*मौजे मांगरुळ (ता. शिराळा) येथे सोमवार दि ३ एप्रिल रोजी होणार जंगी मल्लयुध*

*मौजे मांगरुळ (ता. शिराळा) येथे सोमवार दि ३ एप्रिल रोजी होणार जंगी मल्लयुध*
-------------------------


   शिराळा तालुक्यातील मांगरूळ या गावात *चिंचेश्वर देवाच्या यात्रेनिमित्त* चिंचेश्वर यात्रा कमिटी, व ग्रामपंचायत मांगरुळ यांच्या विद्यमाने भव्य दिव्य कुस्तीचे मैदान होणार आहे.
   मांगरूळ हे गाव तसे पहिल्यापासूनच लढवय्यांचे गाव म्हणून ओळखले जाते. अनेक मात्तबर पैलवान याच गावात घडले आहेत. प्रत्येक घरात ऐक पैलवान म्हटलं तर वावघं ठरणार नाही. *मोरेवाडी येथील स्व. पैलवान राजाराम पवार* यांचे संपूर्ण पंचक्रोशीत नाव होते. त्याच बरोबर याच गावातील *शेणवी कुटुंबातील कै. तुकाराम शेणवी (ठेकेदार)* हे सुद्धा मोठमोठाले कुस्ती मैदान भरवत असत. *त्याचबरोबर अनेक नॅशनल, इंटरनॅशनल, शिवछत्रपती पुरस्कार इथपर्यंत पोहोचलेले अनेक पैलवान याच मांगरूळच्या मातीतून उदयास आले*. मांगरूळच्या मैदानात कुस्ती म्हणजे खासबागच्या मैदानात कुस्ती, असंच काहीसं गणित मांगरूळच्या मैदानाच्या बाबतीत आहे. याचं कारण ही तसंच आहे. *हिंदकेसरी गणपतराव आंदळकर (आबा) आणि केशव भेडसगावकर )दादा)* यांची तुफानी कुस्ती एकेकाळी मांगरूळच्या यात्रेच्या मैदानात घेण्यात आली होती. संपूर्ण पंचक्रोशी चे डोळे या कुस्तीकडे होते पंच कमिटी कुस्ती कुणाची होईल, कोण कुणाला चितपट करील हा अंदाज बांधत होते. तसं पाहिलं तर केशव भेडसगावकर (दादा) आंधळकर आबांच्या साठी एक आव्हानच होतं. कारण केशव दादांना हरवणे इतकं सोपं नव्हतं. आबांची आणि केशव भेडसगावकरांची कुस्ती बघण्यासाठी संपूर्ण पंचक्रोशीने गर्दी केली होती याच मांगरूळच्या मैदानात कुस्ती जोडली. डोळ्याचे पारणे फेडणारी ही कुस्ती एका क्षणावर येऊन पोहोचली, तो क्षण होता लक्कलकोट वरती  आबांनी केशव दादांना ढकललं आणि तिथेच कुस्तीचा निर्णय झाला. त्यानंतर भाऊ चिखलकर यांनी आबांना कोल्हापूरला खेळायला पाठवले. *एका हिंदकेसरीची सुरुवात याच मांगरूळच्या मातीतून झाली. त्यानंतर अनेक मातब्बर पैलवान या मातीत लढले त्यामुळे या मांगरूळच्या मैदानातील मातीला एक विशेष महत्त्व पूर्वीपासूनच आलेले आहे*.
  
  मांगरुळ गांव तसे कुस्तीगीरांचे गाव आहे जुन्या काळात अनेक तगडे मल्ल या गावात घडले आहेत. ग्रामदैवत चिंचेश्वर देवाच्या छत्रछायेखाली असणारे हे गाव आता सुजलाम सुफलाम आहे.

*युवा नेते मा संग्रामसिंह पाटील यांच्या नेतृत्वाखाली त्याचबरोबर यात्रा कमिटी मांगरूळ, सरपंच उपसरपंच तसेच ग्रामस्थ व सर्व आजी माजी सरपंच, उपसरपंच, पैलवान मंडळींच्या* सहकार्याने हे मांगरूळ चे मैदान पार पडणार आहे. आणि दुसरे विशेष म्हणजे या मैदानात *चालु वर्षी दोन उपमहाराष्ट्र केसरी पैलवान एकमेकांशी भिडणार आहेत*...

चला तर मग मांगरुळ च्या मैदानाचे याची देही याची डोळा साक्षीदार बनुया....

सदर कुस्ती मैदान *'कुस्ती हेच जीवन' या अधिकृत युट्युब चॅनेल* वर HD स्वरुपात थेट प्रक्षेपण (Live) दाखवले जाणार आहे.


▪️नियोजित कुस्त्या खालील प्रमाणे👇

1️⃣ *पै शैलेश शेळके* उपमहाराष्ट्र केसरी, काका पवार तालीम पुणे❌ *पै अक्षय शिंदे* मामासाहेब मोहोळ कुस्ती केंद्र पुणे

2️⃣ *पै विकास पाटील* मांगरुळ, राष्ट्रकुल क्रिडा संकुल विटा ❌ *पै बजरंग शेळके* मामासाहेब मोहोळ कुस्ती केंद्र ------------------------------------------------------------------------------
          *मांगरूळ मैदानात ऐक प्रेक्षणीय कुस्ती*
*सोनबा गोणगाने* पुणे   *प्रथमेष गुरव* ,शिराळा खुर्द
----------------------------------------------------------------------

3️⃣ *पै अमर पाटील* बिळाशी, गंगावेश तालीम कोल्हापूर ❌ *पै उदय खांडेकर* मामासाहेब मोहोळ कुस्ती केंद्र पुणे

4️⃣ *पै शुभम शेणवी* मांगरुळ ❌ *पै रुपेश पाटील* मोतीबाग तालीम कोल्हापूर

5️⃣ *पै सुमित खांडेकर* मांगरुळ ❌ *पै अतुल हिरवे* कोल्हापूर

 
यासह अनेक काटा कुस्तीचा थरार आपल्याला पहायला मिळेल.

🎤कुस्ती निवेदक
*पै सुरेश जाधव सर*, चिचोंली

▪️मैदान स्थळ:
हुतात्मा स्मारक मांगरुळ, ता शिराळा
दि ३ एप्रिल २०२३ रोजी दुपारी ठीक ३ वा.

▪️मैदान संयोजन:
चिंचेश्वर यात्रा कमिटी, ग्रामपंचायत, ग्रामस्थ मांगरुळ....
---------------
धन्यवाद
पै. अशोक सावंत पाटील
*कुस्ती हेच जीवन महासंघ महाराष्ट्र राज्य*
अध्यक्ष शाहूवाडी तालुका
मो 9702984006

Comments

Popular posts from this blog

*अनाथ मुलांचे स्वीकारले स्वामी धामने पालकत्व*

संजय गणपती पाटील उर्फ संजू दादा भावपूर्ण श्रद्धांजली

*रात्री माझं गाव विकताना पाहिलं*