मांगरुळमध्ये २२ ऐप्रीलपासून प्रीमियर लीगचा थरार...

मांगरुळमध्ये २२ ऐप्रीलपासून प्रीमियर लीगचा थरार...
मनोजकुमार मस्के -मांगरूळ
मांगरूळ येथे २२ ऐप्रील ते २३ ऐप्रील प्रीमियर लीग होणार असून या प्रीमियर लीग साठी ऐकुन १० संघ खेळणार आहेत.
शिराळा तालुका तसा क्रीडाक्षेत्रात उत्कृष्ट म्हणून ओळखला जातो. या मातीत असंख्य मातब्बर क्रीडापटू उदयाला आले आहेत. याबरोबर येथील लहानग्यांसह मोठ्यांनादेखील क्रिकेटचे प्रचंड प्रेम आहे. सध्या तालुक्यातील गावागावात अगदी गल्लीबोळातदेखील क्रिकेट  प्रीमियर लीग रंगू लागल्या आहेत. येथे हजारो लाखो रुपयांची बक्षिसे दिली जात आहेत. शिवाय, मोठ्या चषकांनादेखील अधिक मागणी आहे. त्यामुळे क्रीडाप्रेमी व रसिकांच्या आनंदाला उधाण आले आहे. शिवाय, यामुळे स्थानिक अर्थव्यवस्थेला चालना व गतीदेखील मिळत आहे.
              मांगरूळ ता. शिराळा येथील गावात गावातीलच मुलांनी एकत्र येऊन आपापले संघ तयार केले आहेत. वैशिष्ट्य म्हणजे गावातील मुलांव्यतिरिक्त बाहेरचा कोणीही या प्रीमियर लीग मध्ये नाही. मांगरूळ प्रीमियर लीग असं नाव टाकून टी-शर्ट छापण्यात आलेले आहेत. शिवाय गावातील सर्व जाती धर्माची मुलं एकत्र येऊन  टीम बनवल्या जातात. मुंबईला असणारी मुले ही या दिवशी गावात येतात. सगळी मुले एकत्र येऊन गावातल्या गावातच बक्षीस दिलं जातं. दोन दिवस चालणाऱ्या या प्रीमियर लीग मध्ये  एकूण दहा संघ आहेत.  *पै श्रीपतराव खांडेकर स्पोर्ट्स, राजाराम यशवंत पाटील स्पोर्ट्स, वॉरियर्स 11, डीएसपी वॉरियर्स, रॉयल शेतकरी, माणकेश्वर स्पोर्ट्स, दत्त स्पोर्ट्स, देशभक्त शैक्षणिक संकुल, टायगर इलेव्हन, पार्टनर्स*, असे संघ मैदानात उतरले आहेत.  
      
     चौकट:-  मांगरूळ प्रीमियर लीग पक्षाच्या किंवा त्या गावाच्या किंवा शहराच्या नावाने किंवा एखाद्या आळीच्या किंवा मंडळाच्या नावाने, किंवा एखाद्या व्यक्तीच्या समरणार्थ भरविल्या जात नसून. चक्क आपल्या गावाच्या नावाने भरविल्य जातात. यामुळे परिसरात मांगरूळ प्रिमीयर लिगला विशेष महत्त्व आहे.

बक्षिसांची खैरात
या प्रीमियर लीगमध्ये प्रथम, द्वितीय, तृतीय व उत्तेजनार्थ अशा टीमना पारितोषिक व रोख रक्कम मिळतेच. शिवाय, उत्कृष्ट गोलंदाज, फलंदाज, यष्टीरक्षक, फिल्डर, उत्कृष्ट चढाई आदी खेळाडूंनादेखील रोख पारितोषिक व चषक दिले जाते. शिवाय स्पर्धेदरम्यानदेखील चौकार, षटकार मारणार्‍या व उत्कृष्ट चढाई करणार्‍या खेळाडूला रोख रक्कम दिली जाते. 

Comments

  1. खूप छान मनोज दादा..संकलन आणि लेखन

    ReplyDelete

Post a Comment

Popular posts from this blog

*अनाथ मुलांचे स्वीकारले स्वामी धामने पालकत्व*

संजय गणपती पाटील उर्फ संजू दादा भावपूर्ण श्रद्धांजली

*रात्री माझं गाव विकताना पाहिलं*