*शाहूवाडी तालुक्यातील... येथे सापडले गुप्तधन*

*शाहूवाडी तालुक्यातील अनुस्कुरा येथे सापडले गुप्तधन*---भेडसगाव/मारुती फाळके
कोल्हापूर जिल्ह्याची सरहद्द. व शाहूवाडी तालुक्यातील शेवटचे.गाव अणूस्कूरा. पाचशे.पेक्षा. ही कमी लोकसंख्या
असलेल्या एका छोट्याशा गावाला शिवकाळात . खूप महत्व होते. या गावातील विनायक पाटील याच्या शेताचे सपाटीकरण
करत असताना पूरातन. खजिना
मांतीच्या भांड्यात सापडला.
मांतीच्या भांड्यात ७१६ जुनी नाणी सापडली.
. अणूस्कूरा गावातील पाटील. 
कुटूंबियानी वेगळा आदर्श निर्माण
करून कोणताही मोह.न. बाळगता प्रशासनाला माहीती कळविली. पुरातन खजिना प्रांत अधिकारी श्री बी.आर. माळी
शाहूवाडीचे तहसिलदार श्री गुरु
बिरासदार व कृषी अधिकारी यांच्याकडे सुर्पूद केला
अणूस्कूरा या गावाला पूर्वी चौकेवाडी ह्या नावाने ओळखले जात. रत्नागिरी जिल्हयातील
राजापूर सीमेलगत कोल्हापूर
जिल्ह्याच्या धाटमाथावर वसलेले आहे.कोल्हापूर, रत्नागिरी व 
सिंधूदूर्ग या तीन जिल्हयांना एका
माळेत गुंफण्याची अवघड किमया या घाटाने केली आहे.
त्यामूळे कोल्हापूर वासियांना
कोकणाशी व्यापार उद्दीमसह
दळणवळण व सामाजिक
सांस्कृतिच्या दृष्टीने अणूस्करा घाट विकासाचा मानदंड म्हणून
दिमाखाने मिरवत आहे.
.. नविन घाटाच्या आधीच्या 
आड मार्गावरील चौकेवाडी
पायवाटेचा घाट मार्ग व
घाटमाथ्यावरील अतिप्राचीन
असणारे उगवाई देवी मंदीर
व मंदीरा शेजारील एका प्रचंड
मोठया. शिळे वरिल शिलालेख
घाटमाथ्यावरती चौकेवाडी या ठिकाणी छ. शाहूराजे यांच्या
कारकिर्दीत कोल्हापूर व रत्नागिरी
जिल्हयांच्या सीमेवर पोलीस चौकी असल्याने या ठिकाणास
चौकेवाडी हे नाव पडले. असल्याचे येथील जूने जानकार
लोक सांगतात. या घाटमाथ्यावरती | ब्रिटीशकालीन
दगड़ा च्या आखलेल्या सीमा आहेत.
.. घाटमाथ्याच्या पठारावर अतिप्राचीन. उगवाई देवीचे
मंदीर आहे मंदीराच्या जवळून
कोकणातीत दृश्य मनमोहक 
दिसते. मंदीराच्या वायव्य बाजूकडून कोकणात उतरण्यासाठीची. पायवाट आहे मंदीराच्या काही अंतरावरती पाण्याचा कुंड आहे . तिनही
ऋतूत थंडगार पाणी वाहात असते. मंदीराच्या समोरील . 
शिळे वरिल शिलालेख अद्याप कोणालाही समजलेला . नाही
मोडीतज्ञासाठी व. इतिहास.
संशोधकासाठी अहवान आहे.
असे ग्रामस्थ सांगतात
. शाहूवाडी तालुक्यातील . 
मलकापूर, पावनखिंड विशाळगड अणू स्कूरा.. पैकी चौकेवाडी येथील. उगवाई देवीच्या मंदीरा
समोरील शिलालेख .पन्हाळगड ते विशाळगड हा शिवकालीन मार्गावरील गावे .वाड्या वस्त्या
सध्या अणू स्कूरा परिसरात
सापडलेले प्राचीन नाणी हे इतिहासाचा उलगडा होण्यासाठी इतिहास संशोधकाना शाहूवाडी तालुका . अनेक ऐतिहासिक साधनाने संपन्न आहे
[ अणू स्कूरा येथील पाटील परिवाराने शेतात सापडलेले
गुप्तधन प्रशासनाच्या ताब्यात
देऊन एक आदर्श निर्माण.केला
आहे. त्यामूळे इतिहास संशोधन
करणाऱ्या इतिहासकारासाठी .
एक अनमोल . ठेवा प्राप्त करून
दिलेला आहे. त्यामूळे त्याचे प्रत्येक स्तरातून अभिनंदन होत आहे )*शाहूवाडी तालुक्यातील मौजे अणुस्कुरा येथे सापडली 716 नाणी*
 
  शाहूवाडी तालुक्यातील मौजे अणुस्कुरा येथे जेसीबीच्या सहायाने शेत जमिनीचे सपाटीकरण करीत असताना 716 नाण्यांचे गुप्तधन सापडले. उपकोषागार अधिकाऱ्यांकडे सुरक्षा कक्षामध्ये ही नाणी ठेवली असून पुरातत्व विभागाच्या सहायक संचालकांशी याबाबत पत्र व्यवहार केला आहे, अशी माहिती शाहूवाडीचे तहसिलदार गुरु बिराजदार यांनी दिली.
   जमीन मालक विनायक बापुसो पाटील हे गट क्र. 186 आपल्या शेत जमिनीमध्ये 25 मे पासून विकास पाटील, उत्तम पाटील यांच्या समवेत जेसीबीच्या माध्यमातून जमिनीचे सपाटीकरण करत होते. यावेळी जमिनीत असणारे मडके फुटून आतमधील असणारी नाणी सापडली. ही नाणी श्री. पाटील यांनी शेतामधील घरात असणाऱ्या लोखंडी कपाटात नायलॉन पोत्यामध्ये आणि टीशर्टमध्ये मातीच्या मडक्याचे तुटलेले तुकडे ठेवले होते. याबाबत श्री. पाटील यांनी काल सायंकाळी ८ वाजण्याच्या सुमारास जिल्हाधिकारी दौलत देसाई यांची कार्यालयात समक्ष भेट घेवून त्यांना सापडलेल्या गुप्तधनाबाबत माहिती दिली. 
 त्यानंतर जिल्हाधिकाऱ्यांनी तात्काळ दिलेल्या आदेशानुसार काल रात्री उपविभागीय अधिकारी, तहसिलदार, पोलीस निरीक्षक, करंजफेणचे मंडळ अधिकारी, अणुस्कुराचे तलाठी, तीन पंच आणि जमीन मालक यांच्या समवेत रात्री ३ वाजेपर्यंत  गुप्तधन सापडलेल्या ठिकाणाची पाहणी करुन पंचनामा केला व नाणी ताब्यात घेतली.
सापडलेले गुप्तधन व मातीचे तुटलेले तुकडे याची मोजमाप करण्यात आली. त्यामध्ये अंदाजे 2 सें.मी. व्यासाची व 2 मि.मी. जाड अशी एकूण 716 नाणी आणि मडक्याचे 19 तुकडे असल्याचे दिसून आले. हे गुप्तधन लोखंडी पेटीमध्ये सिलबंद करण्यात आले आहे. याबाबत अधिक चौकशी करण्यात येत असून, सापडलेले मडके व नाणी यांचे आयुष्यमान व कालावधी कार्बन डेटींगच्या माध्यमातून करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी श्री देसाई यांनी दिले आहेत.
  चौकट१---    *अनुस्कुरा येथील पाटील कुटुंबीयांचा प्रामाणिकपणा* विनायक पाटील यांच्या शेतातील राहत्या घरात असलेल्या कपाटात सदर नाणी ठेवण्यात आली होती   अंदाजे दोन सेंटी मीटर व्यासाची व दोन मिलिमीटर जाडीची 716 नाणी व मातीचे मडक्याचे 19 तुकडे सापडले याबाबत सहाय्यक संचालक पुरातत्त्व विभाग यांच्याकडे पत्रव्यवहार केला असून सदर गुप्तधन हे उपकोषागार कार्यालय शाहुवाडी येथे सुरक्षिततेसाठी ठेवले असल्याची माहितीही तहसीलदार गुरु बिराजदार यांनी दिली

Comments

Popular posts from this blog

*अनाथ मुलांचे स्वीकारले स्वामी धामने पालकत्व*

संजय गणपती पाटील उर्फ संजू दादा भावपूर्ण श्रद्धांजली

*रात्री माझं गाव विकताना पाहिलं*