला कॉल  करून आणि वरिष्ठ अधिकारी मुळे साहेब यांना  कॉल केला सर्व परस्थिती सांगितली आणि विराला  आणि आईला घरातून बाहेर  हॉस्टेलवर  ठेवण्या साठी आग्रह केला त्या प्रमाणे  त्यांनाही मग  हॉस्टेल  वर ठेवले  ...त्यातच आजून भर पडली  कि  त्यातच आईचा  फोन बंद पडला ... कॉल सुद्धा  करू शकत  न्हवते  विरा  आणि  आई बद्दल  विचारायचे तरी कोणाला...   मेल्याहून मेल्या सारखे वाटत होते...  कसा संवाद करायचा...  काहीच  समजत न्हवते... तिला  मी एकदा  माझा मोबाईल नंबर  लिहून दिला  होता..  आई ही देवाची  दुसरी शक्ती असते  हे काय  सांगायला  नको... त्याप्रमाणे  तिला ते आठवले  आणि तिच्या  शेजारच्या  रूम मध्ये  एका मुलाच्या  मोबाईल वरून दुसऱ्या दिवशी  बोलणं झाले...  तसा  जीवात जीव आला... विरा खुप रडायची तिला  माझी आठवण  वारंवार येत असायची  तशी ती रडायची तस आई पण रडायची मला पण इकडे ती जाणीव व्हायची  मग माझ्या पण डोळ्यातून पाणी पडायला सुरुवात व्हायची... असा प्रसंग कोणाच्याही  आयुष्यात  घडू नये...एकाच वेळी   घरचे इतर सर्व ,  नातेवाईक, मित्र मैत्रीणी, कोणीच असू नये...  असा दिवस आला होता  कि साधा  कॉल पण कोणाला  लागू नये.. !! यातच कोरोना अर्धा  विजयी झाला होता अस वाटायला लागले होते ... खुप एकटी पडल्याची भावना  सतावत होती  त्यातच त्रास पण जरा होऊ लागला होता ..  काय डोळ्यातून पाणी येणे हे नियमित झाले ...  जसं जसं  दिवस  वाढत गेले तशी खचत जात होते ..  पण आईच्या बाजूच्या रूम मध्ये  जेवण कुटूंब राहत होते  ते   पण 6 दिवसानंतर घरी  निघून गेले  फक्त  बोलण व्हायचे ते पण बंद झाले...  परत  वनवास चालू झाल्याचे  वाटायला लागले...  मी इथे  तर आई आणि विरा  हॉस्टेल वर  कोणाचा  कोणाशीच संपर्क  नाही...  वेड लागल्या सारखी  एकटीच  बडबड करू लागले होते  वीराच्या  आठवणीत  अखंड बुडाले होते..  लहान 1 वर्षाची माझी विरा..  तिची यात काय चूक होती...अवघे काहीच दिवस झाले होते कि ती चालायला  बोलायचा  प्रयन्त करारायला  सुरुवात  केली होती. त्यातच  मी अशी तिला  सोडून  इथे  आसोलेट आहे. यां आठवणीत असल्यामुळे  कधी  हसु येत  नाही का नीट  झोप येत नाही.... आणि आजून ही तसेच चालू आहे..  जेवण  पाणी घ्यायची इच्छा पण होत नाही  पण... डॉक्टर  सारखे  बोलतात   टेन्शन घेऊ नका  लवकर  बरे होणार  नाहीत ... म्हणून  मग कसे बसे जेवण करते..  पण काय करू लहान बाळाची आठवण  खुप सतावत आहे...   कधी तिला  बघणार जवळ घेणार या भावनेने  मी वाडीपिशी होऊन गेले आहे ..  त्यात आईची पण तब्बेत  बरी  नाही ... आणि विराचे सर्व एकटीला करावे लागत आहे .. आणि  विराला माझी आठवण झाली कि ती आईला  खुप त्रास देत आहे ... तरी आई मला जास्त काय  सांगत नाही पण ती विरा ला  कशी सांभाळत असेल या विचाराने मी सुन्न होऊन जाते कधी कधी ...  8 दिवस झाले  बाजूला  कोण नवीन  लोक राहायला  आले आहेत .आई  त्यांच्या मोबाईल वरून  कॉल करते.. आणि मला खुप समजावून सांगते,  आधार देत  खंबीर राहायला  भाग पडले...  आज माझा 25 वा दिवस  आहे मी इथे nsci sports club la isolate आहे...  पण मी  लवकर  बरी होणार आहे  आणि घरी जाणार आहे.... अस वाटते पण  हे सर्व  होत असताना माझ्या  आईने  मला  जो  आधार दिला आहे...त्यामुळे माझ्या आईची माझ्या आयुष्यातली जागा ही अजूनच खुप खुप  species झाली आहे... त्यामुळे याच  जन्मी काय पुढे  100 जन्मी  हीच्याच पोटी मी जन्म घेउदे असे वाटते...हीच ईश्वर चरणी एक प्रार्थना आहे..  माझ्या आईला उदंड आरोग्य दाई आयुष्य लाभुदे... देवा...  कारण  माझी आई माझ्या साठी सर्व काही आहे...  मी या कोरोना ला हरवनार आहे... आणि माझ्या आईकडे आणि  मुलीकडे लवकर बरी होऊन जाणार  आहे... 

          धन्यवाद..
उर्मिला खांडेकर पाटील

Comments

Popular posts from this blog

*अनाथ मुलांचे स्वीकारले स्वामी धामने पालकत्व*

संजय गणपती पाटील उर्फ संजू दादा भावपूर्ण श्रद्धांजली

*रात्री माझं गाव विकताना पाहिलं*