पै. संदीपभाऊ पाटील यांना वाढदिवसाच्या मनःपूर्वक हार्दिक शुभेच्छा


🎉💐 शिराळा तालुक्याचे भूषण, कुस्ती क्षेत्रातील ऋषितुल्य व्यक्तिमत्त्व, आमचे ज्येष्ठ मार्गदर्शक मा. पै. संदीपभाऊ पाटील यांना वाढदिवसाच्या मनःपूर्वक हार्दिक शुभेच्छा! 💐🎉
शिराळा तालुक्यातील कणदुर या मातीत जन्म घेऊन महाराष्ट्राच्या कुस्ती विश्वात आपल्या कर्तृत्वाचा अढळ ठसा उमटवणारे, साधेपणा, प्रामाणिकपणा आणि निष्ठेचा आदर्श असलेले ज्येष्ठ वस्ताद मा. पै. संदीपभाऊ पाटील यांना वाढदिवसानिमित्त कोटी कोटी शुभेच्छा!
एकेकाळी पद्मभूषण वसंतदादा पाटील कुस्ती केंद्राचे तुफानी मल्ल, अनेक राज्य व राष्ट्रीय स्पर्धांमध्ये पदकांची कमाई करणारे विजेते, ऑल इंडिया चॅम्पियन, डबल महाराष्ट्र (मुंबई) कामगार केसरी किताबाचे मानकरी, तसेच मानाचा वसंतदादा क्रीडा पुरस्कार आणि राज्य शासनाचा दादोजी कोंडदेव पुरस्कार प्राप्त करून महाराष्ट्राच्या कुस्ती परंपरेचा गौरव वाढवणारे हे व्यक्तिमत्त्व आजही असंख्य मल्लांसाठी प्रेरणास्थान आहे.
गुरुवर्य दिनकररावजी सूर्यवंशी सरांचे आज्ञाधारक शिष्य आणि त्यांच्या विचारांचा खरा वारसा जपणारे संदीपभाऊ यांनी अनेक वर्षे सांगली जिल्ह्याचे महाराष्ट्र कुस्ती अधिवेशनात प्रभावी नेतृत्व केले. त्यांच्या अभ्यासपूर्ण मार्गदर्शनामुळे असंख्य खेळाडूंना राज्य, राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर यश मिळाले.
सहकारमहर्षी, हरितक्रांतीचे प्रणेते, कुस्तीमहर्षी स्व. तात्यासाहेब कोरे कुस्ती केंद्र (वारणा तालीम) यांचे मार्गदर्शक वस्ताद म्हणून त्यांनी कुस्ती संस्कृती जपण्याचे मोठे कार्य केले आहे. आंतरराष्ट्रीय कुस्तीचा सखोल अभ्यास, खेळातील बारकावे, शिस्त, तांत्रिक ज्ञान आणि खेळाडूंवरील अपार प्रेम यामुळे ते महाराष्ट्राच्या कुस्ती क्षेत्रातील एक ऋषितुल्य, अजातशत्रू आणि आदरणीय व्यक्तिमत्त्व म्हणून ओळखले जातात.
साधी राहणी, उच्च विचार, नम्र स्वभाव आणि प्रत्येकाला आपलेसे करणारे व्यक्तिमत्त्व हीच त्यांची खरी ओळख आहे. त्यांनी घडवलेले असंख्य मल्ल आज त्यांच्या संस्कारांचे जिवंत उदाहरण आहेत.
💐 ईश्वरचरणी प्रार्थना की, आपणास निरोगी, दीर्घायुष्य लाभो, उत्तम आरोग्य, अखंड ऊर्जा आणि अशीच कुस्ती सेवेची प्रेरणा सदैव मिळत राहो. आपल्या मार्गदर्शनाचा प्रकाश पुढील अनेक पिढ्यांना लाभत राहो.
🎂🎊 वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा वस्ताद!
आपल्या कार्याला आमचा मनापासून सलाम! 🙏🌹

Comments

Popular posts from this blog

उरीतील स्फोटात शाहुवाडीचा सुपुत्र शहीद; गोंडोली गावावर शोककळा

शिरशी गावच्या लोकनियुक्त पहिल्या सरपंच – सौ. स्मिताताई बापूराव भोसले

*शिराळा उत्तरच्या मातीत दोन दिवसांपूर्वी जे घडलं, ते फक्त निवडणूक नव्हतं*… *तो विश्वासाचा, नात्याचा आणि घराण्याच्या संस्कारांचा विजय होता*.