*मी एक समाजसेवक आहे मी कोणताही राजकिय पुढारी नाही*
भारतीय शैली कुस्ती महासंघाचे उपाध्यक्ष मा. डी. आर. जाधव (आण्णा) यांचा वाढदिवस 2 जून ला प्रत्येक वर्षी केला जातो. महाराष्ट्राच्या लाल मातीला मिळालेला एक अश्रयदाता, आणि ग्रामिण भागातील एक दानशुर आणि दानतदार व्यक्तीमत्व म्हणजेच डी. आर. जाधव (आण्णा). आण्णांना वाढदिवस साजरा करणे हे अजिबात अवडत नाही पण मित्रांना दुखवणं हे त्यांच्या रक्तात नाही. नेहमी दुसर्याला देणारा हा कर्ण स्वत:साठी कधीच कोणाकडे काही मागत नाही. आण्णा नेहमी आपले गेलेले दिवस कुणालाही तसे दिवस येऊ नये म्हणून सतत आपल्या हातून जेवढे दान करता येईल तेवढे दान गरिब होतकरू व मेहनती मुलांना देत असतात. त्यामुळे या माणसाला अनेक चाहत्यांनी आपले दैवत मानले.
आण्णांनी यशाचं शिखर गाठलं पण पाय नेहमी जमिनीवरच ठेवले . आण्णा आपली गरिबी सांगत होते. गावातील लोकांनी चिपट्या कोळव्याने आईला केलेली मदत. आणि लोकांच्या पाहुणेरावर जाऊन स्वत: न खाता आम्हा भावंडांना वडीलांनी घातलेलं जेवन. हे सांगत असताना मात्र आण्णा स्वत:हाला अश्रु डाहळण्यापासून रोकू शकले नाहीत. ओठ थरथरू लागले व आण्णांच्या डोळ्यातून पाणी येऊ लागले.
स्वर्गीय वसंतदादांनी आण्णांना आपल्याबरोबर मुंबईला नेले. आण्णा पोलीसात नोकरीला लागले. नंतर एकनाथ शिंदे यांच्या माध्यमातून पहीले कंत्राटी काम मिळाले. ते गटार साफ करायचे. त्यावेळी अनेक जन चेष्ठा करत होते. पण गरिबीतून आलेल्या आण्णांना आत्मलिंगाच्या कृपेने यश मिळत गेले. आणि आज आण्णा सर्वांचे आवडते झाले. आण्णांनी सांगीतले की मी एक समाजसेवक आहे. मी कोणताही राजकिय पुढारी नाही. सर्व पक्षातील पुढार्यांशी माझी मैत्री आहे. त्यामुळे राजकारण विसरून गावातील सर्वांनी मिळून मिसळून काम केले असता. गावाचा विकास होण्यासाठी वेळ लागणार नाही. आण्णांनी आवर्जून सांगीतले की मी माझ्या आयुष्यात कधीही कुणाला उलट बोललो नाही. आण्णा कधीच कोणाला उलट बोलत नाहीत हे मात्र खरं आहे.
आण्णांनी आजपर्यंत अनेक मित्र बनविले, नाती जपली संघर्षाचं बाळकडू लहानपणीच मिळाल्याने प्रत्येक परिस्थितीची जाण आण्णांना आहे. मी पाहिलेले दिवस कुणाच्याही नशिबी येऊ नये अशी आण्णांची भावना आहे. अगदी कर्णाप्रमाणे आपल्याकडे आहे ते दुसर्याला देणे यातच ते आपले भाग्य समजतात.
आज आण्णा भारतीय कुस्ती महासंघाचे उपाध्यक्ष आहेत. आण्णांचे कार्य फार मोठे आहे. उपाध्यक्षपदाची एवढीमोठी धुरा आण्णा लिलया पेलत आहेत. गरीबीमुळे कुस्ती खेळता आली नाही. पण आण्णांच्या दानशुरपणामुळे महाराष्ट्रात कुस्तीला दिवस चांगले आलेत. आण्णांनी अनेकांना सर्व प्रकारची मदत केली आहे. अनेक पैलवानांचा खुराकाचा खर्च आण्णा स्वत: करतात. भागातील प्रत्येक मैदानात आण्णा खास मुंबई वरून अवर्जून उपस्थित असतात. अनेक गावांना आण्णांनी कुस्ती अखाडे बांधून दिले. अनेकांना घर बांधन्यासाठी मदत, लग्नासाठी मदत अशा अनेक प्रकारच्या मदती आण्णांनी लोकांच्यासाठी केल्या . त्याच बरोबर कुस्ती टिकावी म्हणून सतत प्रयत्न केले.
आण्णा काही राजकारणी नाहीत पण राजकारण्यांना लाजवेल एवढं मोठ काम त्यांच आहे. समाजात पैेसे कमवणारी माणसं, माणूसपण विसरतात हे आम्ही पाहिले आहे. पण आण्णांच्या बाबतीत पैसा आणि सत्ता ही आवळाच्या पाणावरल्या पाण्याच्या थेंबासारखी आहे. ते कधीही जाऊ शकते. पण कमवलेली माणसं शेवटच्या क्षणापर्यंत आपल्या बरोबर राहू शकतात असं आण्णांचं ठाम मत आहे. आज चारही भावंडे एकत्र मिळून मिसळून राहतात.
आज ग्रामिण भागातील अनेक लोकं आण्णांच्याकडे मदतीच्या अशेने जातात. आण्णा त्यांच्या परीने जी मदत करता येईल तेवढी मदत करतात. लोकांच्या मदतीला धाऊन जाणार्या आपल्या मुलाला पाहणारी. आण्णांची आई परमेश्वराला सांगते. कर्णासारखा दानशुर पुत्र माझ्या पोटी जन्माला घातलास देवा. असाच पुत्र प्रत्येक आईच्या पोटी जन्माला यावा.
मनोजकुमार मस्के
९८९०२९१०६५
Comments
Post a Comment