शिराळा कोकरूड रोडवर दिले मगरीने दर्शन
शिराळा : - सध्या कोरोनाच्या भितीने अनेक लोक त्रस्त असतानाच शिराळा तालुक्यातील बिळाशी या गावाच्या शेजारील शिराळा कोकरूड रोडवरून चक्क मगर रस्ता पार करत असताना बिळाशी गावचे नागरीक शकील मुलानी यांनी पाहीले. त्यांच्या गाडीच्या प्रकाशात ही मगर रस्ता पार करुन नदीच्या दिशेने जाताना शकील मुलानी यांनी आपल्या मोबाईल मध्ये कैद केले. हीच मगर मागील आठ दिवसापुर्वी मांगरुळ येथील वारणा डावा कालवा बोगद्याच्या तोंडशी अनेक नागरीकांना दिसली होती. त्या दिवशी पासुन बोगद्याच्या तोंडाशी कोणीही जात नाहीत. या कालव्यात चांदोली धरणातील पाणी शेतीसाठी सोडण्यात येते. त्यामुळे या पाण्याच्या प्रवाहासोबत ही मगर खली आली आसावी असा वनखात्याचे म्हणने आहे. मागील आठदिवसा पुर्वी मांगरूळ बोगद्या शेजारी पाहण्यात आलेली व बिळाशी येथील रस्त्यावरून गेलेली मगर ही एकच आहे असे वनखात्याचे प्रकाश पाटील यांनी सांगितले.
या संदर्भात वनखात्याशी माहीती घेतली असता ही मगर भानुदास पाटील यांच्या विहरीत असल्याने ती पाण्यात पकडणे शक्य नसल्याचे वनसंरक्षक प्रकाश पाटील यांनी सांगीतले. दिनांक १४/०५/२०२० रोजी घडलेल्या घटनेचा आडावा घेण्यासाठी वनरक्षक प्रकाश पाटील यांच्या व्यतीरीक्त कोणतेही अधिकारी आलेले नाहीत. त्याच बरोबर मगर अजुन पकडली नसल्याने व सध्या पेरणीचे दिवस असल्याने परिसरातील शेतकरी वर्गात प्रचंड भितीचे वातावरण आहे.
Comments
Post a Comment