*सर्वसामान्य जनतेचा आपला माणूस भगवान मस्के* (बापू)
शब्दांकन :- मनोजकुमार मस्के- मांगरूळ
तोंडात खडीसाखर आणि डोक्यावर बर्फ ठेवून नेहमीच लोकांच्या हाकेला, लोकांच्या गरजेला, आणि लोकांच्या कामासाठी धावणारा एक सामान्य माणूस ते एक उद्योगपती पर्यंत ज्यानी गरुड भरारी घेतली ते मांगरूळ गावचे मोरेवाडी येथील भगवान मस्के (बापू)
नुकत्याच झालेल्या ग्रामपंचायत निवडणुकीत भगवान मस्के (बापू) सर्वात जास्त मताधिक्याने निवडून आलेत. सुरुवातीपासूनच शिवाजीराव नाईक यांचे ते कट्टर समर्थक म्हणून तालुक्यात भगवान मस्के बापूंची ओळख आहे. शिवाजीराव नाईक यांनी राष्ट्रवादीत प्रवेश केल्यानंतर संपूर्ण गट राष्ट्रवादीत विलीन करण्यात आला. आमदार मानसिंगराव नाईक (भाऊ ) व नाईक साहेबांच्या विचाराशी एकमत होऊन भगवान मस्के बापू यांच्यासारखे असंख्य कार्यकर्ते राष्ट्रवादीत सामील झाले व अनेक गावात राष्ट्रवादीची एक मोठी ताकद तयार झाली.
भगवान बापू हे मांगरूळचीच असणारी मोरेवाडी मध्ये राहतात. मोरेवाडी तशी जवळपास 40 -50 घरांची लोकवस्ती . या वाडीत बापुंनी प्रत्येक घराच्या चौकटीपर्यंत रस्ता केला. या लोकांच्यासाठी स्वतंत्र शासकीय मिळणारे रेशन व्यवस्था चालू केली, अनेक विधवा महिलांना पेन्शन चालू केली, वाडीतील शेतकऱ्यांची अडचण समजून दुध संस्था उभी केली. मांगरूळ ते मोरेवाडी असणारा 1.5 किमी अंतराचा रस्ता आमदार शिवाजीराव नाईक यांच्या माध्यमातून बनविला. या छोट्याशा असणाऱ्या वाडीत शाळा बांधली, अंगणवाडी उभा केली. बघताबघता मोरेवाडीचा चेहरामोहराच बदलला.
भगवान मस्के यांनी केलेल्या कामाची परतफेड म्हणून लोकांनी त्यांना ग्रामपंचायत सदस्यपदी सगळ्यात जास्त मतांनी निवडून दिले. आणि बापू ग्रामपंचायत सदस्य झाले. पुर्वी बापू एकाच हाताने विकास कामे करत होते, आता तर बापूंचे दोन्ही हात मजबुत झाले आहेत, एकीकडे माजी आमदार शिवाजीराव नाईक तर दुसरीकडे प्रचंड ताकदीचे आणि विकासकामांचे महामेरू असणारे मानसिंगराव नाईक भाऊ त्यामुळे मांगरूळ गावातही इतर गावांच्या तुलनेत नव्हे तर त्याही पेक्षा अधिक प्रगती दिसेल असा ठाम विश्वास बापुंनी बोलून दाखवला.
माझ्या गावातील लोकांनी, वाडीवस्तीवरील लोकांनी माझ्यावर जो विश्वास ठेऊन मला निवडून दिले त्या लोकांना मी माझ्या कामातुन त्यांचे आभार मानणार एवढाच विश्वास देतो. व पुढील पाच वर्षांत शिवाजीराव नाईक यांच्या आशिर्वादाने व मानसिंगराव नाईक भाऊ यांच्या नेतृत्वाखाली संग्रामसिंह पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली मिळून मिसळून गावचा विकास करणार असल्याचे भगवान मस्के यांनी बोलून दाखविले.
चौकट
1995 पासून मी राजकारणात आहे. त्यापासून ते आज पर्यंत मी कोणत्याही ग्रामपंचायतचा सदस्य नाही. अथवा कोणतीही निवडणूक लढवली नव्हती. तरीसुद्धा मी मोरेवाडी व मोरेवाडी कडे जाणारा रस्ता आमदारांच्या मागे लागून करून घेतला. शिवाय इतरही कामे माझ्या वाडीवस्तीवर मी करून घेतली. आता तर मी ग्रामपंचायत सदस्य आहे. येणाऱ्या काळात अनेक विकासकामे मी माझ्या गावासाठी आणि माझ्या माणसांसाठी नक्की पुढे होऊन करणार.
भगवान मस्के -सदस्य, ग्रामपंचायत मांगरूळ
Comments
Post a Comment