*गावक-यांचा स्नेहमेळावा......चिंचेश्वर यात्रा*
*गावक-यांचा स्नेहमेळावा......चिंचेश्वर यात्रा* ✍️ *शब्दांकन :श्री. सुवर्णसिंग मस्के सर* *खरंतर यावर्षीची चिंचेश्वरची यात्रा वेगवेगळे रुप घेऊन भरतेय...यात्रा म्हटलं की प्रत्येक घरात प्रत्येक कुटुंबात लहानापासून वृद्धांपर्यंत उत्सुकता लागलेला प्रत्येकालाच आनंदी ठेवणारा सार्वजनिक सर्वात मोठा सण उत्सव*..... *दरवर्षी गुढीपाडव्यानंतर 12व्या दिवशी येणा-या या चिंतामणीच्या यात्रेची* *आपण सर्वजण उत्सुकतेने वाट पाहात असतो. नविन वर्षाचे कॅलेंडर जेंव्हा जेंव्हा* *प्रत्येकाच्या हाती येईल तेंव्हा आपण प्रथम काय शोधून काढतो तर ? आपली यात्रा* 😆 *बरोबर ना?* *आपण गावकरी खुपच भाग्यवान आहोत. आपली यात्रा गावच्या लोकसंख्येच्या मानाने पश्चिम भागात सर्वांत मोठी यात्रा म्हणून प्रसिद्ध आहे*. *घरादाराची स्वच्छता परिसराची स्वच्छता देवालय परिसराची स्वच्छता या गोष्टी करता करता गुढीपाडव्यानंतर एक एक दिवस प...